Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रेल्वेचा सुपरअ‍ॅप RailOne लाँच; तिकीट बुकिंगपासून PNR स्टेटसपर्यंत सर्वकाही क्षणात होणार

भारतीय रेल्वेचा सुपरअ‍ॅप RailOne आता लाँच करण्यात आला आहे. या सुपरअ‍ॅपमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे सुपरअ‍ॅप RailOne आता लाँच केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 02, 2025 | 01:13 PM
भारतीय रेल्वेचा सुपरअ‍ॅप RailOne लाँच; तिकीट बुकिंगपासून PNR स्टेटसपर्यंत सर्वकाही क्षणात होणार

भारतीय रेल्वेचा सुपरअ‍ॅप RailOne लाँच; तिकीट बुकिंगपासून PNR स्टेटसपर्यंत सर्वकाही क्षणात होणार

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. प्रवास अधिक सोपा आणि सुखाचा व्हावा, यासाठी हे नवं अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. रेल्वेने लाँच केलेल्या या नव्या अ‍ॅपचं नाव RailOne आहे. हे एक सुपरअ‍ॅप आहे, जिथे प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून PNR स्टेटसपर्यंत सर्व सुविधा मिळणार आहेत. हे अ‍ॅप प्रवाशांना अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते, ज्यामुळे वेगवेगळे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेंटर ऑफर रेलवे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त हे सुपरअ‍ॅप लाँच केले आहे.

अखेर प्रतिक्षा संपली! Nothing चा सर्वात महागडा Smartphone भारतात लाँच, नव्या Glyph Matrix ने सुसज्ज! प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत

रेल्वेच्या नव्या सुपरअ‍ॅपमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा ऑफर केल्या जाणार आहेत. जसं की, प्रवासी IRCTC कडून आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतील. तसेच प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी करू शकतील. याशिवाय PNR स्टेटस आणि ट्रेन इन्क्वायरी देखील या अ‍ॅपद्वारे तपासू शकतील. हे अ‍ॅप प्रवाशांना कोचचे स्थान तसेच Rail Madad अ‍ॅपवर फीडबॅकचा पर्याय प्रदान करेल. त्यामुळे प्रवाशांची अनेक कामं अगदी क्षणात पूर्ण केली जाणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

RailOne ऐप लॉन्च: यात्री सेवाओं के लिए एकीकृत समाधान 📱🚆

रेल मंत्री @AshwiniVaishnaw ने इंडिया हैबिटैट सेंटर, नई दिल्ली में रेल सूचना प्रणाली केंद्र (CRIS) की 40वीं वर्षगांठ के अवसर पर नया ऐप RailOne लॉन्च किया।

💠 #RailOne एक समग्र और यूज़र-फ्रेंडली ऐप है, जो सभी प्रमुख… pic.twitter.com/UQ9B43bpEO

— पीआईबी हिंदी (@PIBHindi) July 1, 2025

iPhone आणि अँड्रॉईड दोन्हीसाठी नवं अ‍ॅप उपलब्ध

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म या उद्देशाने हे नवीन अ‍ॅप विकसित केले आहे. यामध्ये प्रवाशांना गरज असलेल्या सर्व सुविधा ऑफर केल्या जात आहेत. हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे. शिवाय या एकाच अ‍ॅपमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे कोणतेही दुसरे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही.

अ‍ॅपमध्ये मिळणार या सुविधा

  • रिसर्व आणि अनरिसर्व तिकीट बुकिंग
  • प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
  • ट्रेन इन्क्वायरी
  • पीएनआर स्टेटस चेक
  • जर्नी प्लॅनिंग
  • रेल मदत प्लॅटफॉर्मची सर्व वैशिष्ट्ये
  • ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्याची सुविधा

सिंगल साइन-ऑन फीचर

RailOne अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे, हे सिंगल साइन-ऑन फीचर ऑफर करते. म्हणजेच युजर्सना वेगवेगळे प्लॅटफॉर्म जसं की, RailConnect, Raill Madad, UTSonMobile किंवा R-Wallet साठी वेगवेगळे पासवर्ड एंटर करण्याची गरज भासत नाही. या अ‍ॅपमध्ये सर्व प्लॅटफॉर्म ऑफर केले जाणार आहे, पासवर्डशिवाय युजर्स त्याचा वापर करू शकणार आहेत. युजर्सना केवळ mPIN किंवा बायोमेट्रिकने लॉगिन करावं लागणार आहे.

चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाल, AI टूलवर…

एकाच ठिकाणी मिळणार सर्व सुविधा

सध्या भारतीय रेल्वे प्रवाशांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सुविधा ऑफर केल्या जातात. जसं की प्लॅटफॉर्म तिकीटसाठी रेल कनेक्ट अ‍ॅप, जेवण ऑर्डर करण्यासाठी IRCTC eCatering आणि फीड बॅकसाठी Rail Madad अ‍ॅप, अनरिसर्व तिकीटसाठी UTS आणि ट्रेन इन्क्वायरीसाठी National Train Enquiry प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो.

Web Title: Indian railway super app railone launched all benefits will get in one app tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.