Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण

AI Skilling Program: भारत सरकारने देशात एआयच वापर वाढवण्यासाठी दोन टेक दिग्गज कंपन्या गूगल आणि युट्यबूसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. 15,000 क्रिएटर्सना आर्टिफिशियल इंटेलीजेंससंबंधित ट्रेनिंग दिली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2026 | 01:07 PM
भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण

भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण

Follow Us
Follow Us:
  • AI क्षेत्रात भारताचा मोठा डाव! Google-YouTube सोबत सरकारची थेट भागीदारी
  • 15 हजार क्रिएटर्सना मिळणार AI ट्रेनिंग; भारत सरकारचा मोठा टेक निर्णय
  • डिजिटल क्षेत्रात नवा टप्पा! गूगल आणि यूट्यूबसोबत भारत सरकारची मोठी हातमिळवणी
भारतात आर्टिफिशियल इंटेलीजेंस क्षेत्रात एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजने गूगल आणि युट्यूबसह भागिदारी केली आहे. या भागिदारीअंतर्गत 15,000 क्रिएटर्सना आर्टिफिशियल इंटेलीजेंससंबंधित ट्रेनिंग दिली जाणार आहे. लोकांना एआयचा वापर कसा करायचा आहे, याबाबत साध्या आणि सोप्या पद्धतीने समजवले जाऊ शकते, हाच या भागिदारीचा मुख्य उद्देश आहे.

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! हा आहे कंपनीचा 72 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे

सूचना प्रसारण मंत्रालय आणि IICT ने गूगल आणि यूट्यूबसह केली भागीदारी

भारतात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआयमुळे व्हिडीओ, कंटेट आणि फोटो बनवण्याच्या पद्धतीमध्ये देखील मोठा बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक शहरांमधील क्रिएटर्सकडे एआय टूल्स तर आहेत, पण त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत अनेकांना माहिती नसतं. याच कारणामुळे सूचना प्रसारण मंत्रालय आणि IICT ने गूगल आणि यूट्यूबसह भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागीदारीअंतर्गत आणि प्रोग्रामद्वारे क्रिएटर्सना केवळ बेसिक लर्निंगच नाही तर स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग देखील मिळणार आहे. भारत सरकारचे ध्येय आहे की, एनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल कंटेटसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये क्रिएटर्स एआयचा वापर अगदी सहजपणे करू शकतील. क्रिएटर्सना अचूक एआय प्रशिक्षण दिल्याने, ते उच्च-गुणवत्तेचे काम तयार करू शकतील. यासोबतच एआयद्वारे क्रिएटर्स जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांचे कार्य क्षेत्र अधिक वाढण्यासाठी मदत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

दोन टप्प्यांमध्ये होणार ट्रेनिंग

क्रिएटर्सची ही ट्रेनिंग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिला टप्पा बेसिक एआय ज्ञानावर आधारित असणार आहे. यामध्ये सहभागी झालेल्या क्रिएटर्ससाठी लर्निंग कोर्स उपलब्ध केला जाणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर सहभागी झालेल्या क्रिएटर्सना सर्टिफिकेट देखील दिले जाणार आहे. पहिल्या टप्पात क्रिएटर्सना शिकवले जाईल की एआय कसे काम करते आणि त्यांचा वापर कंटेट क्रिएशनसाठी कसा केला जाऊ शकतो. या ट्रेनिंगचा दुसरा टप्पा जास्त प्रॅक्टिकल असणार आहे आणि यामध्ये ट्रेनिंग, रियल प्रोजेक्ट्स आणि प्लॅटफॉर्म बेस्ड ट्रेनिंग सारख्या काही प्रोसेस समाविष्ट असणार आहेत. या टप्प्यामध्ये क्रिएटर्स गोष्ट सांगण्याची कला शिकणार आहेत आणि एडवांस एआय टूल्सचा वापर करण्यास शिकणार आहेत. याव्यतिरिक्त यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर पुढे जाणं आणि ग्रो करणं शिकणार आहेत. हे प्रशिक्षण देशातील प्रमुख क्रिएटिव्ह शहरांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपांत दिले जाईल.

WWDC 2026: ‘या’ दिवशी सुरु होणार Apple चा सर्वात बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट… iOS 27 पासून सिरीपर्यंत कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज

भारतात डिजिटल कंटेंट क्रिएटर्सना मिळणार बूस्ट

भारतात डिजीटल कंटेंट क्रिएटर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांची क्वालिटी आणि कमाई वेगवेगळी आहे. त्यामुळे, एआयचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर, ते आपल्या कामात सुधारणा करू शकतील आणि जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. हे एआय कौशल्य विकास कार्यक्रम भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: India government partners with google and youtube to provide free ai training to 15000 creators tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • YouTube

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
2

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.