Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेटा नकोय? आता खरेदी करा फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन्स… TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा

टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने ग्राहकांसाठी मोठा दिलासा देत एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे. सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये कॉलिंग आणि SMS वर आधारित स्वस्त प्लॅन्स सादर करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2026 | 12:20 PM
डेटा नकोय? आता खरेदी करा फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन्स... TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा

डेटा नकोय? आता खरेदी करा फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन्स... TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा

Follow Us
Follow Us:
  • डेटा नको? तरीही द्यावे लागतात जास्तीची पैसे? चिंता नको… TRAI च्या नव्या निर्णयाचा ग्राहकांना होणार फायदा, नवे प्लॅन्स होणार सादर
  • TRAI च्या नव्या प्रस्तावानुसार आता फक्त कॉलिंग आणि SMSसाठी स्वस्त प्लॅन्स उपलब्ध होऊ शकतात.
  • जियो, एयरटेल आणि व्हिआय कंपन्यांना प्रत्येक व्हॅलिडिटीसाठी वेगळे व्हॉइस-एसएमएस प्लॅन्स सादर करावे लागू शकतात.
खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हिआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नव्या नियमांचा प्रस्ताव सादर केला आहे. या नव्या नियमांतर्गत टेलीकॉम ऑपरेटर्सना असे बजेट फ्रेंडली मोबाईल प्लॅन्स सादर करावे लागणार आहे, जे केवळ व्हॉईस आणि एसएमएस सर्विसवर फोकस करणार आहे. सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव ‘टेलीकॉम कंज्यूमर प्रोटेक्शन रेगुलेशन, 2026’ मधील सुधारणेचा एक भाग आहे. याचा उद्देश किंमतींमध्ये पारदर्शकता आणणे आणि ग्राहकांना प्लॅन्स निवडण्यासाठी आकर्षित करणं असा आहे.

AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास

रिपोर्ट्सनुसार, टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सादर केलेल्या प्रस्तावात सांगण्यात आलं आहे की, पूर्वी ऑपरेटर्सना केवळ व्हॉइस आणि एसएमएसचा समावेश असलेले विशेष टॅरिफ व्हाउचर (STV) सादर करण्यात सांगितलं जात असले तरी, बाजारात उपलब्ध असलेले पर्याय अजूनही मर्यादित आहेत आणि डेटाचे फायदे समाविष्ट नसतानाही हे प्लॅन्स अनेकदा अवाजवी दरात मिळतात. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायला असे आढळून आले आहे की, सध्याच्या उपाययोजनांमधून अपेक्षित परिणाम मिळालेले नाहीत, त्यामुळे आणखी कठोर मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे.

नव्याा प्रस्तावाअंतर्गत, व्हिआय, जिओ आणि एअरटेल सारख्या टेलिकॉम कंपन्यांना प्रत्येक त्या व्हॅलिडिटीसाठी एक डेडिकेटेड ‘केवळ व्हॉईस आणि एसएमएस’ प्लॅन सादर करावा लागण्याची शक्यता आहे, जे आता केवळ डेटा असलेल्या प्लॅनसाठी उपलब्ध आहे. याचा अर्थ आहे की, ग्राहकांना लवकरच असे व्हॉईस आणि एसएमएस प्लॅन्स देखील मिळू शकतात, ज्यांची व्हॅलिडिटी डेटा प्लॅन्सच्या व्हॅलिडिटी इतकी असू शकते. त्यामुळे इंटरनेट सर्विसेजसाठी ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

ट्रायचं असं मत आहे की, या निर्णयामुळे योग्य दर सुनिश्चित केले जाणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पीआयबी इंडियाने लिहीले आहे की, रेगुलेटरचं असं मत आहे की, या मुद्यावर फोकस करणं गरजेचं आहे. सोप्याा भाषेत सांगायचे झाले तर कंपन्या सध्या डेटा पॅकसाठी 28, 56 आणि 84 दिवसांची व्हॅलिडीटी असलेले प्लॅन्स सादर करत आहे.

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

आता टेलिकॉम कंपन्यांना इतकीच व्हॅलिडीटी असलेले प्लॅन्स अशा ग्राहकांसाठी सादर करावे लागणार आहे, ज्यांना डेटाची आवश्यकता नसते तर केवळ कॉलिंग आणि एसएमएसची गरज आहे. ट्रायच्या या निर्णयानंतर आता ग्राहकांना केवळ जास्त व्हॅलिडीटी मिळावी म्हणून गरज नसलेले डेटा प्लॅन्स खरेदी करण्याची आवश्यकता नाही. आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, डेटाप्रमाणे ज्या यूजर्सना एसएमएसची देखील आवश्यकता नसते, त्यांच्यासाठी देखील कोणता नवीन नियम जारी केला जाणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नसली तरी सध्या सर्व यूजर्सचे लक्ष ट्रायच्या निर्णयाकडे लागले आहे.

Web Title: Jio airtel vi users may get relief as company will introduce budget friendly voice and sms plans after trai proposes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • airtel
  • jio
  • Tech News

संबंधित बातम्या

अखेर कीबोर्डचे रहस्य उलघडलेच! ABCDE ऐवजी QWERTY क्रम का? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

अखेर कीबोर्डचे रहस्य उलघडलेच! ABCDE ऐवजी QWERTY क्रम का? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित

भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर
2

भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव
3

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार
4

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.