साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच... 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी
चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या Vivo TWS 5e ची किंमत CNY 229 म्हणजेच सुमारे 3,200 रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन Vivo TWS 5e ईअरबड्स इंक ब्लॅक, तियानक्विंग आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे वायरलेस हेडसेट आता चीनमध्ये विवोच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने चीनमध्ये लाँच केलेल्या नव्या Vivo TWS 5e ईअरबड्समध्ये 11mm चे डायनामिक ड्राइवर्स दिले आहेत आणि हे एएसी, एसबीसी आणि एलसी 3 ऑडियो कोडेक्सला सपोर्ट करतात. लाँच करण्यात आलेल्या नव्या ईअरबड्समध्ये विवोचे DeepX 3.0 स्टीरियो साउंड इफेक्ट्स आणि स्पॅटियल ऑडियोचा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे ईअरबड्स म्युझिक, चित्रपट आणि गेमिंगदरम्यान जास्त इमर्सिव लिसनिंग एक्सपीरियंस ऑफर करतात.
नॉईज कँसलेशनबद्दल बोलायचं झालं तर, Vivo TWS 5e ईअरबड्स 55dB पर्यंत हाइब्रिड अडाप्टिव ANC ऑफर करतात. याव्यतिरिक्त, ईयरफोन्स डुअल-माइक्रोफोन AI कॉल नॉईज रिडक्शनला देखील सपोर्ट करतात. विवोने असा दावा केला आहे की, ईअरबड्स सभोवतालच्या वातावरणानुसार आणि परिस्थितीनुसार नॉईज कॅन्सलेशनची लेवल आपोआप एडजस्ट करू शकतात. नव्या डिव्हाईसच्या कनेक्टिविटी ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo TWS 5e ब्लूटूथ 5.4 कनेक्टिविटी आणि डुअल-डिवाइस पेयरिंगला सपोर्ट करतात. या ईअरबड्सची वायरलेस रेंज 10 मीटरपर्यंत आहे आणि यामध्ये एक लो-लेटेंसी मोड देखील मिळणार आहे, जो फुल-लिंक लेटन्सी 42ms पर्यंत कमी करतो.
कंपनीने असा दावा केला आहे की, हे ईयरबड्स सिंगल चार्जवर 13 तासांचा प्लेबॅक ऑफर करतात. तर चार्जिंग केससह एकूण बॅटरी लाईफ 55 तासांपर्यंत वाढते. ते यूएसबी टाइप-सीद्वारे चार्जिंगला सपोर्ट करतात. प्रत्येक इअरबडचे डायमेंशन 31.1×21.9×23.2 मिमी असून त्याचे वजन अंदाजे 4.3 ग्रॅम आहे, तर चार्जिंग केसचे माप 63×47.8×27.3 मिमी आहे. केससह, Vivo TWS 5e चे वजन अंदाजे 43 ग्रॅम आहे.






