7500mAh बॅटरी अन् 16GB पर्यंत रॅम... REDMAGIC च्या नव्या गेमिंग स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, जाणून घ्या किंमत
नवीन डिव्हाईस कमी कालावधीसाठी उच्च बेंचमार्क परफॉर्मंसऐवजी, सातत्यपूर्ण उच्च परफॉर्मंस देण्यासाठी डिझाइन केले आहे. कंपनीने लाँच केलेला त्यांचा नवीन स्मार्टफोन REDMAGIC 10S Pro च्या तुलनेत प्रोसेसिंग पावर, थर्मल मॅनेजमेंट, बॅटरी लाइफ आणि AI इंटीग्रेशनमध्ये अनेक चांगले अपग्रेड घेऊन आला आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – REDMAGIC)
नवा रेडमॅजिक 11 एस प्रो स्मार्टफोन 12GB+256GB आणि 16GB+512GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB+256GB नाईटफ्रीझ व्हेरिअंटची किंमत यूएसमध्ये $849 म्हणजेच सुमारे 81,245 रुपये आहे. तर 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत यूएसमध्ये $949 म्हणजेच सुमारे 90,815 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची विक्री 10 जूनपासून सुरु होणार आहे.
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 6.85-इंच 1.5K ओएलईडी BOE X10 डिस्प्ले दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 960Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि 100% DCI-P3 कलर गॅमट आणि 2000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे.
या स्मार्टफोनमध्ये 4.7GHz पर्यंत ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 लिडींग एडीशन 3nm प्रोसेसर दिला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये एड्रेनो 840 जीपीयूसह 12GB / 16GB एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम, 256GB / 512GB (UFS 4.1) स्टोरेज देखील मिळणार आहे.
फोनमध्ये 50MP 1/1.55″ OV50E40 सेंसर मिळणार आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये f/1.88 अपर्चर आणि ओआयएससह 50MP 1/2.88″ OV50D40 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस देखील मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP OV16A अंडर-डिस्प्ले फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 7500mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे.






