
पावसाळ्यात फ्रिज 'या' नंबरवर सेट केलाय का? (Photo Credit- X)
अनेक घरांमध्ये वर्षभर फ्रिज एकाच ठराविक सेटिंगवर चालवला जातो, जी अत्यंत चुकीची पद्धत आहे. हवामानानुसार फ्रिजचे तापमान बदलले नाही, तर आतील अन्नपदार्थ एकतर लवकर सडू लागतात किंवा गरजेपेक्षा जास्त थंड होऊन गोठतात. यामुळे अन्नाची चव, पोषक तत्वे आणि गुणवत्ता दोन्ही खराब होतात. पावसाळ्यात तापमान योग्य नसेल, तर दूध लवकर फाटणे, भाज्या सडणे किंवा शिजवलेले अन्न आंबणे अशा समस्या उद्भवतात, ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
अन्नपदार्थ तज्ज्ञांच्या मते, फ्रिजचे अंतर्गत आदर्श तापमान नेहमी १.७ अंश सेल्सिअस ते ३.३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे. या तापमानात अन्न दीर्घकाळ ताजे राहते आणि हानिकारक बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते. जर पावसाळ्यातही दमटपणा किंवा उकाडा जास्त असेल, तर फ्रिजची मुख्य सेटिंग मध्यम पातळीवर म्हणजेच साधारणपणे ‘४’ वर सेट करणे फायदेशीर मानले जाते, जेणेकरून कूलिंग योग्य प्रमाणात टिकून राहते.
पावसाळ्याच्या दिवसांत फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडणे आणि बंद करणे टाळावे. फ्रिज वारंवार उघडल्याने आतील थंड हवा बाहेर पडते आणि बाहेरील दमट हवा आत जाते. यामुळे फ्रिजला अंतर्गत तापमान पुन्हा नियंत्रित करण्यासाठी दुप्पट काम करावे लागते. परिणामी, विजेचा वापर (Electricity Consumption) मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि फ्रिजच्या कॉम्प्रेसर मशीनवरही नाहक ताण पडतो.
जर तुमच्या फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्यांवर किंवा अन्नपदार्थांवर बर्फाचा थर जमा होत असेल, तर समजून घ्या की फ्रिजचे तापमान गरजेपेक्षा जास्त कमी झाले आहे. अशा वेळी फ्रिजचे तापमान थोडे वाढवावे; म्हणजेच जर सेटिंग ४ वर असेल, तर ती कमी करून ३ किंवा २.५ वर करावी. यामुळे कूलिंगचे संतुलन राखले जाते आणि वस्तू अति-गोठण्यापासून वाचतात.
आजकाल बाजारात येणाऱ्या अत्याधुनिक इन्व्हर्टर फ्रिजमध्ये सहसा ‘लो कूलिंग’, ‘रेनी कूलिंग’ आणि ‘हाय कूलिंग’ असे विशेष मोड्स दिलेले असतात. याशिवाय त्यात १ ते ७ या स्तरांची मॅन्युअल सेटिंगही असते. पावसाळ्याच्या वातावरणात इन्व्हर्टर फ्रिज नेहमी ‘रेनी मोड’ किंवा ‘मीडियम मोड’वर चालवावा, जेणेकरून अन्नाचा दर्जा उत्तम राहतो आणि वीजही वाचते.
iPhone 18 Pro: नवे डिझाईन, लुक आणि ढाँसू फिचर्ससह Apple चा नवा अपडेट स्मार्टफोन, तपशील एका क्लिकवर