Realme C83 5Gमध्ये 7000mAhची टायटन बॅटरी देण्यात आली आहे, जी तिच्या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या क्षमतेची बॅटरी आहे. यामुळे बॅटरी संपण्याची चिंता न करता तुम्ही दिवसभर फोन वापरू शकता. हा फोन 15W PD आणि 15W DCP चार्जिंगला सपोर्ट करत असल्यामुळे पूर्ण चार्ज होण्यासाठी याला सुमारे 180 मिनिटे लागतात. तसेच, गरज पडल्यास इतर डिव्हाइसेस चार्ज करण्यासाठी यामध्ये 5Wची वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सुविधाही उपलब्ध आहे. दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी डिझाइन केलेल्या या फोनमध्ये 4-वर्षांसाठी स्मूथ परफॉर्मन्सची प्रदान करण्याची खात्री देण्यात आली आहे. यामुळे चार वर्षांपर्यंत फोनचा वापर स्थिर आणि स्मूथ राहील याची खात्री वापरकर्त्याला मिळते.
Realme C83 5Gला पॉवर प्रदान करण्यासाठी प्रगत 6nm प्रोसेसवर आधारित असलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट वापरण्यात आला आहे. याच्या ऑक्टा-कोर सीपीयूमध्ये 2.4GHzवर चालणारे 2 कॉर्टेक्स-ए76 कोअर्स आणि सहा कार्यक्षम कोअर्स उपलब्ध आहेत, जे स्मूथ मल्टीटास्किंग, स्थिर गेमिंग आणि वेगवान 5G कनेक्टिव्हिटी देतात. या स्मार्टफोनमध्ये 4GB आणि 6GBचे LPDDR4X रॅमचे तसेच 64GB आणि 128GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. याच्यातील डायनॅमिक रॅम एक्सपान्शनच्या वैशिष्ट्यामुळे वापरकर्ते मल्टीटास्किंगला अधिक सुधारण्यासाठी रॅम 18GBपर्यंत वाढवू शकतात. याव्यतिरिक्त, यात ओटीजीद्वारे 2TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधाही दिली आहे.
रियलमी C83 5Gमध्ये 144Hz अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.7-इंच लांबीचा एलसीडी डिस्प्ले आहे. यामुळे स्क्रोलिंग अधिक स्मूथ होते, अॅनिमेशन प्रवाही वाटतात आणि गेमिंगचा अत्यंत प्रतिसादात्मक अनुभव मिळतो. वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी या डिव्हाईसमध्ये पहिल्यांदाच एआय आउटडोअर मोड दिले आहे. हे एक स्मार्ट फिचर असून बाहेरच्या वातावरणात स्मार्टफोनचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी डिझाइन केले आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित हे फिचर सिस्टिमची कामगिरी वाढवते, स्पीकरचा आवाज अधिक स्पष्ट करते, नेटवर्कचा वेग सुधारते आणि कडक उन्हातही डिस्प्लेचा ब्राइटनेस वाढवते. यांमुळे बाहेर फिरताना फोन वापरणे अगदी सोपे होते.
दैनंदिन आव्हानांचा सामना करण्यासाठी रियलमी C83 5Gमध्ये मिलिटरी-ग्रेड शॉक रेसिस्टन्स उपलब्ध आहे. तसेच, धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी यामध्ये IP64 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स सुविधा आहे, जी फोन अचानक पडल्यानंतर तसेच धुळीपासून आणि पाण्यापासून फोनला सुरक्षित ठेवते. या डिव्हाईसमध्ये अधिक मोठ्या आणि स्पष्ट ऑडिओसाठी 300% सुपर व्हॉल्यूम फीचर दिले आहे. याचे वजन साधारण 212g असून हा फोन फ्लेम ग्रीन आणि फ्लेम ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध असेल. यातील साईड फिंगरप्रिंट सेन्सर अत्यंत वेगवान असून, तो फोनला केवळ 421msमध्ये अनलॉक करतो.
फोटोग्राफीसाठी Realme C83 5Gमध्ये 4160 × 3120 रिझोल्यूशनपर्यंतचे फोटो काढू शकणारा 13MP एआय रिअर कॅमेरा दिला आहे. यामध्ये इंटेलिजेंट ऑप्टिमायझेशन आणि लाईव्ह फोटोला सपोर्ट देण्यात आला असून फोनच्या पुढील बाजूस वॉटरड्रॉप डिस्प्ले डिझाइनमध्ये 5MPचा कॅमेरा उपस्थित आहे. हा फोन अँड्रॉइड 16वर आधारित रियलमी युआय 7.0वर चालतो. हे सॉफ्टवेअर ऑप्टिमाइझ्ड अॅनिमेशन, अधिक स्मूथ ट्रान्झिशन्स आणि दीर्घकाळ टिकणारी फ्लुएंसी प्रदान करते, ज्यामुळे दररोजच्या वापरात एक उत्तम अनुभव या फोनद्वारे मिळतो.
₹13,499च्या किमतीपासून सुरू होणारा रियलमी C83 5G हा ब्लूमिंग पर्पल आणि स्प्राउटिंग ग्रीन या दोन रंगांमध्ये आणि तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याची पहिली विक्री 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्ट, realme.com आणि सर्व मेनलाईन स्टोअर्सवर सुरू होईल.






