मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, 'या' ठिकाणाची केली निवड
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगर येथे मेटा भारतातील पहिले एआय डेटा सेंटर उभारण्याची योजना आखत आहे. यामुळे भारतातील इंफ्रास्ट्रक्चर आणखी मजबूत होणार असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच भारताला एआय क्षेत्रात आणखी प्रगती करण्यासाठी मदत होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवरून अशी माहिती मिळाली आहे की, या डेटा सेंटरची सुरुवातीची क्षमता 168 मेगावॉट असणार आहे. भविष्यातील वाढत्या गरजा पाहता याचा विस्तार केला जाण्याची देखील शक्यता आहे. मेटाचा हा प्रकल्प पुढील 2 वर्षांत सुरु होण्याची शक्यता आहे. या एआय डेटा सेंटरचे कंस्ट्रक्शन आमि इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट रिलायंस इंडस्ट्रीज करणार आहे. मेटा याचा वापर त्यांच्या एआय मॉडेल्स आणि डिजिटल सर्विसला सपोर्ट देण्यासाठी करू शकतो.
आगामी प्रकल्पाबाबत असं देखील सांगितलं जात आहे की, हे डेटा सेंटर मेटाचे सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स जसे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपमध्ये वापरल्या जाणाऱ्या AI टेक्नोलॉजीला अधिक प्रगत करण्यासाठी मदत करणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यामुळे यूजर्सना पूर्वीपेक्षा जास्त स्मार्ट आणि पर्सनलाइज्ड अनुभव मिळणार आहे. याव्यतिरिक्त, हे डेटा सेंटर मेटाच्या भविष्यातील एआय (AI) उपक्रमांना आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देईल.
मेटाचे सिईओ मार्क झुकरबर्ग यांचं असं म्हणणं आहे की, भारतात AI डेटा सेंटरची स्थापना करणं हे कंपनीच्या ग्लोबल AI स्ट्रेटेजीचा एक भाग आहे. यासोबतच झुकरबर्ग यांनी असं देखील सांगितलं आहे की, जामनगरमध्ये उभारले जाणारे हे डेटा सेंटर ग्लोबल AI इंफ्रास्ट्रक्चरच्या विस्तारासाठी मदत करणार आहे. हे डेटा सेंटर भारतातील कंपनीच्या गुंतवणुकीला आणखी बळकटी देईल. या भागीदारीअंतर्गत, रिलायन्स डेटा सेंटरसाठी डिझाइन, बांधकाम, ऊर्जा पुरवठा, नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि संचालन यासह संपूर्ण सेवा प्रदान करेल.






