स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग... दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी
Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?
Tecno Pop X 5G स्मार्टफोन 4GB+128GB आणि 6GB+128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आणि 6GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
Tecno Pop X 5G मध्ये 6.78 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये रेजोल्यूशन 720×1576 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 560 निट्स ब्राइटनेस दिली आहे. या डिव्हाईसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6400 6nm प्रोसेसरसह माली-जी57 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 4GB / 6GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे, ज्याला माइक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड HiOS 16 सह लाँच करण्यात आला आहे. Tecno ने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईस एआई पावर्ड टूल्सने सुसज्ज आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी यामध्ये IP64 Pro रेटिंग दिली आहे.
Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप
या स्मार्टफोनचे कॅमेरा डिझाईन अतिशय आकर्षक आहे आणि यूजर्सचे लक्ष वेधत आहे. Pop X 5G च्या रिअरमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगंसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये 3.5 मिमी ऑडियो जैक, 5G, ड्यूल व्हॉइस ओव्हर एलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.3, जीपीएस आणि यूएसबी टाइप टाइप-सी यांचा समावेश आहे.






