ॲपलची iPhone 16 सीरीज पुढील महिन्यात लाँच होणार आहे ज्या अंतर्गत iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे चार मॉडल्स लाँच केले जातील. ॲपलने अद्याप कोणत्याही फोनच्या किंमती आणि फीचर्सबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र एका नवीन लीक झालेल्या रिपोर्टमध्ये किंमतीपासून ते फीचर्सपर्यंतची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, iPhone 16 सीरीजच्या सर्व मॉडेल्समध्ये Apple Intelligence AI सपोर्ट असेल.
हेदेखील वाचा – BSNL च्या 4G सिममध्ये आता 5G चालणार! नवीन सर्व्हिस लाँच
iPhone 16 आणि iPhone 16 Plus या दोन्ही मॉडेल्समध्ये A18 चिपसेट उपलब्ध असेल. याशिवाय यात 8GB रॅम आणि Apple Intelligence चा सपोर्ट देखील असेल. नियमित मॉडेलमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंच स्क्रीन असेल आणि iPhone 16 Plus मध्ये 6.7-इंच स्क्रीन असेल.
iPhone 16 मध्ये 3,561mAh ची मोठी बॅटरी असू शकते, तर iPhone 16 Plus मध्ये 4,006mAh युनिट असू शकते. iPhone 16 Pro मध्ये 3,577mAh बॅटरी असेल, तर iPhone 16 Pro Max मध्ये 4,676mAh बॅटरी असू शकते. iPhone 16 सिरीज 40W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 20W MagSafe चार्जिंगसह येऊ शकतो.