
Jio Airtel Recharge Price Hike: स्वस्त डेटा विसरा? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गेल्या काही वर्षांत टेलिकॉम कंपन्यांनी अनेक वेळा त्यांच्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. आता पुन्हा एकदा दरवाढीची चर्चा सुरू झाली असून, यामागे काही महत्त्वाची कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पुढील 3 ते 4 महिन्यांत रिचार्जच्या किमतीत 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
जर दरवाढ झाली तर…
🚨 Jio and Airtel to increase mobile plan prices by 12% to 15% within the next 3 to 4 months.(Centrum report) pic.twitter.com/KZ7B7ER3Xf — Indian Tech & Infra (@IndianTechGuide) August 4, 2026
सध्या Jio किंवा Airtel यांनी नवीन दरवाढीची अधिकृत घोषणा केलेली नाही. दरवाढीबाबतची माहिती ही दूरसंचार क्षेत्रातील संशोधन अहवाल आणि तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित आहे. कंपन्यांकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच नवीन रिचार्ज दर लागू होतील.
eSIM की फिजिकल SIM? नवीन फोन घेण्यापूर्वी दोन्हीमधला फरक नक्की समजून घ्या….
मोबाईल सेवा आज प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. मात्र वाढती 5G गुंतवणूक, इंटरनेटचा वाढता वापर आणि बदलती बाजारपेठ पाहता भविष्यात रिचार्जच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी ग्राहकांनी येत्या काही महिन्यांत रिचार्ज महाग होण्याची शक्यता लक्षात ठेवून नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते.