Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंमत कमी, फीचर्स भारी! 50MP कॅमेऱ्यासह Infinix च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री… यूजर्सची पसंती मिळणार का?

Infinix HOT 70 Launched: टेक कंपनी इंफिनिक्सने पुन्हा एकदा बजेट स्मार्टफोन मार्केटमध्ये धडाकेबाज एंट्री केली आहे. नव्या इनफिनिक्स हॉट 70 मध्ये आकर्षक डिझाईन, 6000mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले सारखे दमदार फीचर्स कमी किंमतीत देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 29, 2026 | 03:24 PM
किंमत कमी, फीचर्स भारी! 50MP कॅमेऱ्यासह Infinix च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री... यूजर्सची पसंती मिळणार का?

किंमत कमी, फीचर्स भारी! 50MP कॅमेऱ्यासह Infinix च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री... यूजर्सची पसंती मिळणार का?

Follow Us
Follow Us:
  • इनफिनिक्स हॉट 70 स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, मीडियाटेक हेलियो जी100 अल्टीमेट प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा देण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये 6000mAh बॅटरीसोबत 45W फास्ट चार्जिंग आणि IP65 रेटिंगची सुविधा मिळते.
Infinix Smartphone Launched: टेक कंपनी इंफीनिक्सने आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Infinix HOT 70 या नावाने सादर करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन HOT 60 मॉडेलचे अपग्रेडेड मॉडेल असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनीने आता हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच केला आहे.

7500mAh बॅटरी अन् 16GB पर्यंत रॅम… REDMAGIC च्या नव्या गेमिंग स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, जाणून घ्या किंमत

फोनमध्ये सर्वात खास डायनामिक शाइन डिझाईन देखील देण्यात आले आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनला एक एस्थेटिक लुक मिळत आहे आणि इंडस्ट्रीमध्ये प्रथमच, तो 12 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कलरफुल, वर्सटाईल, फन या संकल्पनेवर आधारित, हॉट 70 एक आकर्षक व्हिज्युअल फिनिश सादर करते.

इनफिनिक्स हॉट 70 ची किंमत

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 4GB + 128GB, 8GB + 128GB आणि 6GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. इनफिनिक्स हॉट 70 च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 2,199,000 IDR म्हणजेच सुमारे 11,785 रुपये आहे, तर डिव्हाईसच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 3,199,000 RP म्हणजेच सुमारे 17,550 रुपये आणि टॉप-एंड 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 3,399,000 म्हणजेच सुमारे 18,250 रुपये ठेवण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – Infinix) 

इनफिनिक्स हॉट 70 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, इनफिनिक्स हॉट 70 मध्ये 6.78-इंच एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यासोबत 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 240Hz टच सँपलिंग रेटसह 700 निट्सपर्यंत ब्राइटनेस देण्यात आली आहे.

प्रोसेसर

फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हेलियो जी100 अल्टीमेट 6 एनएम प्रोसेसरसह आर्म माली-G57 MC2 मिळणार आहे.

कॅमेरा

कंपनीने लाँच केलेल्या नव्या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये f/1.85 अपर्चर, डुअल एलईडी फ्लॅश, 2K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, IR ब्लास्टर, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग दिली आहे.

नेमकं चाललंय तरी काय? आठवडाभरातच OnePlus ने दुसऱ्यांदा वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत… ग्राहकांची नाराजी वाढली

बॅटरी

इनफिनिक्स हॉट 70 मध्ये 45W फास्ट चार्जिंग आणि 10W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 6GB / 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅमसह 128GB / 256GB यूएफएस 2.2 स्टोरेज ऑप्शन मिळणार आहे.

Web Title: Infinix hot 70 launched with 6000mah battery and dynamic shine design read price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

AI Robots : स्मार्टफोननंतर आता AI रोबोटची एंट्री; चिनी कंपनीचं मोठं पाऊल, Elon Musk लाही टक्कर?
2

AI Robots : स्मार्टफोननंतर आता AI रोबोटची एंट्री; चिनी कंपनीचं मोठं पाऊल, Elon Musk लाही टक्कर?

प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री… दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही
3

प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री… दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले… Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये
4

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले… Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.