Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड
रिलाअंस जिओच्या 550 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 84 रुपये आहे. हा प्लॅन 90GB 4G डेटासह येतो. हा प्लॅन केवळ अशा लोकांसाठी काम करणार आहे, ज्यांच्याकडे 3 महिने किंवा एक वर्षाची व्हॅलिडीटी असलेला प्रीपेड प्लॅन ॲक्टिव्ह आहे. हा केवळ एक डेटा पॅक आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना ओटीटी सब्सक्रिप्शन्सचा फायदा मिळणार आहे. ज्यामध्ये यूट्यूब प्रीमियम, ॲमेझॉन प्राइम लाइट, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी५, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सनएनएक्सटी, कांचा लंका, ईटीव्ही विन, चौपाल, होइचोई, फॅनकोड, टाइम्स प्ले, तरंग प्लस आणि जिओटीव्ही यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
या प्लॅन्ससह जिओटिव्ही मोबाईल ॲपद्वारे 1000 हून जास्त लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. जर तुमच्या बेस प्रीपेड प्लॅनमध्ये 5G समाविष्ट नसेल तर या प्लॅनद्वारे तुम्हाला 5G मध्ये अपग्रेड केले जाणार आहे. तुम्हाला 84 दिवसांपर्यंत किंवा तुमचा मूळ प्लॅन संपेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत 5 जी (5G) सेवा मिळत राहील.
रिलाअंस जिओच्या 2000 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची आहे. हा डेटा वाउचर यूजर्सना 365GB डेटा ऑफर करणार आहे. हा प्लॅन केवळ अशा लोकांसाठी काम करणार आहे, ज्यांच्याकडे एका वर्षाची व्हॅलिडीटी असलेला बेस प्रीपेड प्लॅन आहे. जर तुमच्या बेस प्रीपेड प्लॅनमध्ये 5G नसेल तर या प्लॅनद्वारे तुम्हाला 5G मध्ये अपग्रेड केले जाणार आहे. तुम्हाला 84 दिवसांपर्यंत किंवा तुमचा मूळ प्लॅन संपेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत 5जी सेवा मिळत राहील.
या प्लॅनसोबत बंडल करण्यात आलेल्या ओटीटी फायद्यांमध्ये युट्यूब प्रीमियम, ॲमेझॉन प्राइम लाइट, जिओ-हॉटस्टार, सोनी-लिव्ह, झी-5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सनएनएक्सटी, कांचा लंका, ईटीव्ही विन, चौपाल, होइचोई, फणसोडे, टाइम्स प्ले, तरंग प्लस आणि जिओटिव्ही यांचा समावेश आहे. जिओटिव्ही ॲपसोबत तुम्हाला 1000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सही मिळतील.






