Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! जगातील पहिला फोल्डेबल माउस लाँच, 32 दिवसांची बॅटरी लाईफ; 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही

Logitech Mobi Fold Mouse : लाॅजिटेकने भारतात जगातील पहिला फोल्डेबस माउस मोबी फोल्ड सादर केला आहे. कंपनीचा दावा आहे की, रोज वापरल्यानंतरही हा माउस 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2026 | 10:02 AM
टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! जगातील पहिलाच फोल्डेबल माउस लाँच, 32 दिवसांची बॅटरी लाईफ; 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही

टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! जगातील पहिलाच फोल्डेबल माउस लाँच, 32 दिवसांची बॅटरी लाईफ; 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही

Follow Us
Follow Us:
  • नवीन डिव्हाइस पोर्टेबिलिटी आणि सोयीस्कर वापरावर भर देत डिझाइन करण्यात आले असून प्रवास करणाऱ्यांसाठी ते उपयुक्त ठरू शकते.
  • कॉम्पॅक्ट डिझाइनसोबतच दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि टिकाऊ बांधणी हे याचे प्रमुख आकर्षण मानले जात आहे.
  • स्मार्ट फीचर्स, कस्टमायझेशन पर्याय आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे गॅझेट टेकप्रेमींच्या चर्चेचा विषय बनले आहे.
टेकविश्वात सध्या फोल्डेबल उपकरणांची जास्त चर्चा होऊ लागली आहे. फोल्डेबल किबोर्ड, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि यानंतर आता बाजारात फोल्डेबल माउसचीही दमदार एंट्री झाली आहे. होय, टेक प्रेमींसाठी आजची बातमी महत्त्वाची आहे. तुम्हालाही जर नवीन उपकरणे खरेदी करण्यास रस असेल किंवा जुना माउसने तुम्ही कंटाळला असाल तर नवीनतम फोल्डेबल माउस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.

Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य

लोकप्रिय ब्रँड Logitech ने बाजारात जगातील पहिलाच फोल्डेबल माउस Mobi Fold लाँच केला आहे. याची किंमत $79.99 (साधारण 7600 रुपये) असल्याचे सांगण्यात येत आहे. या माऊसची खासियत म्हणजे हा एक वायरलेस फोल्डेबल माउस आहे, ज्याला तुम्ही सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. हा माउस मधोमध फोल्ड होत असल्याने तुमच्या पँटच्या पाॅकेटमध्येही तो कॅरी करता येईल. जे लोक दररोज प्रवास करतात आणि ज्यांना आपल्या बॅगमध्ये माउस कॅरी करावा लागतो त्यांच्यासाठी हा नवीन फोल्डेबल माउस एक चांगला पर्याय ठरेल.

Logitech Mobi Fold ची खासियत

या माउसमध्ये हिंज मॅकॅनिजम बसवण्यात आले आहे, ज्यामुळे त्याचे रूपांतर एका कॉम्पॅक्ट ६६x२१ मिमी ब्लॉकपासून एका पूर्ण-आकाराच्या माउसमध्ये होते, जो सहजपणे कुठेही नेता येतो. लाॅजिकेट कंपनीचे म्हणणे आहे की, जेव्हा हा माउस पूर्ण ओपन केला जातो तेव्हा ट्रॅकपॅड वापरण्याच्या तुलनेत हाताच्या पुढच्या भागावरील ताण कमी होण्यास मदत होते आणि त्यानंतर तो सहजपणे दुमडून खिशात ठेवता येतो.

मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड

फोल्ड होताच ऑफ होतो माउस

या फोल्डेबल माउसमध्ये ऑटोमॅटीम सीस्टीम बसवण्यात आली आहे ज्यामुळे त्याला ओपन करताच माउस चालू होतो तर फोल्ड करताच माउस बंद होतो. माउसचे बाह्य आवरण धूळ-प्रतिरोधक सिलिकॉन स्लीव्हने झाकलेले आहे आणि कंपनीचा दावा आहे की १५ वर्षे दररोज उघडून बंद केल्यानंतरही हिंजचे कोणतेही नुकसान होणार नाही. या माउसचे वजन 79 गॅम इतके आहे. त्याचबरोबर यात 4,000 DPI PixArt PAW3222 ऑप्टिकल सेंसरचाही वापर करण्यात आला आहे. नेव्हिगेशनसाठी यात टच पॅनेल आहे जो लाईन-बाय-लाईन रिडिंग आणि जलद इनर्शियल स्क्रोलिंग या दोन्हीसाठी अ‍ॅडॅप्टिव्ह स्क्रोलिंगला सपोर्ट करते. या टच एरियामध्ये दोन प्रोग्रामेबल बटन्स देखील लावण्यात आले आहेत ज्यांना Logi Options+ सॉफ्टवेयअरच्या मदतीने कस्टमाईज करता येऊ शकतात.

Web Title: Logitech mobi fold world first foldable wireless mouse launch know features price battery life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
1

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू
2

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन
3

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण
4

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.