
फक्त नवीन Siri नाही... iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी
नवीन अपडेटमध्ये अॅपल विजुअल इंटेलिजन्सला कॅमेरा कंट्रोल बटणावरून कॅमेरा ॲपमध्ये हलवत आहे. यामध्ये यूजर्सना आधीपासूनच उपलब्ध असलेल्या फोटो, व्हिडीओ, पोर्ट्रेट मोडसह नवीन सिरी मोड देखील मिळणार आहे. या अपडेटनंतर यूजर विजुअल इंटेलिजन्सच्या मदतीने वस्तू, झाडे, प्राणी, पुस्तके आणि दुसऱ्या वस्तूंची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये नवीन कॅलरी स्कॅनिंग फीचर देखील जोडण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फोटोज अॅपमध्ये अॅपल इंटेलिजन्स टूल्स सेक्शन असणार आहे, ज्यामध्ये यूजर्सना फोटो एक्सटेंड आणि रिफ्रेम करण्याचा पर्याय मिळणार आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, नैसर्गिक भाषेत प्रॉम्प्ट देऊन देखील फोटो एडीट करू शकणार आहेत. iOS 27 च्या पुढील वर्जनमध्ये वॉइस-बेस्ड फोटो एडिटिंग फीचर देखील मिळणार आहे.
कंपनी सप्टेंबर महिन्यात फोल्ड आयफोन लाँच करणार आहे. जो iOS 27 अपडेटसह लाँच केला जाणार आहे. याचा विचार करता नव्या अपडेटमध्ये फोल्डेबल इंटरफेस देखील जोडला जात आहे.
नव्या अपडेटमध्ये वॉलेट अॅपला देखील नवीन क्रिएट पास पर्याय मिळणार आहे. याच्या मदतीने यूजर्स कोणत्याही चित्रपटाचे तिकीट, कॉन्सर्ट पास, मेंबरशिप कार्ड्स स्कॅन करून त्याचा डिजिटल पास जनरेट करू शकणार आहेत. यासोबतच कंपनी यामध्ये एआय बिल स्प्लिटिंग फीचर देखील जोडणार आहे, जो ॲपल कॅशसोबत काम करेल.
iOS 27 अपडेटद्वारे शॉर्टकट क्रिएट करण्याची पद्धत देखील बदलणार आहे. नव्या अपडेटनंतर यूजर नैसर्गिक भाषेत सिरीला सांगू शकणार आहेत की, त्यांना शॉर्टकटमध्ये काय पाहिजे आणि सिरी तो आपोआप तयार करेल.
Tech Tips: Airplane मोड की DND? कोण वाचवतं स्मार्टफोनची सर्वाधिक बॅटरी? जाणून घ्या सविस्तर
अपडेटमध्ये मिळणाऱ्या इतर फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यूजरना कस्टम वॉलपेपर जनरेट करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. सफारीमध्ये चार टॅबसह अपडेटेड होम पेज पाहायला मिळणार आहे. कॅलेंडर अॅपमध्ये नवीन एआय फीचर्स देखील पाहायला मिळणार आहेत.