Samsung ला टक्कर देण्यासाठी Infinix सज्ज! ट्रिपल फोल्डिंग कॉन्सेप्ट फोनचा टिझर शेअर, हे असतील खास स्पेसिफिकेशन्स
Samsung लवकरच त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी चर्चा सुरु होती. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या लाँच डेटबबद्दल अधितकृतपणे घोषणा केलेली नाही. त्यामुळे Samsung चा स्मार्टफोन कधी लाँच होणार यासाठी सर्वचजण उत्सुक होते. मात्र अशातच आता स्मार्टफोन कंपनी Infinix ने त्यांच्या पहिल्या ट्रीपल फोल्ड स्मार्टफोनचा टिझर शेअर केला आहे. ट्राय फोल्ड स्मार्टफोनच्या या शर्यतीत आता Infinix ने देखील सहभाग घेतला असून, इतर सर्व स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवण्यासाठी Infinix सज्ज झाला आहे.
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 (MWC 2025) पूर्वीच कंपनीने त्यांच्या ट्राय फोल्ड स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनीने याबाबत त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांच्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. Infinix त्यांच्या पहिल्या ट्रिपल फोल्डिंग कॉन्सेप्ट फोनचा टिझर शेअर केला आहे. नवीन इन्फिनिक्स झिरो सिरीज मिनी ट्राय-फोल्ड स्मार्टफोनमध्ये ट्रिपल-फोल्डिंग मेकॅनिझम देण्यात आला आहे, ज्यामध्ये ड्युअल हिंग डिझाइन आहे. (फोटो सौजन्य – X)
ड्युअल हिंग डिझाइनमुळे फोन ज्यामुळे फोन स्वतः वर्टिकली फोल्ड आणि अनफोल्ड करू शकतो. फोन आउटवर्ड-फोल्डिंग डिजाइनसह येतो आणि त्यात अॅक्सेसरीज देखील असतात ज्यामुळे ते सायकलच्या हँडलबार किंवा जिम टूल्सवर सहजपणे बसवता येते. सध्या, Huawei Mate XT Ultimate Design हा बाजारात उपलब्ध असलेला एकमेव ट्रिपल-फोल्डिंग स्मार्टफोन आहे, परंतु सॅमसंग स्वतःचा ट्राय-फोल्ड देखील सादर करणार असल्याचे म्हटले जाते. या सर्व चर्चेतच आता Infinix ने त्यांच्या आगामी ट्राय फोल्ड स्मार्टफोनचा टिझर शेअर करून सर्वांनाच चकित केलं आहे.
✨ Meet the ZERO Series Mini Tri-Fold—a concept that redefines foldables. From sleek phone to hands-free display or a multi-angle camera, it’s built for versatility. The future is unfolding.#Infinix #ZEROSeries #MiniTriFold pic.twitter.com/m6Zfy2OmVY
— Infinix Mobile (@Infinix_Mobile) February 27, 2025
Infinix ने झिरो सिरीज मिनी ट्राय-फोल्ड कॉन्सेप्ट डिव्हाइस टीझ केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल फोन, हँड्स-फ्री डिस्प्ले आणि कॉम्पॅक्ट कॅमेरा म्हणून वापरता येतो. फोनची ट्रिपल-फोल्डिंग यंत्रणा आणि ड्युअल हिंग सिस्टममुळे तो वर्टिकली फोल्ड आणि अनफोल्ड करण्यासाठी सक्षम आहे.
Realme चे नवीन स्टायलिश Earbuds लाँच, सिंगल चार्ज देणार 52 तासांची बॅटरी लाईफ; किती आहे किंमत?
या स्मार्टफोनमध्ये ‘इनोव्हेटिव्ह स्ट्रॅप’ अॅक्सेसरी असेल, ज्यामुळे तो जिम टूल्स, बॅग स्ट्रॅप्स किंवा कार डॅशबोर्डवर देखील सहजपणे बसवता येईल. हे कॉम्पॅक्ट कॅमेरा म्हणून देखील वापरले जाऊ शकते, ज्यामुळे ते वियरेबल डिवाइसेज आणि इतर लाइफस्टाइल गॅझेट्ससाठी एक उत्तम पर्याय बनते. या Infinix फोनची रचना फोल्ड केल्यावर Infinix झिरो फ्लिपसारखीच दिसते. या प्रोटोटाइपमध्ये होल-पंच कटआउट स्क्रीन आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देखील आहे.
Infinix च्या या कॉन्सेप्ट फोनची घोषणा झाली असतानाच, सॅमसंग लवकरच त्यांचे ट्रिपल फोल्डिंग डिव्हाइस बाजारात आणण्याची तयारी करत आहे. जानेवारीमध्ये झालेल्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये, कंपनीने ट्रिपल-फोल्डिंग स्मार्टफोनची देखील घोषणा केली. मात्र हा स्मार्टफोन कधी बाजारात लाँच केला जाणार, याबाबत अद्याप माहिती नाही. सॅमसंगने अद्याप या फोनच्या लाँचिंग तारखेबद्दल किंवा स्पेसिफिकेशनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नसली तरी, कंपनी MWC 2025 मध्ये या डिव्हाइसशी संबंधित अधिक माहिती शेअर करेल अशी अपेक्षा आहे.