Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज... ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी
नथिंग फोन 4b स्मार्टफोन 8GB+128GB आणि 8GB + 256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 8GB+128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आणि 8GB + 256GB या टॉप एंट व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये आहे. ऑफरअंतर्गत, नथिंग स्मार्टफोनच्या खरेदीवर 7.5 टक्के बँक डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस देखील देत आहे. या ऑफर्सनंतर डिव्हाईसच्या बेस व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि टॉप व्हेरिअंटची किंमत 33,699 रुपये झाली आहे.
स्मार्टफोनची विक्री सुरु झाली असून ग्राहक फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स आणि नथिंगच्या बंगळूरु स्टोअरमधून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. पांढऱ्या, काळ्या आणि निळ्या अशा तीन रंगांच्या पर्यायात ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: फ्लिपकार्ट)
नथिंगने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच सुपर ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 2000 निट्स आहे. यासोबतच फोनमध्ये ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. नथिंगचा हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेटने सुसज्ज आहे. कूलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 20,829mm² कूलिंग सिस्टम दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, सीपीयूचे तापमान 18.8 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्यास मदत होते.
भारतीय बाजारात लाँच केलेल्या या नथिंग स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 33W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 27 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो.
भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही
फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ओआयएस आणि ईआयएसला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड लेंस दिले आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेंसर दिला आहे. या फोनमध्ये TrueLens Engine 4 आहे, जे त्याच्या कॅमेऱ्याची गुणवत्ता सुधारते. नथिंग कंपनीचा हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित नथिंग OS 4.1 वर चालतो. कंपनी तीन वर्षांचे OS अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार आहे.






