Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी

Lava Smartphone Launched: लावाने लावा बोल्ड एन1 5जीचे नवीन व्हेरिअंट भारतात लाँच केले आहे. बजेट सेगमेंटमध्ये येणारा हा स्मार्टफोन कमी किमतीत जास्त फीचर्स देत असल्याने ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2026 | 12:36 PM
देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी

देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी

Follow Us
Close
Follow Us:
  • Lava ने Lava Bold N1 5G चा 6GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात 12,999 रुपयांत लाँच केला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच 90Hz डिस्प्ले, युनिसॉक T765 प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • AI कॅमेरा, 5G कनेक्टिव्हिटी आणि IP54 रेटिंगसह हा फोन बजेट सेगमेंटमध्ये चांगला पर्याय ठरू शकतो.
भारतातील टेक कंपनी लावाने काही महिन्यांपूर्वी Lava Bold N1 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचे एक नवीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट लाँच केले आहे. कंपनीने लावा बोल्ड एन1 5जी स्मार्टफोन आता भारतात 6GB रॅम+ 128GB स्टोरेज या नव्या व्हेरिअंटमध्ये सादर केला आहे. स्मार्टफोन अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आल्यानंतर काही महिन्यांनी आता कंपनीने एक नवीन वर्जन सादर केले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या व्हेरिअंटची किंमत 13 हजारांहून कमी आहे. ग्राहकांना लाँच ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नव्या स्मार्टफोन व्हेरिअंटबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Infinix GT 50 Pro ची धमाकेदार एंट्री! गेमर्ससाठी ठरणार खास; दमदार परफॉर्मन्स, GT ट्रिगर्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज

भारतात लावा बोल्ड एन1 5जी ची किंमत

नुकत्याच लाँच झालेल्या लावा बोल्ड एन1 5जी च्या 6GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री 1 मेपासून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सुरु होणार आहे. ग्राहक शॅम्पेन गोल्ड आणि रॉयल ब्लू या दोन रंगात हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. लाँच ऑफरअंतर्गत, ग्राहक स्मार्टफोनचे नवीन व्हेरिअंट केवळ 11,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. यापूर्वी कंपनीने या स्मार्टफोनचे 4GB + 64GB आणि 4GB + 128GB असे दोन व्हेरिअंट सादर केले होते. मात्र कालांतराने 4GB + 128GB व्हेरिअंट बंद करण्यात आले. त्यामुळे आता लावा बोल्ड एन1 5जी 4GB + 64GB आणि 6GB + 128GB या दोन व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – Lava) 

लावा बोल्ड एन1 5जी चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

लावा स्मार्टफोन अँड्रॉईड 15 वर चालतो आणि यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.75-इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये 2.5D ग्लास प्रोटेक्शन आहे आणि हे 20:9 चा आस्पेक्ट रेशियो ऑफर करते. यामध्ये ऑक्टा-कोर युनिसॉक T765 प्रोसेसर दिला आहे, ज्याला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. वर्चुअल रॅम फीचरच्या मदतीने न वापरलेल्या स्टोरेजचा वापर करून ऑनबोर्ड मेमरी 12GB पर्यंत वाढवता येते. ऑनबोर्ड स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

iPhone आणि iPad यूजर्ससाठी मोठं सरप्राईज! हा जबरदस्त गेम अखेर लाँच, आता मोबाईलवरच अनुभवा कन्सोलसारखा थरार

लावा बोल्ड एन1 5जी मध्ये AI-बेस्ड कॅमेरा यूनिट दिला आहे. ज्यामध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर दिला आहे. या हँडसेटमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP54 रेटिंग दिली आहे. या डिव्हाईसमध्ये फेस अनलॉक फीचर आहे आणि ऑथेंटिकेशनसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे. कनेक्टिविटीसाठी लावा स्मार्टफोनमध्ये 5G, ब्लूटूथ, वाय-फाय 802.11 बी/जी/एन/एसी, आणि ओटीजी पर्याय देण्यात आले आहेत. हँडसेटमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Lava bold n1 5g smartphone new ram and storage variant launched know about the price and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Infinix GT 50 Pro ची धमाकेदार एंट्री! गेमर्ससाठी ठरणार खास; दमदार परफॉर्मन्स, GT ट्रिगर्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज
1

Infinix GT 50 Pro ची धमाकेदार एंट्री! गेमर्ससाठी ठरणार खास; दमदार परफॉर्मन्स, GT ट्रिगर्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज

200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत
2

200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत

अखेर तो दिवस आलाच! अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅनसह Redmi स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज
3

अखेर तो दिवस आलाच! अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅनसह Redmi स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

परफेक्ट फोटो अन् प्रीमियम अनुभव! 200MP कॅमेऱ्यासह नव्या Oppo स्मार्टफोनची एंट्री, फोटोग्राफी होणार प्रो लेव्हल
4

परफेक्ट फोटो अन् प्रीमियम अनुभव! 200MP कॅमेऱ्यासह नव्या Oppo स्मार्टफोनची एंट्री, फोटोग्राफी होणार प्रो लेव्हल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.