
जगातील पहिल्या द्विभाषिक ‘आयटी करिअर गुरू’ एआय चॅटबॉटचे लोकार्पण
आयटी क्षेत्रातील क्रांतिकारक घटना
मराठी आणि इंग्रजी भाषेत मिळणार उत्तरे
पुणे: डिजिटल साक्षरता दिनाचे निमित्त साधून कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता आणि प्रादेशिक भाषांचे सशक्तीकरण यांचा समन्वय साधणाऱ्या ख्यातनाम संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूरयांच्या द्विभाषिक ‘आयटी करिअर गुरू’ या जगातील पहिल्या चॅटबॉटचे १७ मार्च रोजी लोकर्पण करण्यात आले. आयटी क्षेत्रातील (Pune News) विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल हा चॅटबॉट मराठी व इंग्रजी भाषेत संवाद साधण्यात सक्षम आहे.
आयटी क्षेत्रातील क्रांती ठरणाऱ्या ‘आयटी करिअर गुरू’ या चॅटबॉटचे लोकार्पण पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. दीपक शिकारपूर यांच्यासह बेलराईज इंडस्ट्रिजच्या सुप्रिया बडवे, दिमाखकन्सल्टंट्सचे दिमाख सहस्रबुद्धे, गौरी शिकारपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. मल्टिव्हर्सिटी, बावधन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
AIमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ; CM देवेंद्र फडणवीसांना विश्वास
या उपक्रमाला शुभेच्छा देताना पद्मभूषण डॉ. विजय भटकर म्हणाले, एखाद्या तज्ज्ञाची शिकविण्याची शैली आणि ज्ञान डिजिटल स्वरूपात जतन करून ते सर्वांसाठी उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज आहे. ‘आयटी करिअर गुरू’ हे त्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे.
चॅटबॉट विषयी माहिती देताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, हा अभिनव द्विभाषिक एआय चॅटबॉट विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शक ठरणार असून याचा वापर अभियांत्रिकी, उत्पादन आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रभावीपणे होऊ शकतो. आजच्या काळातील डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेऊन दिमाख कन्सल्टंट्सच्या सहकार्याने याची निर्मिती करण्यात आली आहे.
“शासन यंत्रणेत AI चा वापर वाढवून सक्षम…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
AI मुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत क्षयरोग (TB), मातृ, नवजात व बाल आरोग्य (MNCH), प्राथमिक आरोग्य सेवा, ई-हेल्थ आदी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे.