Moto ने उडवली सर्वांची झोप, बाजारात आणला प्रीमियम Foldable Smartphone! तब्बल इतकी आहे किंमत
Motorola Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनी मोटोरोला इतर कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. आता मोटोरोलाने नवीन प्रिमियम फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंंमत 99 हजार रुपयांच्या घरात आहे. स्मार्टफोनचा लूक देखील क्लासी आहे. शिवाय फीचर्स देखील अत्यंत कमाल आहे. स्मार्टफोनची डिझाईन युजर्सना एक वेगळाच आत्मविश्वास देतो. कंपनीने असा दावा केला आहे की, लाँच करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन सर्वात पावरफुल AI फ्लिप फोन आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
स्मार्टफोनमध्ये वायर्ड आणि वायरलेस असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. स्मार्टफोन एक स्टोरेज व्हेरिअंट आणि तीन रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीवर अनेक ऑफर्स दिल्या जाणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: X)
नवीन Motorola Razr 60 Ultra स्मार्टफोन 16GB + 512GB या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 99,999 रुपये आहे. मात्र कंपनी निवडक बँक कार्डाच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर करणार आहे. म्हणजेच ग्राहकांना हा स्मार्टफोन 89,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 12 महिन्यांच्या नो-कॉस्ट-ईएमआई ऑप्शनवर देखील खरेदी करू शकणार आहात. हा नवीन स्मार्टफोन माउंटेन ट्रेल, रियो रेड आणि स्कारब कलरवे पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon, Reliance Digital, कंपनीची वेबसाईट आणि निवडक ऑफलाईन स्टोअरवरून खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची विक्री 21 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
Time to unlock the all-new #MotorolaRazr60ULTRA — the world’s most vibrant and powerful AI Flip phone
Sale starts 21st May, 12 PM on Amazon, Reliance Digital, https://t.co/azcEfy1Wlo, and at leading retail stores.
— Motorola India (@motorolaindia) May 13, 2025
मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 7 इंचाचा 1.5K pOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 165Hz रिफ्रेश रेट आणि 4,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली जाते. यासोबतच फोन HDR10+ आणि डॉल्बी विजनला देखील सपोर्ट करतो. दुसरा डिस्प्ले 4 इंचाचा आहे आणि हा देखील एक pOLED LTPO कवर स्क्रीन आहे. ज्यामध्ये तुम्हाला 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली जाते. हे नवीन डिव्हाईस 165Hz रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करते.
फोनमध्ये आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेजने सुसज्ज आहे. डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 15-बेस्ड हॅलो UI देण्यात आली आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये तीन मोठे OS अपग्रेड आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट दिले आहेत. एवढंच नाही तर फोनमध्ये मोटो AI 2.0 फीचर्स आणि एक डेडिकेटेड मोटो AI Key दिली जाते.
Google मध्ये झाला बदलं, ‘Logo’ मधील G आयकॉनचा बदलला लूक! 10 वर्षांनंतर कंपनीचा मोठा निर्णय
स्मार्टफोनचा कॅमेरा देखील जबरदस्त आहे, ज्यामध्ये तुम्हाला f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्ट वाला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.0 अपर्चरवाला 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला जातो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये f/2.0 अपर्चर वाला 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.