या दिवशी लाँच होणार Apple चा नवीन फॅमिली मेंबर, टिम कुक ने जारी केली टीझर! युजर्सची उत्सुकता शिगेला...
गेल्या काही दिवसांपासून टेक जायंट कंपनी अॅपलच्या नवीन आणि स्वस्त आयफोनची चर्चा सुरु आहे. कंपनीचा हा आगामी आयफोन iPhone SE 4 या नावाने लाँच केला जाऊ शकतो. हा आयफोन या आठवड्यात लाँच होणार अशी बातमी समोर आली होती, मात्र नंतर सांगण्यात आलं की, आगामी आयफोन पुढील आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. आणि आता अशातच अॅपलचे सिईओ टिम कुक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अॅपलचे सिईओ टिम कुकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये 19 फेब्रुवारी रोजी नवीन प्रोडक्ट लाँच करण्याची घोषणा केली. कुकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुढील आठवड्यात एक नवीन सदस्य अॅपल कुटुंबात सामील होणार आहे. कुटुंबातील नवीन सदस्याला भेटण्यासाठी तयार व्हा. त्यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे की, नवीन iPhone SE 4 19 फेब्रुवारी रोजी लाँच केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
7 सेकंदांच्या या प्रमोशनल क्लिपमध्ये पुढील बुधवारी होणाऱ्या लाँचची झलक दाखवण्यात आली आहे. तथापि, सिईओ टिम कुकने मेटल अॅपल लोगोशिवाय इतर कोणतीही माहिती दिली नाही ज्याभोवती चमकदार रिंग आहे. हे नवीन डिव्हाईस अॅपल कुटुंबातील कोणत्या सेक्शनमध्ये सहभागी होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अॅपल त्यांच्या इकोसिस्टममध्ये मॅकबुक, आयपॅड, आयफोन आणि इतर अनेक उपकरणे ऑफर करते. टीझरनंतर, अॅपलच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे असा दाट अंदाज लावला जात आहे की, 19 फेब्रुवारी रोजी आगामी स्वस्त आयफोन लाँच केला जाऊ शकतो.
Get ready to meet the newest member of the family.
Wednesday, February 19. #AppleLaunch pic.twitter.com/0ML0NfMedu
— Tim Cook (@tim_cook) February 13, 2025
iPhone SE सिरीजमधील नवीनतम मॉडेल या आठवड्यात लाँच होणार होते. मात्र यानंतर काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या ज्यामध्ये सांगण्यात आलं की, नवीन आयफोन मॉडेल पुढील आठवड्यात लाँच होणार आहे, असे सूचित केले गेले आहे. आणि अशातच अॅपल सिईओ कुकने देखील सोशल मीडियावर एक टिझर शेअर केला आहे. त्यामुळे आता iPhone SE 4 पुढील आठवड्यात लाँच होण्याची दाट शक्यता आहे.
iPhone SE मार्च 2016 मध्ये लाँच झाला आणि जुन्या iPhone 5 S सारख्याच आकारमानाचा हा एक परवडणारा स्मार्टफोन आहे. त्याच वेळी, दुसरी पिढी 2020 मध्ये लाँच करण्यात आली आणि तिसरी पिढी 2022 मध्ये ग्राहकांसाठी लाँच करण्यात आली. आता बहुचर्चित iPhone SE 4 जवळजवळ तीन वर्षांनी बाजारात येणार आहे. अहवालांनुसार, नवीन स्मार्टफोनमध्ये त्याच्या प्रोसेसर आणि डिझाइनमध्ये काही मोठे अपग्रेड दिसतील.
आतापर्यंत, अनेक अहवालांनी असे सुचवले आहे की iPhone SE 4 मध्ये iPhone 14 सारखीच रचना असू शकते, ज्यामध्ये कोपऱ्यांभोवती फ्लॅट रेल्स आणि एक नॉच असलेला मोठा 6.1-इंचाचा डिस्प्ले असू शकतो. सध्याच्या थर्ड जनरेशनच्या iPhone SE मध्ये 4.7 इंचाचा छोटा डिस्प्ले आहे, त्यामुळे मोठा डिस्प्ले खरोखरच एक मोठा अपडेट असेल.
पुन्हा पुन्हा लॅपटॉप चार्ज करून हैराण झालात? या स्मार्ट ट्रिक्सने वाढवता येईल लॅपटॉपची बॅटरी लाइफ
तसेच, वरच्या बाजूला असलेल्या नॉचमध्ये फेसटाइम एचडी कॅमेरा आणि बायोमेट्रिक सेन्सर असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सरची आवश्यकता नाहीशी होईल. कॅमेऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह एकच 48 मेगापिक्सेल लेन्स असू शकतो. याशिवाय, फोनमध्ये काही Apple Intelligence वैशिष्ट्ये असू शकतात आणि कंपनीचा 5G सेल्युलर मॉडेम असलेले हे पहिले Apple डिव्हाइस देखील असू शकते.