India vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना फ्रीमध्ये पाहायचाय? या प्रीपेड प्लॅन्ससोबतच मिळतय JioHotstar सब्सक्रिप्शन
ICC Men’s Champions Trophy 2025 चा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार, 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. आजचा सामना तुम्ही टिव्ही व्यतिरिक्त JioHostar वर देखील लाईव्ह पाहू शकता. यासाठी तुम्हाला JioHostar चं सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची देखील गरज नाही.
टेलिकॉम कंपन्या काही असे रिचार्ज प्लॅन ऑफर करतात, ज्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये JioHostar चं सबस्क्रिप्शन ऑफर केलं जातं. त्यामुळे तुम्हाला या सबस्क्रिप्शनसाठी वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही. आता अशाच काही रिचार्ज प्लॅन्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुमच्याकडे JioHotstar सबस्क्रिप्शन नसेल, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही Jio, Airtel आणि Vi च्या काही रिचार्ज प्लॅनसह JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळवू शकता. यासाठी तुम्हाला हे रिचार्ज प्लॅन्स खरेदी करावे लागणार आहेत. चला तर मग आता Jio, Airtel आणि Vi च्या या रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
रिलायन्स Jio च्या 195 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये, युजर्सना 90 दिवसांसाठी 15 जीबी डेटा मिळतो. हा फक्त डेटा प्लॅन आहे. म्हणजे तुम्हाला कॉलिंग आणि इतर फायदे मिळणार नाहीत. परंतु, या प्लॅनमध्ये, JioHotstar मोबाईलचे सबस्क्रिप्शन निश्चितच 90 दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहे.
Jio चा 949 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये अनलमिटेड कॉलिंग, रोज 2GB डेटा आणि डेली 100 SMS मिळतात. तसेच, JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन 84 दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहे. यासोबतच, या प्लॅनमध्ये युजर्सना JioTV आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.
Airtel च्या या डेटा प्लॅनमध्ये युजर्सना 7 दिवसांसाठी 5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये, युजर्सना 3 महिन्यांसाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.
Airtel चा 398 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांची व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 SMS आणि रोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनसह, Airtel युजर्सना 28 दिवसांसाठी JioHotstar सबस्क्रिप्शन देखील देते. Airtel च्या योजनांमध्ये Disney+ Hotstar ब्रँडिंग अजूनही दिसून येते.
Vi चा 151 रुपयांचा डेटा पॅक 30 दिवसांसाठी 4GB डेटा देतो. यासोबतच, युजर्सना 3 महिन्यांसाठी JioHotstar मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.
Vi च्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग असे फायदे मिळतात. यासोबतच, या प्लॅनमध्ये JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. वर नमूद केलेले प्लॅन खरेदी करून, तुम्हाला JioHotstar चे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. याद्वारे तुम्ही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी दुपारी 2:30 वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता होईल.