Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फीचर्स असे की पाहून सर्वच होतील चकीत… लाँच होताच सुरु झाली iQOO च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, पावरफुल चिपसेटने सुसज्ज

iQOO Smartphone Launched: ऑल न्यू iQOO Z11x 5G मध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक 7400 टर्बो चिपसेट दिला आहे, जो 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,200mAh बॅटरी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 13, 2026 | 02:30 PM
फीचर्स असे की पाहून सर्वच होतील चकीत... लाँच होताच सुरु झाली iQOO च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, पावरफुल चिपसेटने सुसज्ज

फीचर्स असे की पाहून सर्वच होतील चकीत... लाँच होताच सुरु झाली iQOO च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, पावरफुल चिपसेटने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन भारतात लाँच
  • नुकताच लाँच करण्यात आलेला स्मार्टफोन Z11 लाइनअपचे लेटेस्ट एडिशन
  • iQOO Z11x 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
iQOO Z11x 5G Launched: चिनी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी iQOO ने त्यांच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतात आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने iQOO Z11x 5G या नावाने लाँच केला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन Z11 लाइनअपचे लेटेस्ट एडिशन असल्याचे सांगितलं जात आहे. ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनद्वारे आयक्यूने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन भारतात 3 स्टोरेज व्हेरिअंट आणि दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये एखादा लेटेस्ट स्मार्टफोन शोधत असाल तर iQOO Z11x 5G चांगला पर्याय ठरू शकतो.

7,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Vivo Y51 Pro ची भारतात धमाकेदार एंट्री, सुरुवातीची किंमत 25 हजारांहून कमी

iQOO Z11x 5G ची किंमत आणि उपलब्धता

iQOO Z11x 5G स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपयांपासून सुरु होते. तर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB + 256GB वाल्या टॉप व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अ‍ॅक्सिस बँक आणि एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून हे डिव्हाइस खरेदी केल्यास 2,000 रुपयांपर्यंत त्वरित सूट उपलब्ध आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची पहिली विक्री 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. प्रिज्मॅटिक ग्रीन आणि टाइटन ब्लॅक या रंग पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – iQOO)

iQOO Z11x 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि डिटेल्स

डिस्प्ले

iQOO Z11x 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.76-इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 382 ppi पिक्सेल डेंसिटी आणि 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये IP68 आणि IP69+ रेटिंग मिळणार आहे.

प्रोसेसर

आयक्यू डिव्हाईस अँड्रॉईड 16-बेस्ड OriginOS 6 वर चालते. फोनला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4nm ऑक्टा कोर मीडियाटेक 7400 टर्बो चिपसेट आहे. या डिव्हाइसमध्ये 2.6GHz च्या पीक क्लॉक स्पीडसह चार परफॉर्मन्स कोर आणि 2.0GHz वर क्लॉक केलेले चार एफिशिएंसी कोर आहेत. फोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. सिक्योरिटीसाठी iQOO Z11x 5G मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी iQOO Z11x 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/2.45 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये आणखी एक शूटर आहे. मात्र कंपनीने अद्याप त्याबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर, प्रायव्हसी नियम होणार अधिक कठोर

बॅटरी

iQOO Z11x 5G मध्ये 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Iqoo z11x 5g smartphone launched in india with powerful chipset and amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Vivo Y51 Pro ची भारतात धमाकेदार एंट्री, सुरुवातीची किंमत 25 हजारांहून कमी
1

7,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Vivo Y51 Pro ची भारतात धमाकेदार एंट्री, सुरुवातीची किंमत 25 हजारांहून कमी

गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral
2

गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral

6,300mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या
3

6,300mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त
4

अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.