Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs New Zealand: कोण जिंकणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना? AI चॅटबोट्सने दिली आश्चर्यकारक उत्तरं!

क्रिकेटतज्ज्ञ आणि चाहते यांच्या भाकितानंतर आता AI चॅटबोट्सने देखील सामन्याच्या निकालाबद्दल भविष्यवाणी केली आहे. ChatGPT, Google Gemini, Copilot ने या सामन्याच्या निकालाबाबत हैराण करणारी उत्तरं दिली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2025 | 03:10 PM
India vs New Zealand: कोण जिंकणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना? AI चॅटबोट्सने दिली आश्चर्यकारक उत्तरं!

India vs New Zealand: कोण जिंकणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना? AI चॅटबोट्सने दिली आश्चर्यकारक उत्तरं!

Follow Us
Close
Follow Us:

9 मार्च रोजी उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे. सामना कोण जिंकणार, याचा प्रत्येकजण वेगवेगळा अंदाज वर्तवत आहे. भारतीय संघाचा प्रत्येक चाहता या सामन्यात टिम इंडियाचा विजय व्हावा, म्हणून प्रार्थना करत आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारतच जिंकणार आहे, असं भाकित देखील अनेकांनी केलं आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी घेऊन आलीये जबरदस्त प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज मिळणार इतका डेटा

चॅटजीपीटी सारख्या वेगवेगळ्या चॅटबॉट्सना देखील प्रश्न विचारण्यात आला होता की यंदाचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कोण जिंकणार, तेव्हा त्यांनी या सामन्याच्या निकालाबद्दल काय भाकिते केले आहेत याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – ICC) 

चॅटबोट्सना विचारला हा प्रश्न

ओपनएआयच्या चॅटजीपीटी, गुगल जेमिनी आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट चॅटबॉट्सना विचारण्यात आले की भारत आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना कोणता संघ जिंकेल आणि का? या प्रश्नाचं उत्तर देताना, सर्व चॅटबॉट्सनी भारत जिंकेल असे भाकीत केले आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की चॅटबॉट्स पूर्णपणे अचूक उत्तरे देत नाहीत आणि त्यांची उत्तरे चुकीची असू शकतात. पण क्रिकेटतज्ज्ञ आणि चाहते यांच्या भाकितानंतर आता AI चॅटबोट्सने देखील या सामन्यात भारतच जिंकेल असं भाकित केलं आहे.

जेमिनी काय म्हणाला

जेमिनी म्हणाले की अंतिम सामन्यातील विजेता कोण असेल हे सांगणे कठीण आहे आणि दोन्ही संघ मजबूत आहेत, परंतु भारतीय संघ अधिक मजबूत आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीत डेप्थ आहे आणि रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे सामना जिंकवणारे खेळाडू आहेत. जर भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली तर भारत ट्रॉफी जिंकेल.

चॅटजीपीटी काय म्हणाला

चॅटजीपीटीने म्हटले आहे की भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकू शकतो. याचे कारण सांगताना ते म्हणाले की, भारतीय संघाचे दुबईमध्ये वर्चस्व आहे आणि त्यांनी यापूर्वीही येथे न्यूझीलंडला पराभूत केले आहे. या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. दुबईची परिस्थिती भारताच्या बाजूने असू शकते. तथापि, त्याने न्यूझीलंडलाही कमी लेखलेले नाही. चॅटजीपीटीने म्हटले आहे की न्यूझीलंड पाच जागतिक स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांची बँलेस्ड टीम आणि फॉर्ममध्ये असलेले विल्यमसन आणि रचिन रवींद्र सारखे खेळाडू एक मजबूत आव्हान उभे करतील. मात्र या सामन्याच्या वेळी दुबईची परिस्थिती भारताच्या बाजूने असू शकते.

Women’s Day 2025: Google ने केला स्त्रीशक्तीचा गौरव, खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा! स्पेशल डूडल केलं शेअर

मायक्रोसॉफ्ट कोपायलट काय म्हणाला

मायक्रोसॉफ्ट कोपायलटनेही भारत अंतिम सामना जिंकू शकेल असे भाकीत केले होते. यानुसार, भारतीय संघाची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे आणि ती एक मजबूत संघ आहे. त्यांच्याकडे विराट कोहली आणि शुभमन गिलसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत आणि मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमण आहे. न्यूझीलंड हा एक मजबूत संघ आहे पण विशेषतः आशियाई परिस्थितीत भारताविरुद्ध त्यांना संघर्ष करावा लागला आहे.

Web Title: India vs new zealand who will win the champions trophy final match you will surprised by ai answer tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • AI technology
  • Champions Trophy 2025
  • Tech News

संबंधित बातम्या

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस
1

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

UPI आयडी आता तुम्हीच करा क्रीएट, Paytm वर जाऊन फॉलो करा या स्टेप्स
2

UPI आयडी आता तुम्हीच करा क्रीएट, Paytm वर जाऊन फॉलो करा या स्टेप्स

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
3

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
4

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.