Mark Zuckerberg पासून ते Elon Musk पर्यंत, कसं आहे जगातील टॉप टेक लीडर्सचं मॉर्निंग रुटीन
जगातील टॉप टेक लीडर्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. याचं कारण कधी एखादं नवीन अॅप असतं तर कधी त्यांच्या जुन्या अॅपचं नवीन फीचर. आता जगातील टेक लीडर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामध्ये फेसबुक आणि मेटाचे फाउंडर मार्क जुकरबर्ग, एक्सचे मालक एलन मस्क आणि ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा समावेश आहे. हे सर्व टेक लीडर्स कोणत्या अॅपमुळे नाही तर त्यांच्या मॉर्निंग रुटिनमुळे चर्चेत आहेत.
जगातील टॉप टेक लिडर्स ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, जे प्रचंड काम करतात, अशा लोकांचा दिवस कसा असेल, ते त्यांच्या दिवसाची सुरुवात कशा प्रकारे करत असतील असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत असतात. आता आम्ही तुम्हाला अशाच काही प्रश्नांची उत्तर देणार आहोत. टॉप टेक लीडर्स त्यांच्या दिवसाची सुरुवात कशाप्रकारे करतात, हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
डेली रुटिनमुळे चर्चेत असणारा पहिला टेक लीडर म्हणजे मार्क जुकरबर्ग. फेसबुक आणि मेटाचे फाउंडर मार्क जुकरबर्ग त्यांच्या डेली रुटिनमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. मार्क जुकरबर्गच्या डेली रुटीनला सोशल मीडियावर Rawdog Routine नावाने ओळखलं जात आहे. मार्क जुकरबर्ग यांच्या रुटीनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या दिवसाची सुरुवात कोणत्याही कॉफी किंवा एनर्जी ड्रिंकने करत नाहीत. यामुळेच त्यांच्या या डेली रुटीनला सोशल मीडियावर Rawdog Routine नावाने ओळखलं जात आहे.
‘Rawdog Routine’ म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात कोणत्याही स्टिमुलेंट (जसे कॉफी, चाय, एनर्जी ड्रिंक) शिवाय करणं. जुकरबर्गचे म्हणणे आहे की, तुम्ही कोणत्याही ड्रिंकशिवाय बाहेरील अॅक्टिव्हिटीच्या मदतीने तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तर दिवसभर तुमचं शरीर आणि डोकं फ्रेश राहतं. ज्यामुळे कामं व्यवस्थित आणि वेळेवर होतात. त्यांचं असं मत आहे की, सकाळी दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी कोणत्याही कॉफीची गरज नसते. सुट्टीच्या दिवसांत ते एन्जॉय करण्यासाठी कधी कधी कॉफीचे सेवन करतात. पण रोज कामाच्यावेळी ते कॉफी पित नाही.
जुकरबर्गचं मत आहे की, सकाळी कोणत्याही कॅफीनशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. यामुळे डोकं शांत राहतं आणि कामावर लक्ष क्रेंद्रित करता येतं. जुकरबर्ग रोज सकाळी सुमारे दोन तास ब्राजीलियन जिउ-जित्सु आणि MMA (मिश्रित मार्शल आर्ट्स) ची ट्रेनिंग घेतात.
एलन मस्क दिवसभरात प्रचंड कॉफीचे सेवन करतात आणि दिवसभर प्रचंड कामं करायचं असतं. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी त्यांच्या दिवसाची सुरुवात उपवास, मेडिटेशन आणि थंड पाण्याच्या स्थानाने करतात. अॅमझॉनचे संस्थापक जेफ बेजोस भरपूर झोप आणि फ्रेश माईंडने त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. तर अॅपलचे सीईओ टिम कुक सकाळी लवकर उठतात आणि दिवसभर उत्साही राहण्यासाठी नियमित व्यायाम करतात.