Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूकंप आला? घाबरण्याची गरज नाही, आता हवेतच उडणार तुमचं घर! या देशातील नवीन तंत्रज्ञान

जपान आणि म्यानमारसारख्या देशांमध्ये भूकंपाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भूकंपामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जिवीत आणि वित्तहानी देखील होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2025 | 12:33 PM
भूकंप आला? घाबरण्याची गरज नाही, आता हवेतच उडणार तुमचं घर! या देशातील नवीन तंत्रज्ञान

भूकंप आला? घाबरण्याची गरज नाही, आता हवेतच उडणार तुमचं घर! या देशातील नवीन तंत्रज्ञान

Follow Us
Close
Follow Us:

भूकंपाच्या घटना अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भूकंपामुळे मोठं नुकसान होत असून लोकांचे जीव देखील जात आहेत. याच सर्व घटना लक्षात घेऊन जपानने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे जे आश्चर्यकारक आहे. जपानमध्ये असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, जे भूकंपासून लोकांचं संरक्षण करण्यासाठी मदत करणार आहे. जपानी कंपनी एअर डॅनशिनने एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याच्या मदतीने लोक भूकंपाच्या वेळीही सुरक्षित राहू शकतात.

आता PhonePe वरून करता येणार दुसऱ्यांसाठी पेमेंट, कंपनीने आणलं UPI Circle फीचर

कंपनीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने, भूकंपाच्या वेळी तुमचे घर हवेत म्हणजेच जमिनीपासून काही सेंटीमीटर वर येईल. अशा परिस्थितीत भूकंपाचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे घरातील सर्व नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल आणि यामुळे मोठं नुकसान टळणार आहे. ज्यावेळी भूकंप येईल, त्यावेळीच तुमचं घर हवेत उडणार आणि बाकीवेळी घर जमिनीवरच राहणार आहे. हे अनोखं तंत्रज्ञान लोकांसाठी प्रतंड फायद्याचं ठरणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य दिवसांमध्ये, हे तंत्रज्ञान घर जमिनीवर ठेवेल परंतु भूकंप होताच आणि पृथ्वी कंप पावताच, ते सक्रिय होईल आणि घर जमिनीपासून काही अंतरावर वर जाऊन हवेत थांबेल. या तंत्रज्ञानामध्ये, जेव्हा भूकंपामुळे पृथ्वी कंप पावते, तेव्हा ही प्रणाली एअरबॅगमधील हवा खूप वेगाने दाबण्यास सुरुवात करते, एअरबॅग्ज फुगतात आणि घर जमिनीपासून काही सेंटीमीटर वर येते, त्यामुळे घर कोसळण्याचा धोका टळतो आणि घरातील व्यक्तिंना इजा होत नाही आणि घरातील सामानाची हानी देखील होत नाही.

ते कसे काम करते?

या तंत्रज्ञानाबद्दल एअर डॅनशिन सिस्टम्स इंकने दिलेल्या माहितीनुसार, ते घराला सुमारे 3 सेंटीमीटर उंचीवर घेऊन जाते. भूकंपानंतर फक्त 5 सेकंदात ही संपूर्ण प्रक्रिया घडते. जेव्हा भूकंपाचे कंपने थांबतात तेव्हा ते घराला लगेच जमिनीवर आणते.

Garena Free Fire MAX च्या आजच्या कोड्ससह प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स, अशा प्रकारे करा रिडीम

2021 मध्ये चाचणी यशस्वी झाली

2021 मध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली, जी यशस्वी झाली. त्यावेळी काही घरांमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली होती. 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला तेव्हा ही तंत्रे यशस्वीरित्या काम करत असल्याचे दिसून आले. ज्या घरांमध्ये हे तंत्र वापरले गेले तेथे कोणतेही नुकसान झाले नाही.

जपानमध्ये एक भयानक भूकंप होणार आहे.

म्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाने संपूर्ण जग हादरले आहे. येथे हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. जपानलाही भूकंपाचा सामना करावा लागू शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. जपान सरकारने एक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये देशाला भूकंपाचा सामना करावा लागू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे त्सुनामी येऊ शकते ज्यामुळे मोठा विनाश होऊ शकतो. शेकडो इमारती कोसळू शकतात आणि अंदाजे 3,00,000 लोक मृत्युमुखी पडू शकतात.

Web Title: Japan launch new technology where your house will fly in the sky at the time of earthquake tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • Earthquake
  • Japan
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
2

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
3

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले
4

Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.