जिओ युजर्सासाठी धमाकेदार दिवाळी ऑफर, कंपनी वर्षभरासाठी देणार फ्री 5G इंटरनेट! फक्त करावं लागणार हे काम
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी दिवाळी धमाका ऑफर लाँच केली आहे. यामध्ये युजर्सना एक वर्षापर्यंत मोफत 5G डेटाचा लाभ घेता येणार आहे. मात्र यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. ग्राहकांना रिलायन्स डिजिटल स्टोअर किंवा माय जिओ स्टोअरमधून खरेदी करावी लागणार आहे. या खरेदीवेळी कंपनी काही युजर्सची निवड करणार आहे. ज्यांची निवड केली जाईल, अशा युजर्सना एक वर्षापर्यंत मोफत 5G डेटाचा लाभ घेता येणार आहे.
हेदेखील वाचा- मुकेश अंबानींची खास दिवाळी ऑफर! केवळ 699 रुपयांच्या किंमतीत खरेदी करा Jio Bharat 4G फोन
दिवाळीच्या निमित्ताने रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक अप्रतिम भेट दिली आहे. कंपनीने जिओ यूजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. ज्यामध्ये यूजर्सना वर्षभरासाठी फ्री 5G डेटाचा फायदा मिळू शकतो, पण या दिवाळी ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सना एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. तरच युजर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत. जिओच्या दिवाळी धमाका ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना दिलासा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
जिओची दिवाळी धमाका ऑफर काय आहे आणि डेटा फायदे मिळविण्यासाठी काय करावे, येथे आम्ही सांगणार आहोत. या फेस्टिव्ह सीझनमध्ये जिओने आणखी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि माय जिओ स्टोअरमधून 20,000 रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. या खरेदीवेळी काही युजर्सची निवड केली जाईल. या युजर्सना वर्षभरासाठी मोफत 5G इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. लक्षात ठेवा की या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल, कारण याचा लाभ 3 नोव्हेंबरपर्यंतच घेता येईल.
हेदेखील वाचा- मुकेश अंबानींची दिवाळी ऑफर! केवळ 12 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन या हा लॅपटॉप
जिओ कंपनी एअर फायबर प्लॅनवर विशेष डील देखील देत आहे. दिवाळी धमाका ऑफर अंतर्गत, ग्राहकांना 2,222 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी Jio Air Fiber सेवा मिळेल.
जिओच्या दिवाळी ऑफरमध्ये आणखी एक ऑफर आहे. कंपनी एअर फायबर वापरकर्त्यांना नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान रिचार्ज करण्यासाठी 12 कूपन देणार आहे. ही कूपन अॅक्टिव्ह जिओ एअर फायबर प्लॅनच्या समान असतील आणि ती रिलायन्स डिजिटल, मायजिओ ॲप, जिओ पॉइंट्स किंवा जिओ मार्ट डिजिटलसह अन्य स्टोअर्सवर वापरली जाऊ शकतात. ज्यामुळे तुम्ही खूप बचत करू शकता.
याशिवाय Jio ने दिवाळीच्या मुहूर्तावर JioBharat 4G फोनची किंमत 999 रुपयांवरून 699 रुपयांपर्यंत कमी केली आहे. ही ऑफर देखील मर्यादित कालावधीसाठी दिली जात आहे. या फीचर फोनमध्ये ऑनलाइन पेमेंटसह अनेक विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.