Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी कंपनीचा नवीन धमाका! 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Lava Virat V1 5G Launched: भारतीय स्मार्टफोन निर्माताने बजेट सेगमेंटमध्ये दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कमी किमतीत 120Hz डिस्प्ले, मोठी बॅटरी, क्लीन अँड्रॉईड अनुभव आणि आकर्षक ऑफर्समुळे हे दोन्ही फोन ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2026 | 11:24 AM
देशी कंपनीचा नवीन धमाका! 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

देशी कंपनीचा नवीन धमाका! 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • लावाने भारतात विराट व्हि 1 5G आणि विराट व्हि 1 हे दोन बजेट स्मार्टफोन लाँच केले.
  • विराट व्हि 1 5G मध्ये 120Hz डिस्प्ले, 6,000mAh बॅटरी तर विराट व्हि 1 मध्ये 5,000mAh बॅटरी आणि युनिसॉक SC9863A चिपसेट देण्यात आला आहे.
  • दोन्ही स्मार्टफोनची विक्री 31 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि लावाच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे.
Lava Smartphone Launched: भारतीय टेक कंपनी Lava ने इंडियन मार्केटमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Lava Virat V1 5G आणि Lava Virat V1 यांचा समावेश आहे. लावाचा नवीन स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या भागिदारीत तयार करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत 15 हजारांहून कमी आहे. या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

ॲक्टिव्ह कूलिंग फॅन अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Oppo स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, असे आहेत खास फीचर्स

लावा विराट व्हि 1 सिरीजची किंमत आणि ऑफर्स

लावा विराट व्हि 1 5G आणि लावा विराट व्हि 1 या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 31 जुलैपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि लावा वेबसाईटवरून खरेदी करू शकणार आहेत. कंपनी लाँच ऑफरअंतर्गत स्मार्टफोनच्या खरेदीवर 1 हजार रुपयांची सूट देणार आहे. लावा विराट व्हि 1 5G ची किंमत 12,999 रुपये आहे. मात्र ऑफरअंतर्गत हा स्मार्टफोन खरेदी केल्यास डिव्हाईसची किंमत 11,999 रुपये होणार आहे. लावा विराट व्हि 1 ची लाँच किंमत 9,999 रुपये आहे. मात्र ऑफरअंतर्गत या स्मार्टफोनची किंमत केवळ 8,999 रुपये होणार आहे. ही ऑफर 31 जुलैपर्यंत मान्य असणार आहे. (फोटो सौजन्य: Lava)

लावा विराट व्हि 1 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

लावा विराट व्हि 1 5G स्मार्टफोन व्हेरिअंटमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.75-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. लावाचा हा फोन IP64-रेटिंगसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये युनिसाॅक T8200 चिपसेटसह 4GB रॅम दिली आहे. स्मार्टफोन 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि एसडीकार्ड स्लॉटसह लाँच करण्यात आला आहे. लावाच्या या स्मार्टफोनमध्ये यूजर्सना 4GB वर्चुअल रॅम देखील मिळणार आहे.

लावा विराट वी1 5जी स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच AI सेकेंडरी कॅमेरा लेंस देखील दिले आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. याशिवाय, लावा फोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये क्लीन अँड्रॉईड एक्सपीरियंस मिळणार आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुम्हाला या फोनवर जाहिराती किंवा आधीच इन्स्टॉल केलेले अनावश्यक ॲप्स दिसणार नाहीत. हा फोन ‘आर्या ब्लू’ आणि ‘सोनार गोल्ड’ अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.

लावा विराट व्हि 1 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

लावा विराट व्हि 1 स्मार्टफोनला 4जी सपोर्टसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.75-इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. लावाने या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे. या फोनला युनिसाॅक SC9863A प्रोसेसर आणि 4GB रॅमसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB पर्यंत वर्चुअल रॅम सपोर्ट देखील दिला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 64GB इंटरनल स्टोरेज आणि एसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे.

बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा एआय डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या 4G फोनमध्ये क्लीन अँड्रॉईड एक्सपीरियंस मिळणार आहे. हा फोन निलगिरी ब्लू आणि हिमालयन सिल्व्हर या रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Web Title: Lava virat v1 5g and virat v1 launched in india read price specifications features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ॲक्टिव्ह कूलिंग फॅन अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Oppo स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, असे आहेत खास फीचर्स
1

ॲक्टिव्ह कूलिंग फॅन अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Oppo स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, असे आहेत खास फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी
2

बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी

Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात
3

Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.