चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती... ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
शाओमी पॅड 8 चे 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात 33,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता या डिव्हाईसची किंमत 35,999 रुपये झाली आहे. म्हणजेच कंपनीने या टॅब्लेटची किंमत सुमारे 2 हजार रुपयांनी वाढवली आहे. तर या डिव्हाईसच्या 12GB + 256GB या टॉप एंड व्हेरिअंटची किंमत आता 38,999 रुपये झाली आहे. डिव्हाईसचे हे व्हेरिअंट 36,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. जर तुम्ही हे व्हेरिअंट ‘शाओमी फोकस पेन प्रो’ स्टाइलससह बंडलमध्ये खरेदी करत असाल तर आता त्याची किंमत 41,999 रुपयांऐवजी 43,999 रुपये झाली आहे. (फोटो सौजन्य – Xiaomi)
एंटी-ग्लेयर फीचर्स वाले शाओमी पॅड 8 चे ‘नॅनो टेक्स्चर’ डिस्प्ले मॉडेलचे 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंट 38,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता त्याची किंमत 40,999 रुपये झाली आहे. नॅनो टेक्सचर मॉडेल ‘शाओमी फोकस पेन प्रो’ बंडलसह खरेदी करणार असाल तर त्याची किंमत 43,999 रुपयांऐवजी 45,999 रुपये झाली आहे. डिव्हाईसच्या नवीन किंमत आता शाओमी इंडियाच्या वेबसाईटवर देखील अपडेट झाल्या आहेत. असे मानले जाते की, हा दरबदल वाढत्या घटकांच्या किमती आणि जागतिक स्तरावर चिप्सच्या तुटवड्यामुळे झाला आहे. गेल्या महिन्यात, वनप्लस, पोको आणि लावा यांसारख्या कंपन्यांनीही भारतात त्यांच्या मध्यम-श्रेणीतील स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर आता शाओमीने टॅब्लेटच्या किंमती वाढवल्या आहेत.
शाओमी पॅड 8 कंपनीच्या नवीन ‘शाओमी हायपर ओएस 3’ वर चालतो. या डिव्हाईसमध्ये 800 निट्सची पीक ब्राइटनेस आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 11.2-इंच 3.2K डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या स्टँडर्ड मॉडलमध्ये नॉर्मल ग्लॉसी स्क्रीन मिळणार आहे. तर या डिव्हाईसच्या नॅनो टेक्स्चर वर्जनमध्ये अँटी-ग्लेयर आणि अँटी-रिफ्लेक्टिव फीचर्स मिळणार आहे.
YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! अल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या
परफॉर्मंससाठी शाओमी पॅड 8 मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 चिपसेटसह एड्रेनो 825 जीपीयू देण्यात आला आहे. यामध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर5टी रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 13-मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आणि सेल्फीसाठी यामध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे. ऑडिओसाठी यामध्ये डॉल्बी एटमॉस आणि Hi-Res सपोर्टसह क्वाड स्पीकर सेटअप मिळणार आहे. शाओमी पॅड 8 मध्ये 9,200mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा टॅब्लेट शाओमी फोकस पेन प्रो स्टाइलस इनपुटला सपोर्ट करतो आणि लॅपटॉपसारखा अनुभव मिळवण्यासाठी याला कीबोर्ड ॲक्सेसरीजसोबतही जोडता येते. या स्टाइलसमध्ये 16,000 पेक्षा जास्त प्रेशर सेन्सिटिव्हिटी लेव्हल्स आहेत.
Ans: Xiaomi ची स्थापना 2010 मध्ये Lei Jun यांनी केली.
Ans: होय, Xiaomi स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्स, चांगला कॅमेरा आणि किफायतशीर किंमतीसाठी ओळखले जातात.
Ans: होय, Xiaomi कडे बजेटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.






