AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
आजच्या डिजीटल काळात यूजर्स केवळ एका AI पुरते मर्यादित राहिलेले नाही. कामानुसार वेगवेगळी AI टूल्स आणि असिस्टंट्स वापरणं ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र प्रत्येक नवीन टूलला पुन्हा “मी कोण आहे”, “माझं काम काय आहे” किंवा “याआधी आपण काय बोललो होतो” हे समजावून सांगणं वेळखाऊ ठरू शकतं. Kemory याच ठिकाणी काम करते. ती कोणत्याही एका AI मॉडेलवर अवलंबून नसल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचं ज्ञान एका ठिकाणी जतन करून ठेवता येतं आणि गरजेनुसार वेगवेगळ्या AI टूल्सना त्यासाठी परवानगी देता येते.
“Kemoryसाठी भारत ही नंतरची बाजारपेठ नाही; भारत हाच बाजार आहे. जेव्हा वापरकर्त्यांकडे त्यांचं स्वतःचं ज्ञान असतं आणि ते ज्ञान ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात, तेव्हा प्रत्येक AI मॉडेलला शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही. ते आधीपासून उपलब्ध असलेल्या संदर्भापासून पुढे काम करू शकतं,” असं सचिन देव दुग्गल, संस्थापक आणि सीईओ, सिकॉडब्रेन यांनी सांगितलं.
सिकॉडब्रेनच्या मते, Kemoryचा मुख्य भर तीन गोष्टींवर आहे. ज्यामध्ये ज्ञानाची मालकी, परवानगीवर आधारित प्रवेश आणि AI मॉडेल्सपासून स्वतंत्र राहण्याची क्षमता यांचा समावेश आहे. कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार, सार्वजनिक लाँगमेमइव्हॅल -एसच ओरॅकल बेंचमार्क वर Kemoryने 89.6% अचूकता मिळवली. म्हणजेच 500 पैकी 448 प्रश्नांची अचूक उत्तरं देण्यात आली. हा निकाल केवळ मेमरीमधून योग्य माहिती शोधण्याची क्षमता मोजत नाही, तर माहिती शोधणे, उत्तर तयार करणे आणि त्या उत्तराचं मूल्यांकन करणे या संपूर्ण प्रक्रियेतील कामगिरी दर्शवतो.
Kemoryची निर्मिती “फॉर इंडिया, फ्रॉम इंडिया” या विचारातून करण्यात आली आहे. भारतीय वापरकर्त्यांचा डेटा भारतातील सर्व्हरवर साठवला जातो, असं कंपनीने सांगितलं आहे. सार्वजनिक बीटा आवृत्तीमध्ये वापरकर्त्यांना क्रोमसाठी कोरा, दोन कनेक्टेड एआय, 2,000 पर्यंत ममोरीज आणि चॅट्स आणि फेअर यूज क्रेडिट्स मोफत मिळणार आहेत. Kemoryची सार्वजनिक बीटा आवृत्ती आता भारतातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
सिकॉडब्रेन AI, माणसं आणि ज्ञानाच्या टीम्ससाठी एक शेअर्ड इंटेलिजन्स लेअर विकसित करत आहे. कंपनीचं न्यूरोसिम्बॉलिक मेमरी आणि रीझनिंग लेयर हे AI मॉडेल्सच्या वर आणि वापरकर्ते किंवा संस्था वापरत असलेल्या एजेंट्ल आणि टूल्सच्या खाली काम करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. यामागची कल्पना साधी आहे की, प्रत्येक नवीन संभाषणात AIने पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्याऐवजी, आधीपासून तयार झालेल्या संदर्भ आणि ज्ञानाच्या आधारावर पुढे काम करावं.
काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा
Kemory ही सिकॉडब्रेनच्या भविष्यातील शेअर्ड मेमरी इंफ्रास्ट्रक्चरमधील पहिली लेअर आहे आणि कंपनीने तिची सुरुवात ममरीपासून केली आहे. माहितीच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण होणारी गुंतागुंत कमी करून जगभरातील विचार करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या ज्ञानाचा अधिक चांगला वापर करता यावा, हे कंपनीचं व्यापक ध्येय आहे. सिकॉडब्रेन कॉग्निटिवो नावाच्या फ्लॅट टीम स्ट्रक्चर मध्ये काम करते. या पद्धतीमध्ये स्पेशालिस्ट सायलोझ किंवा केवळ मॅनेजमेंट रोल्सवर भर न देता, प्रत्येक सदस्याला उत्पादनाच्या निर्मितीत थेट सहभागी होण्याची आणि आपल्या कामाची एंड-टू-एंड जबाबदारी घेण्याची संधी दिली जाते.






