
Motorola Edge 70 Pro लाँच! 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 6500mAh बॅटरीने सुसज्ज, यूजर्सना मिळणार AI फीचर्ससह फ्लॅगशिप अनुभव
सर्व कॅमेऱ्यांमध्ये 4के 60एफपीएस व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीमची शक्ती असलेला हा डिवाईस प्रगत ऑन-डिवाईस एआय प्रोसेसिंगसह अंधुक प्रकाशात सुस्पष्टपणे फोटो कॅप्चर करतो. मोटोरोला एज 70 प्रोमध्ये नवीन कलेक्शन्स बाय मोटोरोला डिझाइन सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये लक्झरीअस सॅटिन-लक्स, टेलर्ड फॅब्रिक आणि पॅन्टोन™ निर्मित रंगांमधील मार्बल फिनिशेस्, तसेच आकर्षक जवळपास 144 हर्ट्झ 1.5के ट्रू कलर™ क्वाड-कर्व्ह पॅन्टोन™ व्हॅलिडेटेड एक्स्ट्रीम एएमओएलईडी डिस्प्ले आहे. विशाल 6500 एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरीसह 90 वॅट टूर्बोपॉवर™ चार्जिंग आणि आयपी68 + आयपी69 टिकाऊपणासह हा डिवाईस अस्सल फ्लॅगशिप-ग्रेड स्मार्टफोन अनुभव देतो.
मोटोरोला एज 70 प्रोने मोटोएआयद्वारे समर्थित प्रगत 50 मेगापिक्सल सोनी एलवायटीआयए™ 710 कॅमेरासह इमेजिंगमध्ये नवीन ओळख निर्माण केली आहे, जे रात्रीच्या वेळी आकर्षक फोटोग्राफी, अपवादात्मक सुस्पष्टता, उच्च दर्जाची सिग्नल-टू-नॉईज कार्यक्षमता आणि उल्लेखनीय लो-लाइट निष्पत्तींसोबत ब्राइटनेस आणि गडदता देते. मोटोएआय रिअल टाइममध्ये पोत, डायनॅमिक रेंज आणि मोशन डिटेक्शन वाढवते, ज्यामधून जलद हालचाल करणाऱ्या दृश्यांमध्ये देखील सुस्पष्ट, ब्लर-फ्री फोटोज कॅप्चर होण्याची खात्री मिळते. पॅन्टोन™ व्हॅलिडेटेड कलर्स आणि पॅन्टोन™ स्किनटोन™ व्हॅलिडेशन, तसेच मल्टीस्पेक्ट्रल 3-इन-1 सेन्सरसह कॅमेरा अस्सल, वास्तविक रंगसंगती आणि अचूक स्किन टोनची निर्मिती करते, जे क्रिएटर्सना अपेक्षित असते.
मुख्य सेन्सरला पूरक 50 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड + मॅक्रो व्हिजन कॅमेरा आहे, तसेच विस्तीर्ण फोटो आणि क्लोज-अप्ससाठी 1200 फिल्ड ऑफ व्ह्यू आहे. आकर्षक सेल्फीज व सुस्पष्ट व्हिडिओ कॅप्च्र करण्यासाठी 50 मेगापिक्सल क्वाड पिक्सल फ्रण्ट कॅमेरासह ऑटो फोकस आहे. या डिवाईसच्या सर्व कॅमेऱ्यांमध्ये एचडीआरसह अल्ट्रा-शार्प 4के 60एफपीएस व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ज्यासह प्रत्येक कोनामधून सिनेमॅटिक कथानकासाठी सहजपणे लेन्स बदलता येते. मोटोरोलाने उद्योगातील प्रथम फ्रेम मॅच वैशिष्ट्य सादर केले आहे, ज्याद्वारे परफेक्ट फ्रेम लॉक करून पुन्हा वापरता येते. प्रगत वैशिष्ट्ये जसे होरिझोन लॉकमुळे फोन कितीही हलला तरी व्हिडिओ एकदम स्थिर राहतो, अॅक्टिव्ह फोटोज लाइव्ह फोटो कॅप्चर करण्याची सुविधा देते. मोटोएआय एआय फोटो एन्हान्समेंट, एआय अॅडप्टिव्ह स्टेबिलायझेशन, विविध फोकल लेन्थ असलेले पोर्ट्रेट मोड, ऑटो नाइट व्हिजन आणि एआय सिग्नेचर स्टाइल अशा सर्वोत्तम टूल्ससह सर्जनशीलता वाढवते, ज्यामधून प्रोफेशनल दर्जाची एआय कॅमेरा सिस्टम मिळते, जी प्रभावी, सिनेमॅटिक सर्जनशीलतेसाठी डिझाइन करण्यात आली आहे.
या डिवाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीम प्रोसेसरची शक्ती आहे, जे सीपीयू कार्यक्षमतेमध्ये 40 टक्के वाढ, जीपीयू कार्यक्षमतेमध्ये 30 टक्के सुधारणा आणि 65 टक्के जलद एनपीयू देते, ज्यामधून अत्यंत सुलभ कार्यक्षमता आणि प्रगत ऑन-डिवाईस एआय अनुभव मिळतो. शक्तिशाली एनपीयू एआय-सुधारित इमेजिंग क्षमता देखील देते, जसे अंधुक प्रकाशात देखील त्वरित सुस्पष्ट फोटोजसाठी एआय-पॉवर्ड झीरो शटर लॅग, सर्वोत्तम टोन ऑप्टिमायझेशनसाठी एआय-पॉवर्ड कलर, अधिक सुस्पष्टतेसाठी एआय-पॉवर्ड पोर्ट्रेट व ग्रुप शॉट आणि एआय-पॉवर्ड क्लेरिटी, ज्यामध्ये आरएडब्ल्यू सुपर-रिझॉल्युशनसह एआय सुपर-रिझॉल्युशनचे संयोजन आहे, ज्यामधून अधिक सुस्पष्टपणे फोटोज कॅप्चर होण्याची खात्री मिळते.
2.4 दशलक्षहून अधिक अंतूतू स्कोअर, 12 जीबीपर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256 जीबी यूएफएस 4.1 स्टोरेजसह, मोटोरोला एज 70 प्रो विनासायास मल्टीटास्किंग, वेगवान गेमिंग आणि दैनंदिन कामांमध्ये सुरळीत कामगिरीची खात्री देतो. यातील 4600 मिमी² मोठी वेपर चेंबर कूलिंग सिस्टम थर्मल कार्यक्षमता अधिक वाढवते; ज्यामुळे गेमिंग, मल्टीटास्किंग आणि एआय-आधारित कामांदरम्यान फोन गरम न होता सातत्याने उत्कृष्ट कामगिरी देतो. तसेच, 17 5जी बँड्स आणि वाय-फाय 6E मुळे सर्व नेटवर्क्सवर जलद आणि अधिक स्थिर कनेक्टिव्हिटी मिळते.
कुशल कारागिरी आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा मेळ घालत, मोटोरोला एज 70 प्रोमध्ये कलेक्शन्स™ बाय मोटोरोला सादर करण्यात आले आहे. हे डिझाइन तत्व वैयक्तिकरणावर आणि प्रीमियम साहित्यावर आधारित आहे. या डिवाईसमध्ये अत्यंत लक्झरीअस आणि वैविध्यपूर्ण फिनिश पाहायला मिळतात, ज्यामध्ये पँटोन™ टी रंगातील जगातील पहिला सॅटिन-लक्स फिनिश असलेला स्मार्टफोन, पँटोन™ टायटनमधील टेलर्ड-फॅब्रिक फिनिश आणि पँटोन™ लिली व्हाईटमधील मार्बल फिनिशचा समावेश आहे. पँटोन™ सोबतच्या सहकार्याने तयार केलेली ही वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्स आणि कॅमेऱ्याचे आकर्षक डिटेल्स फोनला एक वेगळी ओळख देतात. फक्त 6.99 मिमी अल्ट्रा-स्लिम प्रोफाइल आणि वजनाला हलकी, उत्तम संतुलित डिझाइन असलेला हा स्मार्टफोन टिकाऊपणाशी कोणतीही तडजोड न करता विलक्षण आरामदायी अनुभव देतो. याचे क्वाड-कर्व्ह कम्फर्ट डिझाइन पुढील आणि मागील भागाला प्रवाही वक्राकार आणि बॉर्डरलेस कडांसह अखंडपणे जोडते, ज्यामुळे स्मार्टफोन हातामध्ये धरण्यास अत्यंत सोयीस्कर वाटतो आणि एक प्रीमियम अनुभव देतो.
मोटोरोला एज 70 प्रोमध्ये आकर्षक 6.8 इंच 144 हर्ट्झ 1.5के ट्रू कलर क्वाड-कर्व्ह डिस्प्ले आहे, जो उत्कृष्ट प्रतिसादासह विलोभनीय एज-टू-एज व्ह्यूइंग अनुभव देतो. पँटोन™ व्हॅलिडेटेड डिस्प्ले आणि पँटोन™ स्किनटोन™ व्हॅलिडेशनसह, हा स्क्रीन निर्मात्यांच्या कल्पनेनुसार हुबेहूब रंग आणि त्वचेचे अचूक टोन प्रदर्शित करतो. या डिस्प्लेमध्ये 5200 नीट्स पीक ब्राइटनेसमुळे बाहेरच्या उजेडातही स्क्रीन स्पष्ट दिसतो, तर एचडीआर10+, 100 टक्के डीसीआय-पी3 कलर गॅमट आणि 10-बीट कलर डेप्थमुळे चित्रे अधिक दोलायमान आणि सिनेमॅटिक दिसतात. डॉल्बी अॅटमॉस® आणि हाय-रिझॉल्युशन ऑडिओसह ड्यूअल स्टिरिओ स्पीकर्समुळे हा अनुभव अधिक समृद्ध होतो, तर कॉर्निंग® गोरिल्ला® ग्लास 7आय दैनंदिन वापरासाठी अधिक टिकाऊपणाची खात्री देते.
अल्ट्रा-स्लिम आकार असूनही, मोटोरोला एज 70 प्रोमध्ये विशाल 6500 एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे, जी कामगिरीशी कोणतीही तडजोड न करता जवळपास 51 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्यास सक्षम आहे. विनासायास स्ट्रीमिंग, गेमिंग, 4के रेकॉर्डिंग, व्हिडिओ कॉल्स आणि सोशल मीडिया वापरासाठी डिझाइन केलेली ही प्रगत सिलिकॉन-कार्बन तंत्रज्ञानाची बॅटरी स्मार्टफोनच्या स्लिम प्रोफाइलमध्येही दीर्घकाळ टिकते. यासोबत 90 वॅट टूर्बोपॉवर™ चार्जिंग मिळते, जे अवघ्या 9 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये स्मार्टफोन दिवसभर कार्यरत राहण्याची खात्री देते, ज्यामुळे वापरकर्ते स्मार्टफोनचार्ज करून कोणत्याही व्यत्ययाशिवाय कामात व्यस्त राहू शकतात.
मोटोरोला एज 70 प्रो टिकाऊपणाच्या सर्वोच्च लष्करी मानकांनुसार डिझाइन करण्यात आला आहे. या डिवाईसने एमआयएल-810एच मिलिटरी ग्रेड प्रमाणित संरक्षणाच्या 16 चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. हा स्मार्टफोन दिसायला आणि वापरताना अत्यंत सुबक व मोहक वाटतो. हा स्मार्टफोन -20° सेल्सिअसच्या कडाक्याच्या थंडीपासून 60° सेल्सिअसच्या कडक उन्हापर्यंत, अगदी उन्हात उभ्या असलेल्या कारमधील प्रचंड तापमानातही सुरक्षित राहतो. तसेच, हा डिवाईस 95 टक्क्यांपर्यंत आर्द्रतेचा सामना करू शकतो. धूळ, घाण, वाळू आणि पाण्याच्या उच्च दाबापासून संरक्षणासाठी यात आयपी68 आणि आयपी69 ही सर्वोच्च रेटिंग्स देण्यात आली आहेत. हा डिवाईस 1.5 मीटर गोड्या पाण्यात 30 मिनिटांपर्यंत बुडालेला राहिला तरी सुरक्षित राहू शकतो.
मोटोरोला एज 70 प्रो मध्ये मोटो एआय 2.0 समाविष्ट आहे, जे पुढच्या पिढीची प्रगत बुद्धिमत्ता प्रदान करते. यामध्ये नेक्स्ट मूव्ह हे वैशिष्ठ्य आहे, जे स्क्रीनवर काय सुरू आहे हे समजून घेते आणि रिअल-टाइममध्ये योग्य कृती सुचवते. यासोबत एआय इमेज स्टुडिओ, स्केच टू इमेज, स्टाईल सिंक, टेक्स्ट टू स्टिकर आणि अवतार निर्मिती यांसारखी सर्जनशील टूल्स आहेत. उत्पादकता वाढवण्यासाठी यात कॅच मी अप 2.0, पे अटेन्शन लाईव्ह ट्रान्सक्रिप्शन, एआय प्लेलिस्ट स्टुडिओ, ग्लोबल सर्च, ऑटो स्क्रीनशॉट ब्लर आणि धीस ऑन दॅटद्वारे विविध डिवाईसेसमध्ये कार्यप्रवाह दिला आहे. रिमेंबर धीस आणि रिकॉल सारखी वैशिष्ट्ये एका स्मार्ट मेमरी व्हॉल्टप्रमाणे काम करतात, तर परप्लेक्सिटी इंटिग्रेशमुळे झटपट माहिती शोधणे, नियोजन करणे आणि संदर्भानुसार शिफारसी मिळवणे सोपे होते. मोटो एआय, कोपायलट, परप्लेक्सिटी आणि गुगल जेमिनी यांपैकी निवडण्याचे स्वातंत्र्य वापरकर्त्यांना मिळत असल्याने, त्यांना खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण व सर्वोत्तम सहाय्य मिळते.
या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत मोटोरोला इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. टी.एम. नरसिंहन म्हणाले, “मोटोरोलामध्ये आम्ही ग्राहक आज ज्या पद्धतीने जगतात, नवनिर्मिती करतात आणि एकमेकांशी जोडले जातात, याचा सखोल अभ्यास करून उद्देशपूर्ण नवकल्पनांच्या जोरावर पारंपारिक सीमांना आव्हान देण्याचे काम सुरू ठेवले आहे. मोटोरोला एज 70 प्रोच्या माध्यमातून आम्ही प्रामुख्याने कमी प्रकाशातील उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभव, लक्झरी फिनिशसह उत्कृष्ट डिझाइन, प्रगत एआय क्षमता आणि एका स्लिम व प्रीमियम आकारात फ्लॅगशिप-लेव्हल कार्यक्षमता देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या लाँचमधून तांत्रिक वैशिष्ट्यांपलीकडे जाऊन तंत्रज्ञान अधिक वैयक्तिक, अर्थपूर्ण आणि शक्तिशाली बनवण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. प्रीमियम, डिझाइन-केंद्रित आणि एआय-आधारित अनुभव देऊन व्यक्तींचे दैनंदिन जीवन खऱ्या अर्थाने सुसह्य करण्याच्या आमच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.”
आधुनिक अँड्रॉईड 16 वर आधारित हॅलो यूआयवर चालणाऱ्या मोटोरोला एज 70 प्रो सोबत 3 ओएस अपग्रेड्स आणि ५ वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन देण्यात आले आहे. या डिवाईसमध्ये एनएफसी सपोर्टसह थिंकशील्ड युक्त मोटो सिक्युअर 5.0, फॅमिली स्पेसेस, मोटो अनप्लग्ड आणि इंटेलिजंट सिस्टम ऑप्टिमायझेशन यांसारखे प्रगत सॉफ्टवेअर अनुभव मिळतात, जे प्रबळ गोपनीयता, सुरक्षा आणि दीर्घकालीन विश्वासार्हतेची खात्री देतात.
प्रो-ग्रेड इमेजिंग, फॅब्रिकपासून प्रेरित उत्कृष्ट डिझाइन, शक्तिशाली कार्यक्षमता, सर्वोत्तम ऑडिओ आणि इंटेलिजंट सॉफ्टवेअर यांचे संयोजन असलेला मोटोरोला एज 70 प्रो प्रीमियम स्मार्टफोनकडून असणाऱ्या वापरकर्त्यांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा नव्याने परिभाषित करतो. हा स्मार्टफोन स्टाईल, गुणवत्ता आणि नाविन्य यांचा एक विचारपूर्वक तयार केलेला संगम आहे.
मोटोरोला एज 70 प्रो 8 जीबी रॅम + 256 जीबी आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी अशा दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन पँटोन™ द्वारे क्युरेट केलेल्या तीन आकर्षक रंगांमध्ये मिळेल ज्यामध्ये पँटोन™ टी, पँटोन™ टायटन आणि पँटोन™ लिली व्हाईट यांचा समावेश आहे. या डिवाईसमध्ये सॅटिन-लक्स, टेलर्ड फॅब्रिक आणि मार्बल-प्रेरित टेक्श्चर्ससह अनेक प्रीमियम फिनिशेस आहेत, जे टिकाऊपणा आणि दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर असून अनोखा व लक्झरीअस अनुभव देतात. मोटोरोला एज 70 प्रो ची विक्री 29 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्राहक फ्लिपकार्ट, मोटोरोला.इन आणि भारतातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्सवरून स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनची प्रभावी लाँच किंमत फक्त 36,999 रुपयांपासून सुरू होईल.
एज 70 प्रो च्या 8/256 GB व्हेरिअंटची किंमत 36,999 रुपये आणि एज 70 प्रोच्या 12/256 GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे.
एज 70 प्रो 8/256 जीबी व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये आणि एज 70 प्रो 12/256 जीबी व्हेरिअंटची किंमत 41,999 रुपये आहे.
ग्राहक खालील २ पैकी कोणत्याही एका ऑफरचा लाभ घेऊ शकतात: