Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे

JioHotstar New Plans: जिओ हॉटस्टारने त्यांच्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. वर्षभराच्या प्रिमियम प्लॅनसाठी आता 1,499 रुपयांऐवजी 2,199 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2026 | 10:41 AM
OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे

OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे

Follow Us
Close
Follow Us:
  • JioHotstar युजर्ससाठी महत्त्वाची बातमी
  • JioHotstar च्या नव्या दरांची युजर्समध्ये चर्चा
  • OTT सब्सक्रिप्शनमध्ये मोठा बदल!
ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टार यूजर्ससाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमतीमध्ये मोठा बदल केला आहे. मोबाईल, सुपर आणि प्रिमियम अशा तिन्ही कॅटेगिरीमधील प्लॅन्सच्या किंमती आता वाढवण्यात आल्या आहेत. याबाबत कंपनीने सोमवारी घोषणा केली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा सर्व यूजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. याशिवाय प्लॅनमध्ये मिळणाऱ्या कंटेटमध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत. कंपनीचे हे नवीन प्लॅन्स 28 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत. मोबाईल, सुपर आणि प्रीमियम प्लॅन्स आता मंथली, क्वार्टरली, एनुअल ऑप्शनसह खरेदी केले जाऊ शकतात. मोबाईल आणि सुपर कॅटेगरी सब्सक्रिप्शनमध्ये जाहिराती पाहायला मिळणार आहेत.

Lava Blaze Duo 3: दोन डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि तगडा कॅमेरा… नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत खिशाला परवडणारी

हॉलीवूडसाठी नवा नियम

आता नवीन यूजर्ससाठी हॉलीवुड कंटेंट केवळ ‘सुपर’ आणि ‘प्रीमियम’ प्लॅन्समध्ये उपलब्ध असणार आहेत. मोबाईल यूजर्सना जर हॉलीवूड चित्रपट पाहायचे असतील तर त्यांना एक वेगळा ‘अ‍ॅड-ऑन’ पॅक खरेदी करावा लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

जिओ हॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन

जिओ हॉटस्टार मोबाईल प्लॅन केवळ एकाच डिव्हाईससाठी उपलब्ध आहे. या प्लॅनची मंथली किंमत 79 रुपये आहे. तर या प्लॅनची क्वार्टरली किंमत 149 रुपये आणि हा प्लॅन वर्षभरासाठी खरेदी करायचा असेल तर 499 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या सब्सक्रिप्शनमध्ये 720p HD रेजोल्यूशन सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओ हॉटस्टार मोबाईल प्लॅनमध्ये यूजर्सना हॉलीवुड कंटेंटसाठी एक वेगळा ‘अ‍ॅड-ऑन’ पॅक खरेदी करावा लागणार आहे. ज्याची मंथली किंमत 49 रुपये, क्वार्टरलीसाठी 129 रुपये आणि वर्षभरासाठी 399 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

जिओ हॉटस्टार सुपर सब्सक्रिप्शन

जिओ हॉटस्टार सुपर सब्सक्रिप्शनमध्ये दोन डिव्हाईस सपोर्ट मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 1080p फुल HD कंटेंट पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही टिव्हीसाठी जिओ हॉटस्टार सब्सक्रिप्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सर्वात परवडणारा प्लॅन आहे. या प्लॅनची मंथली किंंमत 149 रुपये आहे. याशिवाय या प्लॅनची क्वार्टरली किंंमत 349 रुपये आहे. वर्षभरासाठी हा प्लॅन खरेदी करायचा असेल तर 1099 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये हॉलीवुड कंटेंटसाठी ‘अ‍ॅड-ऑन’ पॅक खरेदी करावा लागणार नाही.

iPhone 17e: Apple चा मास्टरस्ट्रोक? या दिवशी लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन! स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स आले समोर

जिओ हॉटस्टार प्रीमियम सब्सक्रिप्शन

जिओ हॉटस्टार प्रीमियम सब्सक्रिप्शनमध्ये यूजर्सना 4 डिव्हाईस कनेक्ट करता येणार आहेत. यासोबतच यूजर्स 4K रेजोल्यूशन आणि डॉल्बी व्हिजनमध्ये कंटेट पाहू शकणार आहेत. या प्लॅनची मंथली किंमत 299 रुपये आहे. तर क्वार्टरली या प्लॅनसाठी 699 रुपये आणि वर्षभरासाठी 2199 रुपये खर्च करावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त, प्रीमियम सबस्क्रिप्शन असलेल्या यूजर्सना जाहिरात-मुक्त कंटेंट अनुभव मिळणार आहे. तथापि, लाईव्ह स्पोर्ट्स आणि इतर लाईव्ह इव्हेंट्स दरम्यान जाहिराती दिसतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: JioHotstar ने सब्सक्रिप्शन प्लॅन्स का बदलले?

    Ans: वाढती कंटेंट कॉस्ट, स्पोर्ट्स राइट्स आणि प्रीमियम शोमुळे सब्सक्रिप्शन प्लॅन्स रिवाइज करण्यात आले आहेत.

  • Que: JioHotstar चा मंथली प्लॅन किती रुपयांचा आहे?

    Ans: नवीन दरांनुसार मंथली प्लॅनसाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात (प्लॅननुसार किंमत वेगळी असते).

  • Que: आधीचे सब्सक्रायबर्सना नवीन दर लागू होतील का?

    Ans: सध्याचा प्लॅन संपल्यानंतर नवे दर लागू होतील. तोपर्यंत जुना प्लॅन वैध राहतो.

Web Title: Jiohotstar increase subscription plan prices of mobile super premium check here new prices list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • JioHotstar
  • OTT platform
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: नव्या अपडेटसह गेममध्ये झाली 3 जबरदस्त बंडल्सची एंट्री! तुमच्या कॅरेक्टरला असा द्या डॅशिंग लूक
1

Free Fire Max: नव्या अपडेटसह गेममध्ये झाली 3 जबरदस्त बंडल्सची एंट्री! तुमच्या कॅरेक्टरला असा द्या डॅशिंग लूक

WhatsApp Update: हॅकर्सची झोप उडवा! फक्त एक सेटिंग आणि तुमचं WhatsApp अकाऊंट होईल सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर
2

WhatsApp Update: हॅकर्सची झोप उडवा! फक्त एक सेटिंग आणि तुमचं WhatsApp अकाऊंट होईल सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर
3

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर

मराठी मालिकेतून हिंदी वेबविश्वात अक्षया नाईकची यशस्वी झेप, तस्करी भूमिका ठरतेय चर्चेचा विषय
4

मराठी मालिकेतून हिंदी वेबविश्वात अक्षया नाईकची यशस्वी झेप, तस्करी भूमिका ठरतेय चर्चेचा विषय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.