Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram वर वाईट कमेंट करणाऱ्यांची खैर नाही, लवकरच येणार नवीन फीचर; अशा प्रकारे करेल काम

रोमांस स्कॅमच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन इंस्टाग्राम लवकरच एक नवीन फीतर लाँच करणार आहे. याशिवाय कंपनी एका फीचरची चाचणी देखील करत आहे, ज्याचं नाव कमेंट्स डिसलाईक असं आहे. हे फीचर कशा प्रकारे काम करेल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2025 | 03:30 PM
Instagram वर वाईट कमेंट करणाऱ्यांची खैर नाही, लवकरच येणार नवीन फीचर; अशा प्रकारे करेल काम

Instagram वर वाईट कमेंट करणाऱ्यांची खैर नाही, लवकरच येणार नवीन फीचर; अशा प्रकारे करेल काम

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी नवीन फीचर रोल आऊट करत असते. आता देखील कंपनी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. खरं तर हे फीचर युजर्ससाठी बरचं फायद्याचं ठरणार आहे. इंस्टाग्राम हे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. येथे युजर्स त्यांचे नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. या फोटो आणि व्हिडीओवर हजारो लोकं कमेंट करतात. यातील काही कमेंट चांगल्या असतात तर काही कमेंट खराब असतात.

Maha Kumbh Shield: BharatPe ने लाँच केली नवीन स्किम, महाकुंभात येणाऱ्या भाविकांचे UPI पेमेंट होणार सुरक्षित

आतापर्यंत इंस्टाग्रामवर युजर्सना केवळ कमेंट्स लाईक करण्याचा ऑप्शन दिला जात होता. म्हणजेच तुम्हाला कमेंट आवडली किंवा नाही तरी देखील तुमच्याकडे केवळ ती कमेंट लाईक करण्याचाच ऑप्शन होता. मात्र आता तुम्ही तुम्हाला न आवडलेली कमेंट डिसलाईक करू शकता आणि कोणालाही त्याबद्दल माहितीही मिळणार नाही. कमेंट करणाऱ्या युजर्सनाही कळणार नाही की त्यांची कोणतीही कमेंट डिसलाईक झाली आहे. इंस्टाग्रामचं हे फीचर लवकरच रोल आऊट केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इंस्टाग्राम युजर्सना लवकरच कमेंट्स डिसलाईक करण्याचा एक नवीन पर्याय मिळू शकतो. मेटा सध्या यासाठी चाचणी घेत आहे. काही युजर्सनी इंस्टाग्रामवरील कमेंट सेक्शनमध्ये डिसलाइक बजेट देखील पाहिले आहे. यानंतर कंपनीनेही याची पुष्टी केली आहे. हे वैशिष्ट्य फीडवरील पोस्ट आणि रील्स दोन्हीवर विझीबल असेल. यानंतर, युजर्सना कोणतीही कमेंट आवडली नाही किंवा ती रिल किंवा पोस्टसंबंधित वाटत नसल्यास युजर्स ती कमेंट डाउनवोट किंवा डिसलाईक करू शकतील.

… म्हणूनच एक नवीन फीचर आणले जात

इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी म्हणाले की, इंस्टाग्राम युजर्सचा फोटो आणि व्हिडीओवर कमेंट अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने हे फीचर सादर केले जात आहे. कमेंटवर मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, कंपनी कमेंट कोणत्या क्रमाने प्रदर्शित करावी हे ठरवू शकेल. उदाहरणार्थ, जर एखादी कमेंट खूप नापसंत केली गेली तर ती कमेंट सेक्शनच्या तळाशी दिसेल. आम्ही तुम्हाला सांगतो की अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बऱ्याच काळापासून अशा पद्धतींवर काम करत आहेत. डिसलाईक बटण सादर करणे हा देखील असाच एक प्रयत्न होता, परंतु त्याच्या गैरवापराची प्रकरणे देखील समोर आली आहेत. मात्र आता लवकरच युजर्सना या नवीन फीचरचा वापर करता येणार आहे.

या दिवशी लाँच होणार Apple चा नवीन फॅमिली मेंबर, टिम कुक ने जारी केली टीझर! युजर्सची उत्सुकता शिगेला…

रोमांस स्कॅम थांबवण्यासाठी इंस्टाग्रामने उचललं मोठं पाऊल

रोमांस स्कॅमच्या वाढत्या घटनांमध्ये, मेटा एक नवीन वैशिष्ट्य सादर करण्याच्या तयारीत आहे. हे फीचर सर्वात आधी इंस्टाग्राम युजर्ससाठी उपलब्ध असेल. हे वैशिष्ट्य युजर्सना अशा अकाऊंटसोबत चॅट करण्यापूर्वी सेफ्टी नोटिस पाठवेल जे यापूर्वी कोणत्याही संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी आहेत. या सेफ्टी नोटिसच्या मदतीने, युजर्स हे जाणून घेऊ शकतील की ज्या अकाऊंटसोबत ते संवाद साधणार आहेत त्यांनी भूतकाळात काहीतरी चूक केली आहे. इंस्टाग्रामनंतर, हे फीचर मेटा, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसाठी देखील आणले जाऊ शकते. इतर फीचर्सप्रमाणेच हे फीचर देखील युजर्ससाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे.

Web Title: Instagram is going to roll out new feature for dislike comment know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Instagram News
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.