Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासून बंद होतंय Microsoft चं हे पॉप्युलर व्हिडीओ – कॉलिंग प्लॅटफॉर्म, वाचा बेस्ट अल्टरनेटिव्हची यादी

Microsoft Skype: गूगल मीट Skype चा बेस्ट अल्टरनेटिव ठरू शकतो. झूम हा स्काईपचा सर्वोत्तम पर्याय आहे. Teams मध्ये Skype मधील सर्व फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2025 | 10:38 AM
आजपासून बंद होतंय Microsoft चं हे पॉप्युलर व्हिडीओ - कॉलिंग प्लॅटफॉर्म, वाचा बेस्ट अल्टरनेटिव्हची यादी

आजपासून बंद होतंय Microsoft चं हे पॉप्युलर व्हिडीओ - कॉलिंग प्लॅटफॉर्म, वाचा बेस्ट अल्टरनेटिव्हची यादी

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट त्यांचं लोकप्रिय व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म Skype OG आता बंद करणार आहे. आज या प्लॅटफॉर्मचा शेवटचा दिवस असून आजपासून हे प्लॅटफॉर्म बंद केलं जाणार आहे. मायक्रोसॉफ्टने याबाबत आधीच घोषणा केली होती आणि सांगितलं होतं की, 5 मेपासून Skype OG बंद केलं जाणार आहे. ऑफीस मिटिंगवेळी व्हिडीओ कॉल करण्यासाठी Skype OG अत्यंत फायदाचं ठरत होतं. मात्र आता हे प्लॅटफॉर्म बंद केलं जाणार आहे.

Flipkart Vs Amazon: कुठे मिळतेय iPhone 16 आणि 16 Pro वर स्वस्त Deal? जाणून घ्या सविस्तर

Skype OG संबंधित अनेक सेवा बंद करण्याचा निर्णय

28 फेब्रुवारी 2025 रोजी मायक्रोसॉफ्टने घोषणा केली होती की, ते हा लोकप्रिय व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या तयारीत आहेत. हा प्लॅटफॉर्म मेमध्ये बंद केला जाणार अशी घोषणा आधीच करण्यात आली होती. एक काळ असा होता जेव्हा Skype OG डिजिटल कम्युनिकेशनमधील सर्वात मोठं नाव होतं. कंपनीने केवळ Skype OG चं नाही त्यासंबंधित अनेक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

सशुल्क Skype सर्विसची विक्री बंद

मिळालेल्या माहितीनुसार, Skype OG बंद करण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीने नवीन यूजर्ससाठी Skype क्रेडिट आणि कॉलिंग प्लॅनसह सशुल्क Skype सर्विसची विक्री देखील बंद केली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, जुने युजर्स त्यांची सदस्यता संपेपर्यंत या सेवेचा वापर करू शकणार आहे. अगदी प्लॅटफॉर्म बंद झाला तरी सशुल्क युजर्ससाठी तो सुरु राहणार आहे. म्हणजेच प्लॅटफॉर्म बंद झाला तरी सशुल्क युजर्सचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

Mark Zuckerberg पासून ते Elon Musk पर्यंत, कसं आहे जगातील टॉप टेक लीडर्सचं मॉर्निंग रुटीन

युजर्स त्यांची सदस्यता संपेपर्यंत या सेवेचा वापर करण्यासाठी सक्षम असणार आहेत. पेड यूजर्स त्यांची मेंबरशिप संपेपर्यंत Skype डायल पॅड अ‍ॅक्सेस करू शकतात. यासाठी युजर्सना Skype वेब पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. किंव युजर्स थेट Microsoft Teams च्या मदतीने देखील Skype डायल पॅड अ‍ॅक्सेस करू शकणार आहेत.

Teams वर स्विच करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी

मायक्रोसॉफ्टने यूजर्सना फेब्रुवारी ते मे 2025 असा दोन महिन्यांचा कालावधी Teams वर स्विच करण्यासाठी दिला होता. Skype वरून Teams वर स्विच अगदी सोपं आहे. तुम्हाला Skype क्रेडेंशियलसह लॉग इन करावं लागणार आहे. लॉगिन केल्यानंतर कॉन्टॅक्ट, चॅट आणि कॉल हिस्ट्री देखील ऑटोमेटिक ट्रांसफर होणार आहे. Microsoft चं मत आहे की, Teams मध्ये Skype मधील सर्व फीचर्स देण्यात आले आहेत.

Skype चे बेस्ट अल्टरनेटिव

Google Meet: गूगल मीट Skype चा बेस्ट अल्टरनेटिव ठरू शकतो, जो तुम्ही गुगल अकाऊंटच्या मदतीने वापरू शकता. बहुतेक Skype युजर्सकडे त्यांचं गुगल अकाऊंट आहे. त्यांना केवळ Skype वरून Google Meet वर स्विच करायचं आहे. गुगल मीटवर तुम्हाला व्हिडिओ कॉल, स्क्रीन शेअरिंग आणि मीटिंग रेकॉर्डिंग सारखे अनेक फीचर्स मिळतात. तथापि, मोफत वापरकर्त्यांसाठी काही मर्यादा आहेत.

Zoom: गुगल मीट प्रमाणे, झूम हा स्काईपचा सर्वोत्तम पर्याय आहे जिथे तुम्ही 100 सहभागी जोडू शकता आणि ते सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही चॅट पर्याय देखील देते .यामध्ये तुम्हाला स्क्रीन शेअरिंग, व्हर्च्युअल व्हाईटबोर्ड सारखी साधने देखील मिळतात. मीटिंग रेकॉर्ड करण्याचा आणि मजकूर ट्रान्सक्रिप्ट नंतर पाहण्याचा पर्याय देखील आहे.

Web Title: Microsoft will shut down popular video calling platform skype from today read alternative list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • Microsoft
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

फोटो शेअरिंगचा गेम बदलणार? Instagram च्या Instants अ‍ॅपची सर्वत्र चर्चा, Snapchat ला टक्कर देणार?
1

फोटो शेअरिंगचा गेम बदलणार? Instagram च्या Instants अ‍ॅपची सर्वत्र चर्चा, Snapchat ला टक्कर देणार?

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी होणार आणखी मजबूत! कंपनी घेऊन आली नवं फीचर, AI चॅट्स आता पूर्णपणे सुरक्षित
2

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी होणार आणखी मजबूत! कंपनी घेऊन आली नवं फीचर, AI चॅट्स आता पूर्णपणे सुरक्षित

Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत… प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
3

Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत… प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

भविष्यातील भन्नाट टेक्नॉलॉजी! ना बॅटरी, ना चावी; हवेतल्या ऊर्जेवर चालणाऱ्या घड्याळाची जगभरात चर्चा, 3,000 वर्षे दाखवणार अचूक वेळ
4

भविष्यातील भन्नाट टेक्नॉलॉजी! ना बॅटरी, ना चावी; हवेतल्या ऊर्जेवर चालणाऱ्या घड्याळाची जगभरात चर्चा, 3,000 वर्षे दाखवणार अचूक वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.