Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंटरनेटचं जग बदलणार? Google वेब ब्राउझर Chrome विकणार का? जाणून घ्या आतापर्यंतच्या सर्व अपडेट्स

गुगलचे इंटरनेट जगातील वर्चस्व कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. डीओजेचा दावा आहे की अमेरिकेत 70% पेक्षा जास्त सर्च रिजल्ट्स गुगल नियंत्रित करते. या रणनीतीमुळे, लहान सर्च इंजिन स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2025 | 11:55 AM
इंटरनेटचं जग बदलणार? Google वेब ब्राउझर Chrome विकणार का? जाणून घ्या आतापर्यंतच्या सर्व अपडेट्स

इंटरनेटचं जग बदलणार? Google वेब ब्राउझर Chrome विकणार का? जाणून घ्या आतापर्यंतच्या सर्व अपडेट्स

Follow Us
Close
Follow Us:

टेकजायंट कंपनी गुगल त्यांचा वेब ब्राऊझर क्रोम विकणार आहे, अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र आता गुगलला त्याचा वेब ब्राऊझर क्रोम विकावा लागणार असल्याचे संकेत दिसत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) गुगलविरुद्धची भूमिका आणखी कडक केली आहे. इंटरनेट जगात गुगलची मक्तेदारी कमी करण्यासाठी गुगलला त्याचा वेब ब्राउझर क्रोम विकावा लागेल, अशी मागणी डीओजेने न्यायालयाकडे केली आहे.

Asus Laptop Launched: Zenbook A14 आणि Vivobook 16 ची भारतात एंट्री, तब्बल इतकी आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स

खरं तर जगभरातील गुगलच्या वर्चस्वाबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. इंटरनेटच्या जगात गुगल राज्य करत आहे. अगदी एखाद्या सामान्य माणसापासून दिग्गजांपर्यंत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी लोकं गूगलची मदत घेतात. गूगलकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, असं मानलं जातं. त्यामुळे गुगलचे हजारो, लाखो नाही तर करोडो युजर्स आहेत. अशा या करोडो युजर्स असणाऱ्या मोठ्या टेक कंपन्यांचा दबदबा कमी करण्यासाठी आणि त्यांना लगाम घालण्यासाठी डीओजेने हे पाऊल उचललं आहे. डीओजेचे हे पाऊल माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या धोरणाचा एक भाग आहे. जर गुगलने क्रोम विकले तर निश्चितच त्याच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. शिवाय इंटरनेटच्या जगातील गुगलचे वर्चस्व देखील कमी होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)

क्रोम विकण्याबाबत डीओजेचा युक्तिवाद काय आहे?

इंटरनेट जगत आणि सर्च इंजिनमध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी गुगलने अनेक चुकीच्या पद्धती अवलंबल्या आहेत, असे अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपमधील वेब ब्राउझरमध्ये गुगल सर्चला डीफॉल्ट सर्च इंजिन म्हणून सेट करण्यासाठी कंपन्यांना अब्जावधी रुपये दिल्याचा आरोप गुगलवर आहे. डीओजेचा दावा आहे की अमेरिकेत 70% पेक्षा जास्त सर्च रिजल्ट्स गुगल नियंत्रित करते. गुगलच्या या रणनीतीमुळे, लहान सर्च इंजिन स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

आपण आपल्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा विचार केला तर त्यामध्ये गुगल आधीपासूनचं इंस्टॉल केलेलं असतं. यामुळेच आता अनेक समस्या निर्माण होत आहेत. डीओजेने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे की या धोरणांमुळे गुगल खूप शक्तिशाली झाले आहे. त्याने बाजारपेठेवर इतके वर्चस्व गाजवले आहे की स्पर्धक कंपन्या काहीही केल्या तरी गुगलविरुद्ध जिंकू शकत नाहीत. त्यामुळेच गुगलचं वर्चस्व कमी करणं अत्यंत गरजेचं आहे.

गुगलची मक्तेदारी कशी कमी होईल?

इंटरनेट आणि सर्च इंजिन क्षेत्रातील गुगलची वाढती मक्तेदारी कमी करण्यासाठी, गुगलने आपला व्यवसाय कमी करावा, असे डिओजीने सुचवले आहे. यासाठी गुगलला त्यांचा वेब क्रोम ब्राउझर विकावा लागेल, अशी दाट शक्यता आहे. यासोबतच, गुगलला अ‍ॅपल, मोझिला आणि इतर कंपन्यांसोबतची सर्च इंजिन भागीदारी देखील थांबवावी लागेल. यासोबतच, डीओजे असेही म्हणते की इतर कंपन्यांना गुगलच्या सर्च रिजल्ट्समध्ये आणि डेटामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे.

HMD Barbie Flip Phone: Nokia लवकरच भारतात लाँच करणार पिंक फोन, लाँचपूर्वीच फीचर्स लीक!

डीओजीच्या मागण्यांवर गुगलची प्रतिक्रिया

गुगलने डीओजेच्या मागण्यांना तीव्र विरोध केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते इतर कंपन्यांसोबतच्या करारांमध्ये काही बदल करू शकते. यासोबतच, गुगल असेही म्हणते की डीओजेच्या मागण्या युजर्ससाठी, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असू शकतात. गुगलच्या मक्तेदारी प्रकरणाची सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे. गुगलने आधीच स्पष्ट केले आहे की जर या प्रकरणातील निर्णय त्यांच्या विरोधात आला तर ते उच्च न्यायालयात अपील करेल. मात्र क्रोमच्या विक्रीबाबत गुगलने अद्याप काहीही सांगितलं नाही.

Web Title: Internet set to change google dominance at risk amid major chrome browser sale update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.