Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

Smartphone Cover Impact On Battery: बाजारात प्रत्येक स्मार्टफोनसाठी विविध प्रकारचे कव्हर उपलब्ध असतात. काही कव्हर खूप जाड असतात तर काही स्मार्टफोन कव्हर अत्यंत हलके असतात. प्रत्येकजण त्यांच्या सोयीनुसार स्मार्टफोनचे कव्हर निवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का, स्मार्टफोनचे कव्हर बॅटरीवर परिणाम करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2026 | 09:38 AM
Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान... जाणून घ्या तथ्य

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान... जाणून घ्या तथ्य

Follow Us
Follow Us:
  • जाड आणि रग्ड फोन कव्हरमुळे उष्णता अडकून राहते, ज्यामुळे बॅटरीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
  • सतत ओव्हरहिटिंग झाल्यास बॅटरीची कार्यक्षमता कमी होऊन तिचे आयुष्य घटू शकते.
  • फोन गरम झाल्यास कव्हर काढणे, चार्जिंग थांबवणे आणि काही काळ फोन बंद ठेवणे फायदेशीर ठरते.
Smartphone Cover Tips: प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणांसाठी स्मार्टफोनच्या कव्हरचा वापर करतात. काही लोक फोन डॅमेज होऊ नये म्हणून स्मार्टफोन कव्हर वापरतात तर असेही काही लोकं असतात जे स्मार्टफोन योग्य पद्धतीने हाताळता यावा यासाठी स्मार्टफोनच्या कव्हरचा वापर करतात.

हल्ली बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्मार्टफोन कव्हरमध्ये होल्डर आणि किक स्टॅन्ड सारखे नवीन फीचर्स पाहायला मिळतात. हे कव्हर थोडे जाड असतात. या कव्हरमुळे तुमच्या स्मार्टफोनला स्टायलिश आणि ट्रेंडी लूक मिळत असला तरी देखील याचा बॅटरीवर परिणाम होतो. अनेक स्मार्टफोन युजर्सना माहिती नसते की स्मार्टफोनच्या कव्हरचा बॅटरीवर परिणाम होतो. बाजारात उपलब्ध असलेल्या स्टायलिश आणि ट्रेंडी मात्र जाड कव्हरमुळे स्मार्टफोनच्या बॅटरीवर कसा परिणाम होतो याबाबत जाणून घेऊया.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

जाड कव्हर वापरण्याचे नुकसान

जर तुम्ही रग्ड किंवा जाड स्मार्टफोन कव्हरचा वापर करत असाल तर सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या की हे कव्हर सहसा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक किंवा लेदरचा वापर करून बनवलेली असतात. अशा मटेरियलमुळे फोनमधून निघणारी उष्णता आतमध्येच ट्रॅप केली जाते. या कारणामुळे फोनचे टेंपरेचर वाढते आणि चार्जिंग, गेमिंग आणि स्ट्रीमिंग सारख्या अ‍ॅक्टिव्हिटीज दरम्यान फोन ओव्हर हीट होण्याचा धोका अधिक असतो. जर सतत असे घडत राहिले तर स्मार्टफोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते आणि तुम्हाला स्मार्टफोन वारंवार चार्ज करण्याची गरज लागू शकते. तसेच या कारणांमुळे स्मार्टफोनची बॅटरी वेळे आधीच खराब होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला अधिक खर्च देखील करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फोनच्या इतर कॉम्पोनेंटवर होऊ शकतो परिणाम

कव्हरमध्ये हिट ट्रॅप झाल्यामुळे फोनचे ऑपरेटिंग टेंपरेचर वाढू शकते. याचा परिणाम प्रोसेसर एफिशियन्सीवर देखील होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णता आणि तापमान जास्त असल्यामुळे आधीच फोनच्या कंपोनेंट्सवर जास्त ताण पडतो. अशा परिस्थितीत जाड कव्हरचा वापर केल्याने स्मार्टफोनला नुकसान पोहोचण्याची शक्यता अधिक असते. स्मार्टफोनसाठी जाड कव्हर वापरण्याचे दुसरे नुकसान म्हणजे फोन लवकर थंड होत नाही. फोन कव्हरमध्ये व्हेंटिलेशन कठीण होते. यामुळे फोनमधील हिट बाहेर येऊ शकत नाही. तसेच बाहेरील हवा देखील फोनला थंड करण्यासाठी मदत करू शकत नाही.

साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच… 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी

फोन ओव्हर हिटिंगपासून वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

जर तुमचा स्मार्टफोन ओव्हर हीट झाला असेल तर सर्वात आधी स्मार्टफोनचे कव्हर काढा. यामुळे उष्णता बाहेर जाऊ शकेल आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे फोन लवकर थंड होऊ शकेल. तसेच जर स्मार्टफोन चार्जिंगला लावल असेल तर त्वरित चार्जर बंद करा. फोन ओव्हरहीट होत असेल तर त्याचा वापर त्वरित थांबवा. काही वेळासाठी फोन एअरप्लेन मोडवर ठेवा किंवा स्विच ऑफ करा. यामुळे फोन थंड होईल आणि चांगला परफॉर्मन्स ऑफर करेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टफोन कव्हर का वापरावे?

    Ans: स्मार्टफोन पडल्यास होणारे नुकसान कमी करण्यासाठी आणि फोनला स्क्रॅचपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कव्हर वापरले जाते.

  • Que: स्मार्टफोन कव्हरमुळे फोनचे संरक्षण होते का?

    Ans: होय, चांगल्या दर्जाचे कव्हर फोनला धक्के, स्क्रॅच आणि किरकोळ नुकसानापासून संरक्षण देते.

  • Que: कोणते स्मार्टफोन कव्हर सर्वात चांगले असते?

    Ans: हे वापरकर्त्याच्या गरजांवर अवलंबून असते. सिलिकॉन, TPU, हार्ड बॅक आणि रग्ड कव्हर हे लोकप्रिय पर्याय आहेत.

Web Title: Is smartphone cover affect on battery what is truth read in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
4

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.