Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटोग्राफीचा अनुभव बदलणार! 200MP कॅमेऱ्यासह नवा Huawei स्मार्टफोन लाँच; तगड्या फीचर्ससाठी मोजावे लागणार इतके पैसे

Huawei Smartphone Launched: हुवावेने मलेशियामध्ये आयोजित केलेल्या लाँच इव्हेंटमध्ये Pura 90s Pro आणि Pura 90s Pro Max हे दोन प्रीमियम स्मार्टफोन्स सादर केले आहेत. दमदार कॅमेरा, 6,000mAh बॅटरी, AI फीचर्स आणि फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्समुळे हे दोन्ही स्मार्टफोन्स चर्चेत आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2026 | 11:45 AM
फोटोग्राफीचा अनुभव बदलणार! 200MP कॅमेऱ्यासह नवा Huawei स्मार्टफोन लाँच; तगड्या फीचर्ससाठी मोजावे लागणार इतके पैसे

फोटोग्राफीचा अनुभव बदलणार! 200MP कॅमेऱ्यासह नवा Huawei स्मार्टफोन लाँच; तगड्या फीचर्ससाठी मोजावे लागणार इतके पैसे

Follow Us
Follow Us:
  • प्रो मॉडेलमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6,000mAh बॅटरी, LTPO OLED डिस्प्ले दिला आहे.
  • Huawei Pura 90s Pro ची सुरुवातीची किंमत सुमारे 87,200 रुपये आहे.
टेक कंपनी Huawei ने कुआलालंपुर, मलेशियामध्ये आयेजित करण्यात आलेल्या एका लाँच ईव्हेंटमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Pura 90s Pro आणि Pura 90s Pro Max यांचा समावेश आहे. कंपनीने या दोन नवीन डिव्हाईससह ग्लोबल स्मार्टफोन पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. हे स्मार्टफोन्स सध्या मलेशियातील ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध आहेत. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?

Pura 90s Pro आणि Pura 90s Pro Max ची किंमत आणि उपलब्धता

मलेशियामध्ये Huawei Pura 90s Pro चे 12GB + 256GB व्हेरिअंट MYR 3,699 म्हणजेच सुमारे 87,200 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत MYR 3,999 म्हणजेच सुमारे 94,200 रुपये ठेवली आहे. तर Pura 90s Pro Max चे 12GB + 512GB व्हेरिअंट MYR 4,899 म्हणजेच सुमारे 1,15,400 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे.

ग्राहक Pura 90s Pro हे डिव्हाईस अमरूद सोडा, ऑरेंज सोडा, कोकोनट व्हाइट आणि मलबेरी ब्लॅक फिनिश रंगात खरेदीसाठी करू शकतात. Pura 90s Pro Max हे मॉडेल ब्लश गोल्ड, ऑरेंज ओशन, ब्लेज पर्पल आणि ग्रेफाइट ब्लॅक कलर्स रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही मॉडेल्स आता मलेशियामध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, येत्या काही महिन्यांत हा स्मार्टफोन दुसऱ्या ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच केला जाणार आहे.  (फोटो सौजन्य: Huawei)

Huawei Pura 90s Pro आणि Pura 90s Pro Max चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Huawei Pura 90s Pro मध्ये 2,760 x 1,256 पिक्सेल रेजोल्यूशनवाला 6.6-इंच एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, तर Pura 90s Pro Max मध्ये 2,880 x 1,308 पिक्सेल रेजॉल्यूशनवाला मोठा 6.9-इंच एलटीपीओ ओएलईडी पॅनल दिला आहे. दोन्ही डिस्प्ले 1Hz ते 120Hz अडाप्टिव रिफ्रेश रेट, 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 1.07 बिलियन कलर्स, 460 पीपीआय पिक्सेल डेंसिटी आणि हाय-फ्रीक्वेंसी PWM डिमिंगला सपोर्ट करतो.

हे स्मार्टफोन्स हुवावेच्या किरीन 9030S ऑक्टा-कोर प्रोसेसरवर आधारित आहे आणि EMUI 16 वर काम करतो. Pura 90s Pro मॉडेल 12GB रॅमसह 256GB किंवा 512GB स्टोरेज ऑप्शंसमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. Pura 90s Pro Max केवळ एका सिंगल 12GB + 512GB कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. हुवावेने EMUI 16 मध्ये त्यांचे Celia AI असिस्टेंट इंटीग्रेट केले आहे. हे रूट प्लॅनिंग, अट्रॅक्शन रिकमेंडेशंस, राइड बुकिंग, शेड्यूल मॅनेजमेंट, रिमाइंडर्स, व्हॉईस कॉल्स आणि अनेक सिस्टम फंक्शन्सला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी Huawei Pura 90s Pro मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12.5-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा मॅक्रो टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. दुसरीकडे, Pura 90s Pro Max मध्ये अखेरच्या दोन कॅमेऱ्यांच्या जागी 40-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेलचा दमदार टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 13-मेगापिक्सेलचा ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा दिला आहे आणि ते ट्रू-टू-कलर कॅमेरा 2.0, एआय कंपोझिशन, एआय डी-ग्लेअर, 4x ऑप्टिकल झूम आणि 100x पर्यंतच्या डिजिटल झूमला सपोर्ट करतात. Pura 90s Pro मॉडेल 5cm इतक्या जवळून मॅक्रो फोटोग्राफीला देखील सपोर्ट करते.

कंपनीने लाँच केलेले दोन्ही स्मार्टफोन्स हुवावे हिस्टेन ऑडियो टेक्नोलॉजीवाले स्टीरियो स्पीकर्सने सुसज्ज आहेत. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये डुअल सिम सपोर्ट, 5G, वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, निअरलिंक ई 2.0, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, L1 आणि L5 डुअल-बँड पोजिशनिंगसह जीपीएस, ए-जीपीएस, ग्लोनास, बेईडू, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि नाविक समाविष्ट आहे. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, इन्फ्रारेड सेंसर, हॉल सेंसर, जायरोस्कोप, कंपास, एंबियंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर सारखे अनेक महत्त्वाचे ऑनबोर्ड मोशन आणि एनवायरमेंटल सेंसर्स देखील दिले आहेत.

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी

Huawei Pura 90s Pro आणि Pura 90s Pro Max मध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. Pura 90s Pro मॉडेल 66W वायर्ड हुवावे सुपरचार्ज आणि 50W वायरलेस हुवावे सुपरचार्जला सपोर्ट करते. तर Pura 90s Pro Max मध्ये 100W वायर्ड आणि 80W वायरलेस हुवावे सुपरचार्जचा सपोर्ट देण्यात आला आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये IP68 आणि IP69 ची मजबूत रेटिंग दिली आहे. Pura 90s Pro Max मध्ये हुवावेचे एंटी-रिफ्लेक्टिव Kunlun ग्लास देखील आहे. याबाबत कंपनीने दावा केला आहे की, हे लाइट रिफ्लेक्शन 70 टक्क्यांपर्यंत कमी करते, स्क्रॅच रेजिस्टेंस 16 टक्क्यांपर्यंत सुधारते, ड्रॉप रेजिस्टेंस 25 टक्के वाढवते आणि एंटी-फिंगरप्रिंट कोटिंगचे आयुष्य 200 टक्के अधिक ड्यूरेबल बनवते.

Web Title: Huawei pura 90s pro and huawei pura 90s pro max launched in global market read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Huawei
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी
1

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत
2

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स… ही ऑफर चुकवू नका
3

Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स… ही ऑफर चुकवू नका

2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक
4

2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.