Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोनवर अलर्ट वाजताच घाबरले लोकं… सुरु झाला गोंधळ, काय आहे नेमंक कारण? सरकारनेच केलं जाहीर

देशभरात अनेकांच्या मोबाईलवर अचानक इमर्जन्सी अलर्ट वाजल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा अलर्ट कोणत्याही धोक्याचा नसून सरकारकडून सुरू असलेल्या आपत्ती सूचना प्रणालीच्या चाचणीचा एक भाग आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 02, 2026 | 01:13 PM
फोनवर अलर्ट वाजताच घाबरले लोकं... सुरु झाला गोंधळ, काय आहे नेमंक कारण? सरकारनेच केलं जाहीर

फोनवर अलर्ट वाजताच घाबरले लोकं... सुरु झाला गोंधळ, काय आहे नेमंक कारण? सरकारनेच केलं जाहीर

Follow Us
Follow Us:
  • अचानक मोबाईलवर वाजलेल्या इमर्जन्सी अलर्टमुळे नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला.
  • हा अलर्ट सरकारकडून सुरू असलेल्या आपत्ती पूर्वसूचना प्रणालीच्या चाचणीचा भाग आहे.
  • नागरिकांनी घाबरू नये, कारण ही केवळ टेस्ट आहे
 

तुमच्या फोनवर देखील सायरन वाजल्याचा आवाज आला का? तुमच्या मनात देखील गोंधळ उडाला का? आता काय होणार, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात देखील आले आहेत का? घाबरू नका. ही केवळ एक चाचणी आहे. सरकारने आधीच जाहीर केले होते की, ‘आज 2 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देशातील सर्व नागरिकांच्या फोनवर एकाच वेळी अलर्ट वाजणार आहे. ही केवळ एक चाचणी असून घारबून जाण्याची गरज नाही.’

मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका… सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी

एकाचवेळी वाजला सायरन

सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणेच आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देशातील सर्व नागरिकांच्या फोनवर एकाचवेळी सायरन वाजला. असे एकदा नाही तर दोन वेळा घडले. अचानक सायरन वाजल्याने अनेकजण घाबरले होते. फोन अचानक वायब्रेट झाल्याने लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता निर्माण झाली होती. मात्र काहीवेळाने सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या फोनवर वाजलेला सायरन ही केवळ एक चाचणी आहे. यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही.

मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत मेसेज

एसएमएसद्वारे मोबाईलवर आलेल्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत मेसेज आले होते. मेसेजमध्ये लिहीले आहे की, भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. हा एक चाचणी संदेश आहे. -भारत सरकार

‘सेल ब्रॉडकास्ट’ नावाच्या प्रणालीचा वापर

एसएमएससोबतच एक व्हॉईस मेसेज देखील जारी करण्यात आला होता. हा संदेश भारत सरकारद्वारे ‘सेल ब्रॉडकास्ट’ नावाच्या प्रणालीचा वापर करून पाठवला जातो. भूकंप, पूर, चक्रीवादळ इत्यादींसारख्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांना त्वरित सावध करण्यासाठी याची रचना केली आहे. या अलर्टमध्ये “अत्यंत गंभीर इशारा” असे म्हटले आहे, कारण खऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी हीच श्रेणी वापरली जाते. परंतु त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ही केवळ एक चाचणी आहे. मेसेज पाहून घाबरून जाण्याचा गरज नाही.

Samsung चा गेम ओव्हर? Motorola ने एकाचवेळी लाँच केले तब्बल 3 फोल्डेबल फोन, फीचर्स वाचून तुम्हीही भारावून जाल

३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रणाली कार्यरत

दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) ने विकसित केलेली एकात्मिक सूचना प्रणाली (साचेट) एनडीएमएने यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने शिफारस केलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (सीएपी) वर आधारित आहे. भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीद्वारे मोबाईल यूजर्सना एसएमएसद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित सूचना पाठवल्या जातात.

Web Title: Emergency alert sparks panic across india government clarifies it is just a test tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Emergency Alert
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.