
Instagram Update: आता प्रोफाइल ग्रिडवर तुमचाच कंट्रोल! आवडीनुसार बदला इंस्टग्राम पोस्ट्सची जागा... वाचा संपूर्ण प्रोसेस
इंस्टाग्रामच्या ‘Reorder Grid’ फीचरमुळे यूजर्सना प्रोफाइलवरील पोस्ट्सची जागा मनाप्रमाणे बदलता येणार आहे.
आतापर्यंत आपल्या प्रोफाईलवरील पोस्ट तारीखनुसार दिसत होत्या. म्हणजेच लेटेस्ट पोस्ट वर आणि जुन्या पोस्ट खाली दिसत होत्या. तसेच यूजर्सना 3 पोस्ट्स पिन करण्याचा पर्याय देखील होता. मात्र आता यामध्ये काही बदल करण्यात आला आहे. आता यूजर्स त्यांच्या आवडीनुसार पोस्ट्सची जागा बदलू शकणार आहेत. म्हणजेच तुम्ही अनेक महिन्यांपूर्वी शेअर केलेली पोस्ट्स वरच्या बाजूला अॅडजस्ट करू शकणार आहात आणि नुकतीच शेअर केलेली पोस्ट खाली अॅडजस्ट करू शकणार आहेत. अनेकदा आपल्याला नवीन आणि लेटेस्ट पोस्ट्सपेक्षा जुने फोटो आणि रिल्स अधिक आवडतात. मात्र केवळ 3 पोस्ट्स पिन करण्याचा पर्याय असल्यामुळे अनेकदा आपल्याला आपल्या आवडत्या पोस्ट्स प्रोफाईल ग्रिडवर वरच्या बाजूला घेता येत नाहीत. मात्र आता असं होणार नाही. (फोटो सौजन्य – X)
you can move posts around on your Instagram grid starting this week. tap, drag and drop your posts wherever you want 🪄 pic.twitter.com/HKqO5TValM — Instagram (@instagram) June 8, 2026
इंस्टाग्रामवरील रिऑर्डर ग्रिड नावाच्या नव्या फीचरमुळे तुम्ही प्रोफाईल ग्रिडवरील फोटो तुमच्या आवडीनुसार रांगेत लावू शकणार आहात. याचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी कमेंट देखील केली आहे. एका यूजरने म्हटलं आहे की, यामुळे प्रोफाईलची मांडणी करणे खूपच सोपे होईल! मी कदाचित ती अधिक छान आणि नीटनेटकी दिसण्यासाठी थोडी अतिरिक्त मेहनतही घेईन. कारण आता मी तसे करू शकतो!! तर दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे की, त्यांनी ‘वेळेनुसार क्रमवारी’ (time sorting) लावण्याच्या पद्धतीला सर्वांसाठी शक्य केले आहे. आता कोणीही एखादी जुनी पोस्ट घेऊन ती नवीन पोस्ट असल्यासारखी दर्शवू शकते.
जुना Smartphone विकताय? सर्वात आधी आवर्जून करा ही 4 कामं; नाहीतर वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक
Ans: इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्यानंतर 24 तासांपर्यंत दिसतात.
Ans: होय, ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सर्ड पोस्ट, एफिलिएट मार्केटिंग, Reels आणि कंटेंट क्रिएशनद्वारे कमाई करता येते.
Ans: ब्लू टिक हे व्हेरिफाइड अकाउंटचे चिन्ह आहे, जे अकाउंटची अधिकृत ओळख दर्शवते.