Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला

iCloud Scam: आयफोन यूजर्ससाठी धोक्याची घंटा! स्कॅमर्सनी पुन्हा एकदा आयफोन यूजर्समना टार्गेट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी आता ईमेल्स पाठवून यूजर्सना घाबरवले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2026 | 11:25 AM
मोठी बातमी ! तब्बल 1160 कोटींचा इथेनॉल घोटाळा समोर; कुपोषितांच्या 50 लाख क्विंटल तांदळावर डल्ला

मोठी बातमी ! तब्बल 1160 कोटींचा इथेनॉल घोटाळा समोर; कुपोषितांच्या 50 लाख क्विंटल तांदळावर डल्ला

Follow Us
Follow Us:
  • iCloud स्टोरेज फुल झाल्याचा बनावट ईमेल पाठवून स्कॅमर्स आयफोन यूजर्सना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • ईमेलमधील लिंकवर क्लिक केल्यास बनावट वेबसाईटवर नेऊन बँक डिटेल्स, अ‍ॅपल आयडी आणि पासवर्ड चोरले जातात.
  • अनोळखी ईमेल, संशयास्पद लिंक आणि चुकीच्या भाषेचा वापर दिसल्यास लगेच सावध राहून अशा मेल्स डिलीट करणे आवश्यक आहे.
आयफोन यूजर्ससाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. एका ग्राहक संघटनेने जगभरातील सुमारे 1.8 अब्ज आयफोन यूजर्ससाठी इशारा जारी आहे. यूजर्सचा डेटा धोक्यात असल्याचे सांगत एका धोकादायक ईमेल स्कॅमबाबत चेतावणी देण्यात आली आहे. अशी माहिती मिळाली आहे की, अलीकडेच टेक कंपनी अ‍ॅपलच्या नावाने आयफोन यूजर्सना एक ईमेल पाठवला जात आहे. या ईमेलमध्ये लिहीले आहे की, तुमते आयक्लाऊड स्टोरेज फुल्ल झाले आहे. यामुळे तुमचे अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकते किंवा फोटो डिलीट होऊ शकतात. तुम्हाला देखील असा ईमेल आला असेल तर सावध व्हा. कारण आयफोन यूजर्सची फसवणूक करण्यासाठी ही स्कॅमर्सची नवीन पद्धत आहे. हा स्कॅम अतिशय धोकादायक असून वेगावे व्हायरल होत आहे. आयफोन यूजर्सची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांना जाळ्यात ओढण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत.

iPhone Secret Codes: नेटवर्क स्ट्रेंथपासून आयफोन हिडन फीचर्सपर्यंत… केवळ एक कोड डायल करा आणि मिळवा संपूर्ण माहिती

iCloud स्कॅम नक्की आहे?

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार आयफोन यूजर्सना ईमेल पाठवून त्यांची फसवणूक करत आहे. या ईमेलमध्ये असा दावा केला जात आहे की, तुमचे iCloud स्टोरेज फुल झाले आहे आणि यामुळे तुमचे अकाऊंट ब्लॉक होऊ शकते. एवंढच नाही तर ईमेलमध्ये असा दावा केला जात आहे की, iCloud मधील तुमचे फोटो आणि व्हिडीओ देखील डिलीट होऊ शकतात. यामध्ये तुम्हाला त्वरित आयक्लाऊडचे स्टोरेज अपग्रेड करण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी सांगितलं जातं. जर यावर यूजर्सनी क्लिक केलं तर मोठा अनर्थ होऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

iCloud स्कॅममध्ये यूजर्सची फसवणूक कशी केली जाते?

ईमेलमध्ये दिलेल्या आयक्लाऊडचे स्टोरेज अपग्रेड किंवा पेमेंट बटनवर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक बनावट वेबसाईट ओपन होते. ही वेबसाईट अगदी अ‍ॅपलच्या खऱ्या वेबसाईटप्रमाणे दिसते. इथे स्कॅमर्स तुमच्याकडून बँक डिटेल्स, कार्ड नंबर, अ‍ॅपल आयडी आणि पासवर्ड सारखी माहिती मागतात. जेव्हा तुम्ही ही माहिती एंटर करता तेव्हा स्कॅमर्स तुमचा डेटा चोरतात.

खोटे आणि बनावट ईमेल्स कसे ओळखावे?

बनावट ईमेल्स ओळखण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. या ईमेल्सचे एड्रेस विचित्र असतात, जसे .biz.ua किंवा दुसऱ्या देशाचा डोमेन असू शकतो. तसेच, अशा ईमेलमध्ये ‘Your account may expires today’ यासारख्या स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका असतात आणि अत्यंत भीतीदायक भाषा वापरली जाते. त्यामुळे जर तुम्हाला आलेल्या ईमेलमध्ये अशा भाषेचा वापर करण्यात आला असेल तर वेळीच सावध व्हा आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

एक्सपर्ट्स काय म्हणाले?

  • एक्सपर्ट्सने आयफोन यूजर्सना सावध राहण्याचा आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.
  • अशा प्रकारच्या ईमेल्सकडे दुर्लक्ष करा किंवा डिलीट करा.
  • कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
  • कोणत्याही वेबसाईटवर तुमची माहिती शेअर करू नका.
  • सेटिंग्ज > आयक्लॉडवर जाऊन तुमच्या आयफोनचे स्टोरेज तपासा.

Web Title: Icloud scam is very dangerous for iphone users know what experts said tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • iphone
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर
1

Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य
2

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
3

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
4

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.