नेमकं चाललंय तरी काय? आठवडाभरातच OnePlus ने दुसऱ्यांदा वाढवली 'या' स्मार्टफोनची किंमत... ग्राहकांची नाराजी वाढली
OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती
कंपनीने सुमारे आठवडाभरातच या स्मार्टफोनची किंमत दोनवेळा वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. टिपस्टर संजू चौधरीने एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, कंपनीने यावेळी OnePlus Nord 6 स्मार्टफोनच्या दोन्ही स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सुमारे 1 हजार रुपयांनी वाढवली आहे. तुम्ही जर हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी नवीन किंमत जाणून घ्या. (फोटो सौजन्य – OnePlus)
वनप्लस नॉर्ड 6 स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची लाँचिंग किंमत 38,999 रुपये होती. त्यानंतर कंपनीने अलीकडेच किंमत वाढवल्याने या व्हेरिअंटची किंमत 41,999 रुपये झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली असून हा हे बेस व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 42,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
तर 12GB + 256GB व्हेरिअंट 41,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कंपनीने या व्हेरिअंटची किंमत 46,999 रुपयांपर्यंत वाढवली. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 47,999 रुपये मोजावे लागणार आहेत. बेस व्हेरिअंटची किंमत आतापर्यंत 4 रुपयांनी आणि दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 6 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या किंमती वाढल्याने ग्राहकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने सुमारे आठवडाभरातच दोनदा स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही
वनप्लस नॉर्ड 6 स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 80W वायर्ड चार्जिंगसह 9,000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे. डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 3,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे.
यूजर्सचा फोटोग्राफी अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी यामध्ये OIS सह 50MP चा सोनी LYT-600 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 मिळणार आहे.






