Flipkart Vs Amazon: कुठे मिळतेय iPhone 16 आणि 16 Pro वर स्वस्त Deal? जाणून घ्या सविस्तर Flipkart Vs Amazon: कुठे मिळतेय iPhone 16 आणि 16 Pro वर स्वस्त Deal? जाणून घ्या सविस्तर
लोकप्रिय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर सेल सुरु झाला आहे. फ्लिपकार्टवर Sasa Lele सेल सुरु झाला असून या सेलमध्ये मोबाईल फोन्सवर आकर्षक डिस्काऊंट दिलं जात आहे. तर अॅमेझॉनवर देखील ग्रेट समर सेल (Great Summer Sale) सुरु झाला आहे. या सेलमध्ये देखील अनेक वस्तूंवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर केवळ प्रिमियम स्मार्टफोन्सवरच नाही आयफोनवर देखील प्रचंड सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे दोन्ही सेल तुमच्या फायद्याचे ठरणार आहेत. दोन्ही सेलमध्ये गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रोवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. मात्र ग्राहकांमध्ये एकच गोंधळ आहे, तो म्हणजे कोणता प्लॅटफॉर्म सर्वात जास्त डिस्काऊंट ऑफर करत आहे. चला तर मग आता फ्लिपकार्टच्या Sasa Lele सेलमध्ये आणि अॅमेझॉनच्या ग्रेट समर सेलमध्ये कोणत्या आयफोनवर किती डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
2024 साली सप्टेंबर महिन्यात आयफोन 16 सिरीज भारतात लाँच करण्यात आली होती. या सिरीजमधील आयफोन 16 चे बेस मॉडेल भारतात 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाच करण्यात आला होता. मात्र आता या मॉडेलवर आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. Flipkart वर हा प्रीमियम स्मार्टफोन 69,999 रुपयांत लिस्ट झाला आहे. म्हणजेच ई-कॉमर्स प्लेटफॉर्म iPhone 16 च्या खरेदीवर ग्राहकांना प्लॅट 9,901 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. तसेच SBI Credit Card EMI ऑप्शनसह 1250 रुपयांचे अधिक डिस्काउंट दिलं जात आहे.
अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 72,490 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच फ्लिपकार्टसोबत तुलना केली तर अॅमेझॉनवर आयफोन 16 च्या बेस मॉडेलची किंमत काहीशी अधिक आहे. अॅमेझॉन सेलमध्ये आयफोन 16 च्या बेस मॉडेलवर 7,410 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे. म्हणजेच जर तुम्ही आयफोन 16 चे बेस मॉडेल खरेदी करण्याचा विचार करताय तर फ्लिपकार्टची डिल बेस्ट आहे. कारण कंपनी प्लॅट 9,901 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. तसेच SBI Credit Card EMI ऑप्शनसह 1250 रुपयांचे अधिक डिस्काउंट दिलं जात आहे. त्यामुळे या सेलमध्ये आयफोन खरेदी केल्यास ग्राहकांची उत्तम बचत होऊ शकते.
दोन्ही ई-कॉमर्स प्लेटफॉर्म लेटेस्ट iPhone 16 Pro वर देखील आकर्षक डिस्काऊंट देत आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही iPhone 16 Pro हा 1,09,900 रुपयांना खरेदी करू शकता. तर अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 1,12,900 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. iPhone 16 Pro 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. म्हणजेच iPhone 16 Pro च्या खरेदीसाठी देखील फ्लिपकार्टवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत.