देशभरातील अनेक टेक कंपन्यांनी आपल्या रिचार्ज दर वाढवले आहेत. या दरवाढीमुळे अनेक युजर्स आता BSNL कडे वळले आहेत. त्यातच आता वाढते युजर्स बघता BSNL देखील आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. BSNL कडून 4G सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. BSNL द्वारे 4G आणि 5G युजर्ससाठी एक नवीन सिम लाँच केले जात आहे, जे USIM म्हणून ओळखले जात आहे. प्रश्न पडतो की U-SIM म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय? तर आम्ही तुम्हाला सांगतो की 4G आणि 5G मध्ये Jio आणि Airtel सोबतच्या स्पर्धेत Jio मागे राहू इच्छित नाही. हेच कारण आहे की कंपनी तंत्रज्ञानाच्या पातळीवर स्वतःची प्रगती करत आहे, ज्यासाठी BSNL 4G आणि 5G युजर्ससाठी USIM कार्ड लाँच करत आहे.
USIM ला युनिव्हर्सल सब्सक्राइबर्स आयडेंटिटी मॉड्यूल असे म्हणतात. या सिमकार्डमध्ये एक छोटी चिप एम्बेड केलेली आहे, जी ती सामान्य सिमकार्डपेक्षा वेगळी बनवते. या सिमकार्डमध्ये युजर्सची माहिती साठवली जाते. तसेच, ते इतर कोणत्याही सिम कार्डसारखेच दिसते. पण USIM कार्ड अधिक सुरक्षित मानले जाते. या सिमचे ऑथेंटिफिकेशन आणि व्हॅलिडेशन सोपे आहे. हे U-SIM BSNL ने 4G आणि 5G युजर्ससाठी आणले आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की, जर तुम्ही BSNL चे 4G सिम कार्ड विकत घेतले तर तुम्हाला BSNL च्या 5G सेवेसाठी नवीन सिम कार्ड खरेदी करावे लागणार नाही. म्हणजे हे सिम कार्ड 4G आणि 5G दोन्ही नेटवर्कशी सुसंगत असेल.
हेदेखील वाचा – देशात इंटरनेटची वाढती क्रेझ; वर्षभरात जोडले कोट्यावधी नवीन युजर्स, Jio आणि Airtel आघाडीवर
देशांतर्गत टेलिकॉम डेव्हलपमेंट फर्म पायरो होल्डिंग्जच्या सहकार्याने भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने विकसित केले आहे. हे BSNL 4G आणि 5G तयार OTA प्लॅटफॉर्म भारतातील BSNL युजर्ससाठी एक नवीन फिचर असेल. BSNL द्वारे नवीन 4G आणि 5G-रेडी ओव्हर-द-एअर (OTA) आणि युनिव्हर्सल सिम (USIM) प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहे. यामुळे बीएसएनएलची सेवा सुधारेल असा विश्वास आहे. तसेच, कनेक्टिव्हिटी पूर्वीपेक्षा चांगली असेल. बीएसएनएलने चंदीगडमध्ये या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आणि तिरुचिरापल्ली, तमिळनाडू येथे आपत्ती रिकव्हरी साइट तयार केली.
अहवालानुसार, 4G सेवा मार्च 2025 पर्यंत आणली जाऊ शकते. तसेच येत्या 6 ते 8 महिन्यांत देशभरात 4G सेवा सुरू होऊ शकते. मार्च 2025 पर्यंत त्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर BSNL 5G सेवा 2025 च्या अखेरीस आणली जाऊ शकते. बीएनएसएलच्या स्वस्त डेटा आणि कॉलिंगच्या मदतीने ग्रामीण भारतातील डिजिटल दरी भरून काढता येईल, असा विश्वास आहे. पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक पाऊल असेल.