Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Infinix Note 60 Pro: नव्य रंगात सादर करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या हार्डवेअरमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. कंपनीने लाँच केलेल्या या दोन नवीन रंग पर्यायांमुळे आता ग्राहक एकूण 5 रंगांच्या पर्यायात या स्मार्टफोनची खरेदी करू शकणार आहेत. स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि फीचर्सबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2026 | 11:01 AM
दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज... जाणून घ्या किंमत

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • इन्फिनिक्स नोट 60 प्रो आता मिस्ट टायटॅनियम आणि फ्रॉस्ट सिल्व्हर या दोन नव्या रंगांमध्ये 33,999 रुपयांत उपलब्ध झाला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर, 144Hz अमोलेड डिस्प्ले, 6500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते.
  • लॉन्च ऑफरमध्ये 3,999 रुपयांचा मॅगपॉवर स्पीकर, 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रो आणि 5TB गुगल क्लाउड स्टोरेज मोफत दिले जात आहे.
Infinix Smartphone Launched: टेक कंपनी इंफीनिक्सने काही काळापूर्वी Infinix Note 60 Pro लाँच केला होता. आता कंपनीने हा स्मार्टफोन दोन नव्या रंगांच्या पर्यायांत सादर केला आहे. ज्यामध्ये मिस्ट टायटॅनियम आणि फ्रॉस्ट सिल्व्हर यांचा समावेश आहे.

Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर

नव्या रंग पर्यायांत मिळणार मेटॅलिक लुक

कंपनीचं असं म्हणणं आहे की, लाँच करण्यात आलेल्या नवीन मिस्ट टायटॅनियम आणि फ्रॉस्ट सिल्व्हर कलर व्हेरिअंट्समध्ये एका सुधारित मेटॅलिक टेक्स्चरपासून प्रेरित डिझाइन आहे, जी फोनच्या एयरोस्पेस-ग्रेड एल्यूमिनियम फ्रेमसह आणखी जबरदस्त लुक ऑफर करते. कंपनीने यापूर्वी हा स्मार्टफोन सोलर ऑरेंज, डीप ओशन ब्लू आणि मोका ब्राऊन या रंगांच्या पर्यायांत सादर केला होता. त्यानंतर आता हा स्मार्टफोन मिस्ट टायटॅनियम आणि फ्रॉस्ट सिल्व्हर या दोन रंगात देखील खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: Infinix) 

इन्फिनिक्स नोट 60 प्रो ची किंमत आणि ऑफर्स

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या इन्फिनिक्स नोट 60 प्रो च्या मिस्ट टायटॅनियम आणि फ्रॉस्ट सिल्व्हर कलर व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन रिटेल स्टोअरवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. लाँच ऑफरअंतर्गत या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट 3,999 रुपयांचा मॅगपॉवर स्पीकर मोफत मिळणार आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर 18 महिन्यांचा गूगल जेमिनी प्रो प्लॅन, 5 टीबी गूगल क्लाउड स्टोरेज, 1 वर्षासाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट, कॅशबॅक ऑफर्स आणि ईएमआय पर्याय देखील मिळतात.

इन्फिनिक्स नोट 60 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. स्मार्टफोनमध्ये JBL-ट्यून डुअल स्टीरियो स्पीकर्स, कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन, IP64 रेटिंग, इन-बिल्ट हार्ट रेट आणि SpO₂ सेंसरसारखे अनेक फीचर्स देखील मिळणार आहेत.

ॲक्टिव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले

या स्मार्टफोनची सर्वात मोठी विशेषत: म्हणजेच याचे ॲक्टिव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले. हा डिस्प्ले स्मार्टफोनच्या मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये इंटीग्रेट करण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये 288 इंडिपेंडेंट एलईडी पिक्सेल देण्यात आले आहेत, जे स्क्रीन बंद झाल्यानंतर नोटिफिकेशन, चार्जिंग स्टेटस, हवामानाची माहिती आणि कस्टम लाइटिंग इफेक्ट्स दाखवतात.

प्रोसेसर

या दमदार स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर देखील मिळणार आहे. गेमिंग आणि अवघड टास्कदरम्यान तापमान नियंत्रित राखण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 3D आइसकोर VC कूलिंग सिस्टीम देखील आहे.

Airtel Recharge Plan: काय सांगता! वेबसाईट आणि ॲपवरून अचानक गायब झाला हा लोकप्रिय प्लॅन; आता यूजर्सकडे कोणते पर्याय उपलब्ध?

कॅमेरा

फोटोग्राफी लवर्ससाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP ओआयएस प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळणार आहे. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये AI एडिटिंग टूल्स, लाईव्ह फोटो आणि 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग, 30W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Infinix note 60 pro launched in two new color variants read features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
1

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
2

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
3

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच
4

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.