Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहो iPhone नाही तर हा तर आहे Lava Shark! देशी स्मार्टफोन कंपनी करणार कमाल, अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येणार नवं डिव्हाईस

Lava Shark 5G: देशी स्मार्टफोन कंपनी लावा त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा नवीन स्मार्टफोन प्रचंड चर्चेत आहे, कारण त्याची डिझाईन आयफोनसारखी असणार आहे. या स्मार्टफोनबाबत अधिक जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2025 | 10:34 AM
अहो iPhone नाही तर हा तर आहे Lava Shark! देशी स्मार्टफोन कंपनी करणार कमाल, अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येणार नवं डिव्हाईस

अहो iPhone नाही तर हा तर आहे Lava Shark! देशी स्मार्टफोन कंपनी करणार कमाल, अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येणार नवं डिव्हाईस

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील स्मार्टफोन कंपनी Lava त्यांची नवीन Shark सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीची ही स्मार्टफोन सिरीज सध्या प्रचंड चर्चेत आहे. कंपनी त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Lava Shark 5G या नावाने लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची डिझाईन आयफोनप्रमाणे असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने Lava Shark 4G ही स्मार्टफोन सिरीज लाँच केली होती. त्यानंतर आता कंपनी Lava Shark 5G या स्मार्टफोन सिरीजवर काम करत आहे.

Moto ने उडवली सर्वांची झोप, बाजारात आणला प्रीमियम Foldable Smartphone! तब्बल इतकी आहे किंमत

Lava Shark 5G अनेक अपग्रेडसह येणार

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीची नवीन स्मार्टफोन सिरीज Lava Shark 5G अनेक नवीन अपग्रेडसह लाँच केली जाणार आहे. हा स्मार्टफोन फ्रेश डिजाइन आणि अधिक चांगली कनेक्टिविटीसह लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, त्याची किंमत काय असणार आहे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप अधिकृतपणे शेअर करण्यात आलेली नाही. मात्र अपकमिंग Lava Shark 5G स्मार्टफोनबाबतची काही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Lava Shark 5G चे डिझाईन कसं असणार?

अपकमिंग Lava Shark 5G स्मार्टफोन ब्लू आणि गोल्ड रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. यापूर्वी Lava Shark 4G स्मार्टफोन देखील याच रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला होता. रंग पर्याय सारखे असले तरी देखील या नवीन स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये कंपनी मोठा बदल करणार आहे, असं सांगितलं जात आहे. या आगामी स्मार्टफोनची डिझाईन आयफोनसारखी असणार आहे. या फोनच्या बॅक पॅनलमध्ये 5G चा लोगो देखील पाहायला मिळणार आहे. यासोबतच कंपनीने कॅमेरा मॉड्यूल देखील नवीन डिझाईनमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

LAVA Shark 5g Launching Soon 🔥
Most Affordable 5G Mobile 📲 #LavaShark5G@LavaMobile @reachraina pic.twitter.com/OUsl6lpixC
— Atul Tech ₿azaar 🇮🇳 (@Atulbazaar) May 15, 2025

Lava Shark 4G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 50 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा दिला होता. पण आता आगामी नवीन मॉडेलमध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. लावाच्या नवीन फोनचा कॅमेकरा मॉड्युल आयफोनसारखा असणार आहे. Lava Shark 5G बाबत असं सांगितलं जात आहे की, यामध्ये Unisoc T765 SoC असण्याची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा आहे की, हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप काही अपडेट शेअर करण्यात आले नाही. आगामी फोन अँड्रॉईड 15 वर आधारित असणार आहे. हा नवीन स्मार्टफोन 5जी कनेक्टविटीसह लाँच केला जाणार आहे.

Google मध्ये झाला बदलं, ‘Logo’ मधील G आयकॉनचा बदलला लूक! 10 वर्षांनंतर कंपनीचा मोठा निर्णय

Lava Shark 5G ची काय असणार किंमत?

या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन या महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. लावाच्या प्रोडक्ट लाइनकडे पाहता असे दिसते की हा फोन एक परवडणारा 5G डिव्हाइस असेल.

Web Title: Lava is planning for new smartphone launching which look like iphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
1

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
2

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
3

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
4

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.