Poco चा जागतिक बाजारात मोठा धमाका! तगडी बॅटरी आणि दमदार फीचर्ससह स्मार्टफोन लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 18,000 रुपये
पोको एम8एस 5जी स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 189 डॉलर म्हणजेच सुमारे 18,000 रुपये आणि 8 जीबी रॅम+256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 219 डॉलर म्हणजेच सुमारे 20,000 रुपये आहे. ही किंमत अर्ली बर्ड प्राइस आहे. हा पोको फोन रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तो काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Poco)
पोको एम8एस 5जी स्मार्टफोन डुअल-सिम कनेक्टिविटीसह सादर करण्यात आला आहे. या नव्या पोको स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच फुल एचडी+ (1,080 x 2,340 पिक्सेल) 8-बिट डॉट डिस्प्ले, 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 374 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 288Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 850 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. पोकोने लाँच केलेल्या स्मार्टफोनला टी-यू-वी राईनलँड लो ब्लू लाईट, सरकेडियन फ्रेंडली, आणि फ्लिकर फ्री प्रमाणपत्र मिळाले आहे. पोकोचा हा फोन अँड्रॉईड 15 वर आधारित शाओमीच्या हायपरओएस 2 वर आधारित आहे.
पोको 5G स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेटने सुसज्ज आहे. ग्राफिक्स सपोर्टसाठी फोनमध्ये एड्रेनो जीपीयू दिला आहे. हा फोन 8 जीबी पर्यंत एलपीडीडीआर4एक्स आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेजसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जाऊ शकते. हा फोन IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, पोको 5G स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे. सेकेंडरी कॅमेऱ्याबद्दल अद्याप माहिती शेअर करण्यात आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
पोको एम8एस 5जी स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 18W वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि बेईडू सपोर्ट दिला आहे. तसेच हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंरर आणि आईआर ब्लास्टर सारख्या सेंसरने सुसज्ज आहे.






