Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेटिंग लिस्टमध्ये तिकिट अडकलंय? IRCTC च्या ‘ऑप्ट विकल्प’ फिचरने मिळू शकते Confirm Ticket; जाणून घ्या प्रोसेस

रेल्वे प्रवासात वेटिंग लिस्टमुळे अनेकदा अडचण येते. पण IRCTC च्या ‘Opt Vikalp’ फिचरमुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. चला या फिचरचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 11:15 AM
वेटिंग लिस्टमध्ये तिकिट अडकलंय? IRCTC च्या 'ऑप्ट विकल्प' फिचरने मिळू शकते Confirm Ticket; जाणून घ्या प्रोसेस

वेटिंग लिस्टमध्ये तिकिट अडकलंय? IRCTC च्या 'ऑप्ट विकल्प' फिचरने मिळू शकते Confirm Ticket; जाणून घ्या प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • ‘Opt Vikalp’मध्ये पर्यायी ट्रेन निवडण्याची सुविधा मिळते.
  • रिक्त जागा असल्यास तिकीट दुसऱ्या ट्रेनमध्ये कन्फर्म होते.
  • बुकिंगवेळी किंवा नंतरही हा पर्याय निवडता येतो.
लांबचा प्रवास करायचा तर तिकीट बुक करणं आणि ते कन्फर्म होणं फार महत्त्वाचं ठरतं. तुमचं तिकीट जर कन्फर्म झालं नाही तर प्रवासात बसायला सीट मिळू शकत नाही. अशात कन्फर्म तिकिट प्रवासासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. तुमचेही तिकिट जर वेटिंग लिस्टमध्ये अडकले असेल आणि तुम्हाला ते कन्फर्म करायचे असेल तर आयआरसीटीसीच्या ‘ऑप्ट विकल्प’ फिचरची तुम्हाला मदत होऊ शकते. या फिचरच्या मदतीने तुम्हाला तुमचे वेटिंग लिस्टमध्ये अडकलेले तिकिट कन्फर्म करता येणार आहे. याचा अर्थ असा होतो की, तिकीट बुक करताना तुम्ही या सुविधेचा वापर केल्यास, तुमची जागा कन्फर्म होण्याची शक्यता वाढते. मुख्य म्हणजे दुसऱ्या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकिट मिळवून देण्याची प्रक्रिया सीस्टीम स्वत:च करते आणि यात तुम्हाला अतिरिक्त कोणतीही मेहनत घेण्याची गरज लागत नाही.

WhatsApp Update: स्पॅम मेसेजची कटकट संपणार! बिझनेस चॅट्ससाठी तयार होणार वेगळा फोल्डर, यूजर्सना असा होणार फायदा

हे फिचर तेव्हा सक्रिय होते जेव्हा चार्ट बनण्यास सुरुवात होते. जर तुमच्या गंतव्यस्थानी जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये रिकामी जागा असेल, तर ती तुमच्यासाठी कन्फर्म करते. या फिचरचा फार सहजतेने वापर करता येतो. तुम्ही तिकीट बुकिंग प्रक्रियेदरम्यान याचा वापर करु शकता. आता हे फिचर नक्की काय आहे आणि याचा वापर कसा करायचा ते चला सविस्तर जाणून घेऊया.

OPT फीचर म्हणजे काय?

ऑप्ट (OPT) पर्याय हे आयआरसीटीसी (IRCTC) ॲप किंवा वेबसाइटवर उपलब्ध असलेले एक अत्यंत उपयुक्त फिचर आहे. चार्ट तयार झाल्यानंतर ज्या प्रवाशांची तिकिटे वेटिंग लिस्टमध्ये अडकली आहेत त्यांना मदत करण्यासाठी हे फिचर तयार करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, हे फिचर प्रवाशांना त्याच मार्गावरील इतर गाड्यांमध्ये तिकिटे शोधण्यास मदत करते. हे फिचर जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा रेल्वे सीस्टीम त्याच मार्गावरील गाड्यांमध्ये रिकाम्या जागा आपोआप शोधते. याच्या मदतीने दुसऱ्या गाडीमध्यो जागा असल्यास तुमचा पीएनआर त्या नवीन गाडीसाठी अद्ययावत केला जातो. मुख्य म्हणजे असे करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काची गरज भासत नाही. तथापि, हे लक्षात घ्यायला हवे की, हे फिचर जागेची हमी देत नाही परंतु यामुळे कन्फर्म तिकिटाची शक्यता फार वाढते.

OPT फीचर कसे चालू करावे?

  • तुमच्या युजर आयडीने आयआरसीटीसी वेबसाइट किंवा ॲपवर लॉग इन करा.
  • तुमच्या प्रवासाची तारीख आणि ट्रेन निवडा.
  • प्रवाशांचा तपशील भरण्याच्या पेजवर खाली स्क्रोल करा.
  • तिथे, ‘Other Preferences’ सेक्शनमध्ये, तुम्हाला ‘ Opt Vikalp’ असे लेबल असलेला एक बॉक्स दिसेल. त्यावर टिक करा.
  • यानंतर तुमची बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा.
स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग… दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी

तिकीट बुक केल्यानंतर ऑप्ट फीचर कसे चालू करावे?

  • आयआरसीटीसी ॲपवरील बुक केलेल्या तिकीट हिस्ट्रीवर जा.
  • आता ते तिकीट निवडा ज्यासाठी तुम्हाला विकल्प फिचर चालू करायचे आहे.
  • वरील तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला ‘ऑप्ट विकल्प’चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा आणि तो चालू करा.
  • अटी आणि शर्ती असलेला पॉप-अप उघडल्यास, तो स्वीकारा.
  • आता तुमच्यासमोर त्याच मार्गावरील इतर गाड्यांची यादी दिसेल, त्यामधून हवी असलेली यादी निवडा आणि सबमिट करा.

Web Title: Irctcs vikalp scheme may help you get a confirmed train ticket tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • IRCTC
  • Local Trains
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?
1

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर
2

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा
3

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या
4

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.