Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI वापरामध्ये महिलांची बाजी! 10 पैकी 9 भारतातील महिला AIच्या सहाय्याने वाढवताहेत कामाचा वेग; LinkedInच्या अहवालात खुलासा

AIमुळे कामाच्‍या स्‍वरूपामध्‍ये बदल होत असताना जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क LinkedInच्‍या संशोधनामध्ये मोठा खुलासा झाला आहे. भारतातील महिला प्रोफेशनल्‍स AIचा अवलंब करण्‍यामध्‍ये आघाडीवर आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 09, 2026 | 03:58 PM
(फोटो सौजन्य: AI )

(फोटो सौजन्य: AI )

Follow Us
Close
Follow Us:
  • महिलांकडून AI कौशल्‍यांचा सक्रियपणे वापर
  • कामाच्या ठिकाणाव्यतिरिक्तदेखील वापर
  • AIचा अवलंब करण्‍याकरिता लिंक्‍डइनच्‍या टिप्‍स:
LinkedIn AI report : AIमुळे कामाच्‍या स्‍वरूपामध्‍ये बदल होत असताना जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क LinkedInच्‍या संशोधनामध्ये मोठा खुलासा झाला आहे. भारतातील महिला प्रोफेशनल्‍स AIचा अवलंब करण्‍यामध्‍ये आघाडीवर असण्‍यासोबत AI आत्‍मविश्वासाने वापरत आहेत आणि क्षमता निर्माण करण्‍यामध्‍ये पुरूषांच्‍या पुढे जात असल्याचं स्पष्ट झालं.

प्रीमियम डिझाईन आणि बॅटरीचा पॉवरहाऊस! Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स फक्त १३,४९९ रुपयांपासून सुरू!

महिलांकडून AI कौशल्‍यांचा सक्रियपणे वापर

LinkedIn डेटामधून निदर्शनास येते की, भारतातील १० पैकी ९ (९० टक्‍के) महिला प्रोफेशनल्‍स म्‍हणतात, त्‍या कामाच्‍या ठिकाणी आत्‍मविश्वासाने AI टूल्‍सचा वापर करतात. तुलनेत हे प्रमाण पुरूषांमध्‍ये ८६ टक्‍के आहे. महिला त्‍यांच्‍या AI क्षमता अधिक वाढवण्‍याबाबत देखील अधिक सक्रिय आहेत. जेथे ३५ टक्‍के महिला आपल्‍या रोजगार संधीमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी AI कौशल्‍ये सक्रियपणे अवगत करत आहेत, तुलनेत हे प्रमाण पुरूषांमध्‍ये २९ टक्‍के आहे.

कामाच्या ठिकाणाव्यतिरिक्तदेखील वापर

हा उत्साह कामाच्‍या ठिकाणाव्‍यतिरिक्‍त देखील दिसून येतो. उद्योजकांमध्‍ये, भारतातील महिला संस्थापिका (७८ टक्‍के) कंपनीच्या विकास दृष्टिकोनाबाबत पुरुषांच्या (६६ टक्‍के) तुलनेत अधिक आशावादी आहेत. अनेक महिला उद्योजिका आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी AI-आधारित ऑटोमेशन, अधिक स्मार्ट कार्यपद्धती आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला प्राधान्य देऊन आपल्या व्यवसायामध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणत आहेत.

LinkedIn करिअर तज्ञांचं मत

लिंक्‍डइन करिअर तज्ञ आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) म्‍हणाल्‍या, ”भारतातील श्रमजीवी महिला कामाच्‍या ठिकाणी आत्‍मविश्वासाने एआय टूल्‍सचा वापर करत असल्‍या तरी कामगार बाजारपेठेतील वास्‍तविक स्थिती अत्‍यंत चिंताजनक आहे. लिंक्‍डइन प्‍लॅटफॉर्मच्‍या डेटामधून निदर्शनास येते की, भारतात महिलांचा कर्मचारीवर्गामध्‍ये सहभाग अजूनही २८.१ टक्‍के इतका कमी आहे. ही तफावत दूर करण्‍यासाठी तंत्रज्ञान पुरेसे ठरणार नाही. पण, प्रेरणादायी बाब म्‍हणजे कर्मचारीवर्गामध्‍ये कार्यरत असलेल्‍या अनेक महिला सक्रियपणे एआय कौशल्‍ये आत्‍मसात करत आहेत आणि नवीन टूल्‍ससह प्रयोग करत आहेत. एआयमुळे दैनंदिन कामाचे स्‍वरूप बदलण्‍यासह रोजगार पदांना आकार मिळत असताना टेक्निकल क्षमतेसह मानवी कौशल्‍ये आत्‍मसात असलेल्‍या प्रोफेशनल्‍सना अधिक फायदा होईल. अधिकाधिक महिलांना या संधी उपलब्‍ध असण्‍यासोबत त्‍यामधून फायदा मिळण्‍याची खात्री घेणे कामाचे अधिक सर्वसमावेशक भवितव्‍य घडवण्‍यासाठी महत्त्वाचे असेल.”

प्रोफेशनल्‍स या सर्वसमावेशक क्षेत्रामधून जात असताना एआय आपल्‍या कामाचा शोध घेण्‍याच्‍या, संधी जाणून घेण्‍याच्‍या आणि आपल्‍या क्षमता दाखवण्‍याच्‍या पद्धतींना नवीन आकार देत आहे.

AIचा अवलंब करण्‍याकरिता लिंक्‍डइनच्‍या टिप्‍स:

दैनंदिन कामे एआयवर सोपवा: डेटा प्रोसेसिंग आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या कामांसाठी एआयचा वापर करा. यामुळे वाचलेला वेळ तुमच्‍यामधील मानवी कौशल्‍ये सिद्ध करण्यासाठी वापरा, अशी कामे जी एआय करू शकत नाही, जसे माहितीचे सखोल विश्‍लेषण करणे, धोरणात्मक निर्णय घेणे आणि सहानुभूतीने नेतृत्व करणे.
एआयला तुमच्या शिक्षणाचे माध्यम बनवा: नवीन क्षेत्रे शोधण्यासाठी, नवीन संकल्पना त्‍वरित समजून घेण्यासाठी किंवा तुमच्यातील कौशल्यांची कमतरता ओळखण्यासाठी एआयचा वापर करा. लिंक्डइन लर्निंगच्‍या एआय-आधारित कोचिंग सारखे टूल्‍स तुमची भूमिका, ध्‍येये व कौशल्‍यांनुसार काय शिकावे यासंदर्भात मार्गदर्शन करतात, ज्यामुळे सुरुवात कुठून करावी हा संभ्रम दूर होतो.
तुमच्‍यामधील मानवी कौशल्ये अधिक प्रभावी करा: एआयकडे तुमचा सहकारी म्हणून पहा, जो तुमच्‍यामधील क्षमता अधिक निपुण करेल. तुमच्या संकल्पनांची चाचणी घेण्यासाठी, नवनवीन उपाय शोधण्यासाठी किंवा परिणामांचा अंदाज घेण्यासाठी एआयचा वापर करा. एआयसोबत सहयोग तुमच्या तार्किक विचारांना उंचीवर घेऊन जाईल आणि तुमच्या संकल्पनांना डेटाचा प्रबळ आधार देऊन अधिक प्रभावी बनवेल.
 प्रॉम्प्ट देण्यामध्‍ये प्रभुत्व मिळवा: एआयचा उत्तमपणे वापर करणे ही काळाची गरज बनली आहे, पण खरी प्रगती एआयला योग्य दिशा देण्यामध्ये आहे. प्रभावी प्रॉम्प्ट्स तयार करण्यासाठी वेळ द्या. हे कौशल्य तुम्हाला हायब्रिड प्रोफेशनल बनवेल, ज्यामुळे कोणत्याही क्षेत्रात तुमचे महत्त्व अनन्यसाधारण असेल.
करिअरच्या प्रगतीसाठी एआय वापरा: एआयचा वापर फक्त ईमेल लिहिण्यापुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या व्यावसायिक भविष्याचे नियोजन करण्यासाठी एआयचा उपयोग करा. लिंक्डइनच्या एआय-आधारित जॉब सर्च (LinkedIn’s AI-powered Job Search) सारख्या टूल्‍सचा वापर करून, तुम्ही तुमची ध्‍येये व कौशल्‍यांनुसार योग्य रोजगार शोधू शकता आणि लिंक्‍डइनचे जॉब मॅच (Job Match) तुम्ही रोजगारासाठी किती पात्र आहात, याबाबत सांगेल.

एआय तुम्हाला तुमचे काम अधिक कार्यक्षमतेने करण्यास मदत करण्‍यासोबत संधी देखील उपलब्‍ध करून देते, ज्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍या भावी वाटचालीवर लक्ष केंद्रित करू शकता. बदलत्या काळाच्या प्रवाहाशी जुळवून घेणाऱ्या व्यावसायिक महिलेसाठी एआयचा स्वीकार करणे फक्त करिअरमधील फायद्यापुरते मर्यादित नाही तर इच्छित करिअर घडवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

सर्वात स्लिम ‘iPhone Air’वर तब्बल 26000 रुपयांचं बंपर डिस्काउंट, Amazon सेलची धमाकेदार ऑफर!

Web Title: Indian women leading in ai adoption linkedin report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • hard work
  • linkedin
  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

प्रीमियम डिझाईन आणि बॅटरीचा पॉवरहाऊस! Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स फक्त १३,४९९ रुपयांपासून सुरू!
1

प्रीमियम डिझाईन आणि बॅटरीचा पॉवरहाऊस! Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स फक्त १३,४९९ रुपयांपासून सुरू!

सर्वात स्लिम ‘iPhone Air’वर  तब्बल 26000 रुपयांचं बंपर डिस्काउंट,  Amazon सेलची धमाकेदार ऑफर!
2

सर्वात स्लिम ‘iPhone Air’वर तब्बल 26000 रुपयांचं बंपर डिस्काउंट, Amazon सेलची धमाकेदार ऑफर!

Motorolaचा  नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!
3

Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

आता Payment अडकण्याची भीती नाही, कोणते UPI App आहे सर्वात सुरक्षित? कसे वापरावे Pincode शिवाय UPI Lite
4

आता Payment अडकण्याची भीती नाही, कोणते UPI App आहे सर्वात सुरक्षित? कसे वापरावे Pincode शिवाय UPI Lite

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.