Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स
मॅकओएस 27 कंपनीचे पहिले मोठे मॅकओएस रिलीज आहे, जे इंटेल-आधारित मॅकच्या सपोर्टशिवाय रिलीज करण्यात आले आहे. अॅपलने आधीच सांगितलं होतं की, मॅकओएस Tahoe त्यांचे शेवटचे ऑपरेटिंग सिस्टिम आहे, ज्यामध्ये इंटेल हार्डवेयर अपडेट मिळाले आहे. तथापि, कंपनी पुढील तीन वर्षांसाठी या डिव्हाइसेसना सुरक्षा अपडेट्स देणे सुरू ठेवेल. मॅकओएस 27 सह कंपनी केवळ अॅपल सिलिकन पावर्ड मॅकसाठी फीचर्स आणि अपडेट्स ऑफर करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपलने मॅकओएस Tahoe सोबत कंप्टीन न्यू डिझाईन लँग्वेज लिक्विड ग्लास सादर केले होते. यावर्षी देखील कंपनीने त्यांचे लिक्विड ग्लास डिझाईन कायम ठेवत यामध्ये अनेक अपग्रेड्स केले आहेत. आता मॅकओएस 27 मध्ये यूजर्सना पूर्वीपेक्षा जास्त कंट्रोल मिळणार आहे. यासोबतच ॲपलने विंडोजमध्येही सुधारणा केली आहे. इंटरफेस घटकांना अधिक एकसमान स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.
विजुअल चेंज व्यतिरिक्त अॅपलने गोल्डन गेटमध्ये त्यांचा फोकस सुधारणा आणि परफॉर्मंसवर ठेवला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, त्यांनी मॅकला वेगवान आणि जास्त प्रतिसादक्षम बनवण्यासाठी डिझाईनमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. अॅपलने नव्या सॉफ्टवेअरसह अॅपल इंटेलिजेंसची व्याप्ती देखील वाढवली आहे. यासोबतच नवीन एआय फीचर्स आण सिरी देखील अपग्रेड करण्यात आली आहे. प्रोडक्टिविटी फीचर्स देखील अपग्रेड केले आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ॲपल सिलिकॉन हे एआय (AI) आणि मशीन लर्निंग वैशिष्ट्यांसाठीच्या त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये मध्यवर्ती भूमिका बजावेल.
जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
अॅपलने डेव्हलपर्ससाठी मॅकओएस 27 गोल्ड गेट उपलब्ध केले आहे. याची प्रकाशित आवृत्ती या वर्षांच्या अखेरपर्यंत रिलीज केली जाणार आहे. तसेच, त्यांच्या नेक्स्ट जेनरेशन ऑपरेटिंग सिस्टिम देखील रिलीज करणार आहे.
Ans: macOS हे Apple च्या Mac संगणकांसाठी विकसित केलेले ऑपरेटिंग सिस्टम आहे.
Ans: macOS हे MacBook Air, MacBook Pro, iMac आणि इतर Mac संगणकांमध्ये वापरले जाते.
Ans: macOS हे Apple च्या Mac डिव्हाइसेससाठी खास तयार केलेले ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर Windows विविध कंपन्यांच्या संगणकांमध्ये वापरले जाते.






