HMD Barbie Flip Phone: Nokia लवकरच भारतात लाँच करणार पिंक फोन, लाँचपूर्वीच फीचर्स लीक!
Nokia फोन तयार करणारी टेक कंपनी HMD ने त्यांच्या एका नवीन फ्लिप स्मार्टफोनचा टिझर रिलीज केला आहे. हा आगामी स्मार्टफोन HMD Barbie Flip या नावाने भारतात लाँच केला जाणार आहे. याचा टिझर देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 2024 मध्ये हा फोन लाँच करण्याची कंपनीची योजना होती. मात्र आता 2025 मध्ये हा फोन लाँच केला जात आहे.
HMD Barbie Flip फोन आकर्षक गुलाबी रंगात लाँच करण्यात आला आहे. हा फोन गुलाबी रंगात बार्बीचे सौंदर्य दर्शवतो. या फोनसोबत युजर्सना अॅक्सेसरीज देखील ऑफर केल्या जातात. ज्यामध्ये बॅक कवर, चार्जर आणि बॅटरी यांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व अॅक्सेसरीज देखील गुलाबी रंगात उपलब्ध आहेत. या फोनमध्ये बार्बी-थीम असलेला यूजर इंटरफेस देखील आहे. बार्बी फ्लिप फोन, ज्याचे कव्हर डिस्प्ले मिरर म्हणून काम करते, ते ज्वेलरी बॉक्स स्टाईल केसमध्ये ऑफर. (फोटो सौजन्य – X)
HMD Barbie Flip फोन लवकरच भारतात लाँच होईल, अशी माहिती कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये दिली आहे. देशात हँडसेटची नेमकी लाँच तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तथापि, एक्स पोस्टवर दिसणाऱ्या फोनचं डिझाईन ग्लोबली लाँच करण्यात आलेल्या एक्स पोस्टसारखीच आहे. लवकरच कंपनी फोनच्या लाँचिंग तारखेची पुष्टी देखील करू शकते.
HMD Barbie Flip फोनच्या ग्लोबल व्हेरिअंटमध्ये 2.8 -इंचाचा QVGA स्क्रीन आणि 1.77 -इंचाचा QQVGA कव्हर डिस्प्ले आहे, जो आरशासारखा काम करतो. हे Unisoc T107 प्रोसेसरद्वारे समर्थित असू शकते, 64MB RAM आणि 128MB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेले आहे. या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश युनिट देखील असेल.
HMD चा बार्बी फ्लिप फोन पॉवर पिंक रंगात उपलब्ध असल्याचे दिसून येते. हा फोन अंधारातही चमकतो. फोन चालू केल्यावर, ‘हाय बार्बी’ असा आवाज यूजर्सचे स्वागत करतो. हा फोन S30+ OS वर चालतो आणि बार्बी-थीम असलेला UI वापरतो. यात बीच थीम असलेला मालिबू स्नेक गेम प्री-इंस्टॉल केलेला आहे.
फोनमध्ये 1,450mAh ची रिमूवेबल बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर 9 तासांपर्यंतचा टॉकटाइम देते असे म्हटले जाते. HMD बार्बी फ्लिप फोनसोबत येणारी बॅटरी आणि चार्जर देखील गुलाबी रंगातच उपलब्ध आहे. हे 4G, ब्लूटूथ 5.0, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB टाइप-सी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. अमेरिकेत त्याची किंमत 129 डॉलर्स म्हणजेच सुमारे 10,800 रुपये आहे.